Special Gavran Chicken recipe सकाळ डिजिटल टीम
फूड

Special Gavran Chicken: जीभेवर चव रेंगाळत राहणार, ट्राय करा 'ही' रेसिपी

स्पेशल गावरान कोंबडीचे चिकन कसे तयार करायचे ?

सकाळ डिजिटल टीम

आज रविवार आहे. मग त्यामुळे काहीतरी खास बेत झालाच पाहिजे म्हणून रविवार स्पेशल गावरान कोंबडीचे चिकन कसे तयार करायचे याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत.

साहित्य:

1) एक किलो कोंबडीचे चिकन

2) दोन मोठे कांदे बारीक चिरून

3) दोन चमचे हळद

4)तिन चमचे लाल तिखट ( काश्मिरी मिरची तिखट एक चमचा)

5) आवडीनुसार मीठ

6) फोडणी साठी तेल

मसाला तयार करण्यासाठी लागणारे साहित्य :

1) दोन मोठे कांदे

2) कोथिंबीर

3) दोन चमचे पांढरे तीळ

4) एक चमचा जिरे

5) एक गाठा लसूण पाकळ्या

6) आल्याचा तुकडा

7) दीड वाटी किसलेले खोबरे

8) चार ते पाच लवंग

9) एक तमालपत्र

10) अर्धा चमचा शाही जिरे

11) एक चमचा धणे पावडर

12) एक जावित्रीची पाकळी

13) दोन हिरव्या वेलायची

14) चार पाच काळी मिरे

कृती:

  • चिकन आणल्यानंतर त्यावर मीठ टाकून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे. नंतर चिकनच्या तुकड्यांना हळद आणि मीठ चोळून अर्धा तास बाजूला ठेवावे. नंतर मग गरम

    मसाल्यासाठी लागणारे सगळे साहित्य तव्यात हलका सुगंध येईपर्यंत भाजून घ्यावेत.

  • त्यानंतर दोन मोठे कांदे डायरेक्ट गॅसच्या जाळावर भाजून घ्यावे. मिक्सरच्या भांड्यात भाजलेले खोबरे, तीळ, जिरे,आले लसूण, कोथिंबीर व थोडं तेल घालून मसाला वाटून घ्यावा .

  • एका कढईत थोडसं तेल टाकून त्यात बारीक चिरलेला कांदा टाकावा. कांदा चांगला करडा होईपर्यंत परतून घ्यावा. नंतर त्यात चिकनचे तुकडे घालून 2-3 मिनिटे मोठ्या आचेवर परतून घ्यावेत. नंतर 5 वाटी गरम पाणी घालून आच मंद करून झाकण घालून शिजू द्यावे.

  • साधारण 30 ते 35 मिनिटे चिकन शिजवल्यावर, चिकनचे अधिक मास असलेले तुकडे सुक्यासाठी वेगळे काढून घ्यावेत आणि काही तुकडे. ते रश्श्यातच राहू द्यावे. त्यात दीड चमचा लाल मिरची पूड, दोन चमचे गरम मसाला आणि मसाल्याचा एक तृतीयांश भाग वाटण रश्श्यात घालावे . मीठ चवीप्रमाणे घालावे. मंद आचेवर 7 ते 8 मिनिटे शिजू द्यावे. चिकन रस्सा तयार आहे, गॅस बंद करून झाकून ठेवावे.

  • चिकन सुक्क बनवण्यासाठी एका कढईत तिन चमचे तेल गरम करावे. त्यात लांब चिरलेला कांदा घालून साधारण गुलाबी होईपर्यंत परतावा. त्यात उरलेली लाल मिरची पूड, उरलेला गरम मसाला पावडर, उरलेले वाटण आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून एकत्र करून घ्यावी. मसाला नीट मंद आचेवर शिजवून घ्यावा.

  • मसाला शिजला की त्यात चिकनचे तुकडे घालून एकत्र करावेत. त्यात दीड कप गरम पाणी घालावे. मंद आचेवर शिजू द्यावे.

  • 7 ते 8 मिनिटे शिजवल्यावर चवीप्रमाणे मीठ घालावे. गॅस बंद करावा आणि आता तुमचं चिकन सुकं तयार आहे .

  • तुम्ही गावरान कोंबडी चिकन आणि भाकरी,पोळी, भातासोबत खाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Badlapur Accident: मनसे पदाधिकाऱ्याला कारने उडवलं, घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल

देवेंद्र फडणवीसांना निमंत्रण, एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवारांना डावललं, सिडको, विमान प्राधिकरणाची गंभीर चूक, नेत्यांची तीव्र नाराजी

महाराष्ट्रातील रेल्वे फाटकं इतिहासजमा होणार! देशातील पहिलं रेल्वे गेट-मुक्त राज्य बनणार; फडणवीसांनी दिले स्पष्ट निर्देश

Shocking Case : नात्यांची मर्यादा ओलांडली! सासू-जावई प्रेमात आकंठ बुडाले, कोर्टात लग्न करून दोघेही फरार, कुटुंबियांना मोठा धक्का

Instagram Plus : इंस्टाग्राम प्लस लाँच! २९९ रुपयांत मिळणार अनेक प्रिमियम फीचर्स, सब्स्क्रिप्शन कसं घ्यायचं? पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT