कॉफी esakal
फूड

कॉफी उत्पादनाला हवामान बदलामुळे बसणार मोठा फटका, संशोधकांचा दावा

हवामान बदलाचा कॉफी उत्पादनाला मोठा फटका बसणार असल्याचे एका संशोधनात समोर आले आहे

सकाळ डिजिटल टीम

तुम्हाला सकाळी उठल्यावर कॉफी प्यायला आवडते का? तुमचा दिवसही कॉफी प्यायल्याशिवाय जात नसेल तर मग कदाचित तुमचं कठीण आहे. कारण एका अभ्यासानुसार (Study) हवामान बदलाच्या परिणामांमुळे ५० वर्षांनी तुम्हाला कॉफी (Coffee) पिणे अवघड जाईल. एका अहवालानुसार, हवामान बदलामुळे (Climate Change) जगभरात विविध घटना घडत आहेत. त्यामुळे पर्यावरणात आणखी बदल होत आहेत. तसेच अन्न पिकांच्या लागवडीमध्ये अनेक समस्या निर्माण होत असल्याने त्याचा परिणाम जागतिक अन्न पुरवठ्यावर होतो आहे. याचा फटका कॉफी, अॅव्होकाडो आणि काजूचे उत्पादन करणाऱ्यांना देशांना (Desh) मोठ्या प्रमाणात होणार आहे.

Coffee Tree

काय सांगतो अभ्यास?

हा अभ्यास PLOS One मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. त्यात हवामान बदलामुळे कॉफी, काजू आणि एव्हॉकाडो या महत्वाच्या उत्पादन क्षेत्रांची उपयुक्तता कमी होईल, असा दावा करण्यात आला आहे. संशोधकांच्या मते, जैव-भौतिक स्थिरतेवर हवामान बदलाच्या परिणामांचे मूल्यमापन, उपाय विकसित करण्यासाठी तसेच योग्य वाण किंवा पिके निवडण्यासाठी महत्वाचे आहे. तसेच कमी तापमान असलेल्या क्षेत्रांवर याचा मोठा परिणाम होईल. संशोधकांच्या मते, 2050 पर्यंत ब्राझील, इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि कोलंबियामधील कॉफी क्षेत्रे 50 टक्क्यांनी कमी होतील. त्यात ब्राझीलमध्ये 76 टक्के आणि कोलंबियामध्ये 63 टक्के उत्पादनावर परिणाम होईल, असेही म्हटले आहे.

coffee

निष्कर्ष काय

हा निष्कर्ष संशोधकांनी त्या प्रदेशातल्या मातीच्या गुणधर्मावर हवामान बदलाच्या प्रभावावर केलेल्या अभ्यासानुसार घेतला आहे. यामुळे कॉफीचे उत्पादन करणारी किंवा कॉफी पिकविणारी क्षेत्रांवर मोठा परिणाम होऊन ती शेतीसाठी योग्य ठरणार नाहीत. याविषयी झुरिच विद्यापीठाच्या नैसर्गिक संसाधन विज्ञान संस्थेच्या संशोधकांनी प्रकाशित केलेल्या विज्ञान पेपरमध्ये म्हटले आहे की, 'आम्ही जागतिक स्तरावर आणि मुख्य उत्पादक देशांमध्ये कॉफीबाबत भविष्यातील (२०५०) पर्यंत होणाऱ्या हवामान बदलाचे परिणाम तपासले. त्यानुसार तीन उत्सर्जन परिस्थीतींवर आधारित असलेल्या १४ जागतिक अभिसरण मॉडेल्सचे हवामान तपासण्यात आले आहेत.

एव्होकाडो,काजूवरही परिणाम होणार आहे.

अभ्यासातील निष्कर्षांनुसार दीर्घ कोरडा ऋतू, सरासरी तापमान (उच्च आणि निम्न) कमी किमान तापमान आणि वार्षिक पर्जन्यमान (उच्च आणि कमी) यासारख्या हवामान घटकांचे विश्लेषण केले. त्यानुसार कॉफीवर सर्वात जास्त परिणाम होणार असल्याचे दिसून आले आहे त्यामुळे कॉफीच्या किमतीही साहजिकच वाढतील. एकूणच अभ्यासातून असे दिसले की, कॉफी, अॅव्होकाडो आणि काजू या तीनही पिकांचे उत्पादन करणार्‍या बहुतेक प्रमुख क्षेत्रात हवामान बदलासाठी योग्य अनुकूलता गरजेची असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bageshwar Dham Update : Video - बागेश्वर धामबद्दल मोठी बातमी, सर्व कार्यक्रम रद्द ; आता धीरेंद्र शास्त्रींनी केले ‘हे’ आवाहन!

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

एनटीपीसी प्रकल्पग्रस्त मिथूनची आत्महत्या! खासदार प्रणिती शिंदेंच्या समजुतीनंतर १२ तासांनंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतला ताब्यात, प्रणिती म्हणाल्या....

Pune News : एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'च्या घोषणेने वादाला तुटले तोंड

SCROLL FOR NEXT