summer special drinks 
फूड

उन्हाळ्यात प्या Detox Drink| Summer Health

उन्हाळ्यात शरीर निरोगी ठेवणे खूप महत्वाचे आहे

सकाळ डिजिटल टीम

उन्हाळ्यात शरीर निरोगी ठेवणे खूप महत्वाचे आहे. अनेकदा आपले शरीर यकृत, घाम आणि लघवीमधून नैसर्गिकरित्या स्वतःला डिटॉक्स करते. पण, शरीरात विषाचे प्रमाण जास्त असल्यास आहारात बदल करून शरीर डिटॉक्स ठेवणे गरजेचे असते. अशावेळी डिटॉक्स ड्रिंक्स महत्वाची ठरतात. ही पेये उन्हाळ्याबरोबरच वजन कमी करण्यासाठी, निरोगी त्वचा आणि केसांसाठीही महत्वाची असतात. यासोबत, गॅस, बद्धकोष्ठता, चक्कर येणे आणि डोकेदुखी या समस्यांपासूनही सुटका मिळते.

Pudina-Sarbat

ही पेये ठरतील महत्वाची

काकडी- पुदीना- काकडीची सालं काढून काकडी बारीक कापा. त्यात १० पुदिन्याची पानं घालून मिक्सरमधून वाटून घ्या. चांगले गाळून घ्या. त्या रसात दोन चमचे लिंबाचा रस, काळं मीठ आणि बर्फ घालून गारेगार प्या.

डाळिंब- बीट- डाळींब- बीट कापून बारीक करा. त्यात कोरफडीच्या एका पानाचे जेल टाका. मिक्सरमधून वाटून घ्या. चांगले गाळून घ्या. काळे मीठ-मिरी घालून प्या.

नारळ पाणी

मध-लिंबू- तीन कप पाण्यात एक चमचा बारीक केलेले आले, एक चमचा चहा पावडर, एक चमचा लिंबाचा रस, एक चमचा मध घाला. हे मिश्रण उकळून घ्या आणि गाळा. गाळून लगेच प्या. प्यायल्यावर शरीरातले टॉक्सिन बाहेर पडण्यास मदत मिळेल.

लिंबू पुदीना- उन्हाळ्यात लिंबू पाणी शरीराला थंडावा तर मिळतोच पण, ते डिटॉक्सिफिकेशनसाठीही उत्तम आहे. एक ग्लास लिंबूपाणी बनवा आणि त्यात पुदिन्याची पाने टाका. हे पाणी अतिशय चांगले आहे.

नारळ पाणी, लिंबू- एका नारळातली मलाई आणि पाणी एकत्र करा. त्यात पुदीना, एक चमचा मध,लिंबू घालून एकत्र करा, हे डिटॉक्स ड्रिंक उन्हाळ्यात पिणे खूप फायद्याचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दरवर्षी बाळंतपण! वंशाला हवेत दोन दिवे; पाचव्यानंतर सहावं पोटात, डॉक्टरने पती-पत्नीला झापझाप झापलं; व्हिडीओ व्हायरल

'सुनेला सासरी जुळवून घे...' म्हणणं क्रूरता नाही; सुप्रीम कोर्टाचे मोठे निरीक्षण, वैवाहिक वादांत कायद्याचा गैरवापर टाळा

IPL 2026: Mumbai Indians च्या अपयशानंतर हार्दिक पांड्यानं उचललं मोठं पाऊल; जगभरातील चाहत्यांना बसला धक्का, नेमकं काय केलं?

Metro Lines 5A and 12A: कल्याण-नवी मुंबई प्रवास आणखी सोपा होणार! MMRDA नवे मेट्रो नेटवर्क उभारणार; मार्ग कसा असणार?

Pune Car Accident : पुण्यात पुन्हा 'ड्रिंक अँड ड्राईव्ह'चा थरार; दारूच्या नशेत 19 वर्षीय तरुणाने भरधाव चालवली कार, गाडी थेट गरवारे पुलावरून कोसळली खाली

SCROLL FOR NEXT