Smoothie for skin and digestion sakal
फूड

Summer Skin Glow: उन्हाळ्याच्या उकाड्यात त्वचेची काळजी घ्या या ‘डि-ब्लोट आणि स्किन ग्लोइंग स्मूदी’सोबत! पाहा व्हिडिओ

De-Bloat And Skin Glowing Smoothie: उन्हाळ्यात ब्लोटिंग कमी करत त्वचेला नैसर्गिक उजळपणा देणारी ही स्मूदी नक्की ट्राय करा – व्हिडिओ पाहा!

Anushka Tapshalkar

Best Summer Smoothie To Keep Skin Healthy and Hydrated: सतत वाढत असलेलं तापमान आणि कडक उन्हामुळे त्वचेची काळजी घेणं दिवसेंदिवस कठीण होत चाललं आहे. अशा वेळी शरीराला थंडावा देणाऱ्या आणि त्वचेला नैसर्गिक चमक देणाऱ्या काही घरगुती उपायांची गरज अधिक जाणवते. आज आपण अशीच एक सोपी आणि पौष्टिक स्मूदी पाहणार आहोत जी फक्त शरीरच स्वच्छ करत नाही तर त्वचेलाही आरोग्यदायी आणि चमकदार ठेवते. चला तर मग सोपी रेसिपी पाहूया.

साहित्य (1 व्यक्तीसाठी)

• ताज्या पुदिन्याच्या पानां – ८ ते १०
• अननस (चिरलेला) – १०० ग्रॅम
• काकडी (सोलून चिरलेली) – ८० ग्रॅम

• काळं मीठ – १/४ टीस्पून
• पाणी – २०० मि.ली.
• ओल्या सब्जाच्या बिया – १ टीस्पून (२ टेबलस्पून पाण्यात १० मिनिटं भिजवलेल्या)
• बर्फाचे तुकडे – आवश्यकतेनुसार

कृती

१. मिक्सरमध्ये पुदिन्याची पानं, अननसाचे तुकडे, काकडी, काळं मीठ आणि पाणी एकत्र घालून मिक्स करा.
२. मिश्रण गुळगुळीत आणि फेसाळ होईपर्यंत ब्लेंड करा.
३. सर्व्हिंग ग्लासमध्ये आधी सब्जाच्या बिया आणि बर्फाचे तुकडे घाला.
४. त्यावर तयार केलेलं मिश्रण ओता, ढवळा आणि थंडगार सर्व्ह करा.

फायदे

• पुदिना आणि काकडी पचन सुधारून पोट फुगण्याची समस्या कमी करतात.
• अननसामध्ये असणारे डाइजेस्टिव्ह एन्झाईम्स आणि व्हिटॅमिन C त्वचेला नैसर्गिक चमक देतात.
• सब्जा बिया शरीराला थंडावा देतात व हायड्रेशनसाठी उपयुक्त ठरतात.

उन्हाळ्यात आरोग्य आणि सौंदर्य दोन्ही जपण्यासाठी या नैसर्गिक स्मूदीचा नक्की समावेश करा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Opening Bell : नोव्हेंबरची सुरुवात घसरणीने! पण बाजारात पुन्हा तेजीचा सूर? जाणून घ्या शेअर बाजारातील घडामोडी

Gold Rate Today: खुशखबर ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने झाले स्वस्त, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

राजू शेट्टींना कन्नड भाषेतच बोलण्याचा आग्रह, मराठी बोलण्यास विरोध; कर्नाटकात शेतकरी नेत्याला बोलूच दिलं नाही, कन्नड संघटनांचा संताप

Pune Weather : पुणेकरांना मोठा दिलासा! सलग तीन दिवस पावसाची उघडीप कायम; मात्र तापमानाचा पारा ३० अंशावर

Alandi Weddings : गुरू-शुक्राच्या अस्तामुळे आळंदीत विवाह मुहूर्त कमी, कार्यालय बुकिंगला थंड प्रतिसाद

SCROLL FOR NEXT