Sunday Special Receipe esakal
फूड

Sunday Special Recipe : रविवार स्पेशल बनवा साऊथ इंडियन स्टाईल मसालेदार कोकोनट मिल्क राइस

म्हणूनच खास तुमच्यासाठी कोकोनट मिल्क राइसची ही रेसिपी

सकाळ डिजिटल टीम

Sunday Special Receipe : रविवार आहे,काहितरी वेगळं खावस वाटतं आहे; रोजच्या भाजी पोळीच नावही नको आहे.. असे काही विचार तुमच्याही मनात येत असतील ना? सुट्टीचा दिवस म्हटला की हे घडणारच... म्हणूनच खास तुमच्यासाठी कोकोनट मिल्क राइसची ही रेसिपी.

कोकोनट मिल्क राईस म्हटल्यावर तुम्हाला वाटेल की हा गोड भाताचा प्रकार आहे पण तस नाही; हा राईस साऊथ इंडियन स्टाईल ने सगळे मसाले घालून तयार केला जातो; बनवायला अगदी सोपा आणि खायला त्याहून दुप्पट चविष्ट!

साहित्य

1 कप तांदूळ

1 1/2 कप नारळाचे दूध

2 कप पाणी

2 टीस्पून आले-लसूण पेस्ट

1-2 हिरव्या मिरच्या

2 चमचे तेल

1 तमालपत्र

4 वेलची

6 लवंगा

1 दालचिनी

1 टीस्पून जिरे

चवीनुसार मीठ

कृती:

1.प्रेशर कुकरमध्ये तेल गरम करा आणि संपूर्ण मसाले जसे की जिरे, वेलची, दालचिनी, लवंगा, हिरवी वेलची आणि तमालपत्र परतून घ्या.

२.आलं-लसूण पेस्ट घालून मसाल्यांचा वास येईपर्यंत छान परतवा आता त्यात हिरव्या मिरच्या घाला.

3. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या देखील घालू शकता.

4. नारळाचे दूध आणि पाणी घाला. नंतर तांदूळ घाला आणि हे चांगले मिसळा. चवीनुसार मीठ घाला आणि उकळी फुटली की कुकरच झाकण बंद करा.

5. कमी आचेवर राईस शिजू द्या. फक्त एक 1 शिट्टी काढून राईस शिजल्याचा अंदाजा घेत गॅस बंद करा.

6. कोकोनट मिल्क राइस तयार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

IND vs WI, 2nd ODI: दुसऱ्या सामन्यापूर्वीच मोठी बातमी! पहिल्या वनडेत शतक केलेला खेळाडू संघातून बाहेर, कारण काय?

'जैसे तू है पास मेरे तेरे पास मे' योगिता चव्हाणचा डान्स पाहिलात का? स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून नेटकरी म्हणाले...Viral Video

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

SCROLL FOR NEXT