Tiranga Paratha Recipe Esakal
फूड

Tiranga Paratha Recipe: प्रजासत्ताक दिनानिमित्ताने बनवा खास पौष्टिक असा तिरंगा पराठा...

भारत आज 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे

सकाळ डिजिटल टीम

Republic Day 26 January : भारत आज 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान लागू झाले होते. भारताचा स्वातंत्र्यदिन ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाल्याचा उत्सव म्हणून तर प्रजासत्ताक दिन संविधानाच्या अंमलबजावणीचा उत्सव म्हणून आपण साजरा करतो. हिवाळ्यात बहुतेक घरांमध्ये पराठ्याला प्राधान्य दिले जाते. अशा परिस्थितीत तुम्ही तिरंगा पराठा रेसिपीने हा प्रजासत्ताक दिन खास बनवू शकता. आजच्या लेखात आपण तिरंगा पराठा कसा तयार करायची याची रेसिपी काय आहे ते जाणून घेऊया.

साहित्य

● पराठ्याच्या केशरी भागासाठी 

अर्धी वाटी गव्हाचे पीठ

गाजर प्युरी

चवीनुसार मीठ

● पराठ्याच्या हिरव्या भागासाठी 

अर्धी वाटी गव्हाचे पीठ

मटार प्युरी

चवी नुसार मीठ

● पराठ्याच्या पांढऱ्या भागासाठी 

अर्धी वाटी गव्हाचे पीठ

चवी नुसार मीठ

कृती

तिरंगा पराठा बनवण्यासाठी सर्वप्रथम मिक्सरमध्ये गाजर आणि मटारची प्युरी वेगवेगळी तयार करून घ्यावी. गाजर आणि मटारची प्युरी तयार करुन बाजूला ठेवा. यानंतर एका भांड्यात पीठामध्ये गाजर प्युरी आणि मीठ एकत्र करून मळून घ्यावे. दुसऱ्या भांड्यात मटारची प्युरी आणि मीठ पिठात मिसळून वेगवेगळे मळून घ्यावे. त्यानंतर त्याच भांड्यात मीठ घालून साधे पीठ मळून घ्यावे. आता तुमच्याकडे तिन्ही रंगांचे वेगवेगळे पीठ आहेत. आता तिन्ही पिठांचा एक छोटासा भाग घ्या आणि ते एकमेकांना सारखे दाबा. पीठ तिरंग्यासारखे कापून घ्यावे.नंतर गोळे पराठ्याच्या आकारात लाटून घ्यावे. गरम तव्यावर तेल लावून पराठा बेक करा. तुमचा चविष्ट तिरंगा पराठा तयार आहे. गरमागरम पराठा चटणी, लोणचे किंवा दहीसोबत सर्व्ह करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Special Sitting Schedule : संसदेचे ३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबरदरम्यान विशेष कामकाज! लोकसभा आणि राज्यसभेच्या बैठकांबाबत किरेन रिजिजू यांची अधिकृत घोषणा

Property Card: फ्लॅट खरेदी-विक्री करायचाय? मग ही बातमी वाचाच! सरकारच्या निर्णयाचा महाराष्ट्रातील ७ कोटी घरमालकांना होणार फायदा

IND A vs SL A, Semi-Final: वैभव-अभिषेकची वादळी खेळी अन् मग तिलक - शाहबाजची फिफ्टी; भारताचे श्रीलंकेसमोर मोठे लक्ष्य

Tirupati Balaji Temple Record Gold Donation : तिरुपती बालाजीच्या चरणी भक्तीचा अनोखा महासागर! चेन्नईच्या जैन दाम्पत्याने अर्पण केले तब्बल १२१ किलो सोने अन् २३८ कॅरेट हिरे; किंमत पाहून व्हाल थक्क!

Latest Marathi News Live Update: सैफ-शाहरुखसाठी वेगळे कायदे आहेत का? लव्ह जिहादच्या मुद्द्यावर आझम खान यांचे वादग्रस्त वक्तव्य

SCROLL FOR NEXT