Raw Mango Kadhi Recipe
Raw Mango Kadhi Recipe Esakal
फूड

Raw Mango Kadhi: जेवणात बनवा कैऱी ची कढी, चव चाखून मन होईल तृप्त

Kirti Wadkar

Raw Mango Kadhi Recipe: उन्हाळ्यात बाजारात किंवा फळांच्या दुकानाशेजारून जातान आंब्याचा दरवळणारा सुगंध आपलं लक्ष वेधून घेतो. उन्हाळा म्हंटलं की फळांचा राजा असलेल्या आंब्याची Mango मजा लुटण्याचा काळ. मग घराघरांमध्ये आंबे खाण्यासोबत आमरस पुरीची मजा बेत आखले जातात. Try Dry Mango Curry This summer Recipe in Marathi

उन्हाळ्यामध्ये Summer एकदा का बाजारात कैऱ्या Raw Mango आणि आंबे दिसू लागले की घरात आंब्याच्या वेगवेगळ्या रेसिपी Recipe तयार केल्या जातात. यात आंब्याचा मॅंगो मिल्कशेक, मॅँगो आइस्क्रिम किंवा शिरा असे पदार्थ तयार केले जातात.

कैऱी पासूनही अनेक पदार्थ तयार केले जातात. मग लोणच्यापासून Pickle पन्हं किंवा गुळांबा मोठ्या चवीने खाल्ला जातो. आज आम्ही तुमच्यासोबत कैरीची अशीच एक खास रेसिपी शेअऱ करणार आहोत.

आजवर तुम्ही दह्याच्या कढीचे वेगवेगळे प्रकार चाखले असतील. मात्र आज आम्ही तुमच्यासाठी कैरीची चमचमीत कढी कशी बनवावी याची रेसिपी शेअर करणार आहोत.

कैरी कढीसाठी लागणारं साहित्य

कैरीची कढी बनवण्यासाठी तुम्हाला २ मध्यम आकाराच्या कैऱ्या लागतील. यासोबतच २ चमचे तेल, १ चमचा मोहरी, ८-१० कढीपत्त्याची पानं, हळद, हिंग, २-३ लाल मिरची, मीठ, कोथिंबीर, १ कप नारळाचं दूध, २ चमचे बेसन

हे देखिल वाचा-

कैरी कढी तयार करण्याची रेसिपी

  • कैरीची कढी तयार करण्यासाठी सर्वप्रथम कैऱीची साल काढून त्याचे बारीक तुकडे करून घ्यावे.

  • त्यानंतर कैरी कुकरमध्ये २ शिट्या घेऊन चांगली शिजवून घ्यावी. कैरीचे तुकडे गार झाल्यानंतर एखाद्या चमच्याच्या मदतीने किंवा हाताने ते चांगले कुस्करून घ्यावे. कुस्करलेली ही कैरी आता बाजूला ठेवा.

  • फोडणीसाठी गॅसवर एक कढई ठेवा. कढईत २ चमचे तेल घाला.

  • तेल चांगल तापल्यावर त्यात मोहरी तडतडू द्या. त्यानंतर त्यात कढीपत्त्याची पानं आणि लाल मिरची टाका. त्यानंतर हळद आणि हिंग टाका.

  • यात आता बारीक कुस्करलेली कैरी कुकरमधील पाण्यासह टाका. तसचं यात आणखी २ कप पाणी टाका.

  • त्यानंतर चवीनुसार मीठ, एक चमचा साखर टाका........

  • .....आता एका वाटीत पाणी घेऊन त्यात २ चमचे बेसन किंवा तादळचं पीठ मिसळा. गुठळ्या राहणार नाही याची काळजी घ्या. हे मिश्रण हळू हळू कढईत सोडा

  • गॅस मध्यम आचेवर ठेवून ३-५ मिनिटांसाठी कढी चांगली उकळू द्या. अधूनमधून कढी ढवळत रहा.

  • त्यानंतर या कढीमध्य एक वाटी नारळाचं दूध घालून मंद आचेवर २-३ मिनिटांसाठी उकळू द्या.

  • यानंतर बारीक चिरलेली कोथींबीर टाकून गॅस बंद करा.

  • या कढीमध्ये तुम्ही हवं असल्यास कैरीचे काही बारीक तुकडे देखील टाकू शकता.

अशा प्रकारे कैरीची आंबट, तिखट आणि गोड चवीची चटपटीत कढी तयार होईल. या कढीचा आनंद तुम्ही गरमा गरम वाफाळलेल्या भातासोबत घेऊ शकता. खास करून फक्त उन्हाळ्याच्य दिवसांमध्ये कैऱ्या उपलब्ध असल्याने या मौसमात या कैरी कढीचा आनंद नक्की घ्या. ही कढी पचण्यासाठी देखील अत्यंत हलकी असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी रायबरेलीतून, तर किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवणार; काँग्रेसची यादी जाहीर

SCROLL FOR NEXT