kadipata chutney  sakal
फूड

Recipe: Heart Attack ची भीती वाटतेय? कढीपत्ता चटणी खा आणि Relax व्हा!

कढीपत्त्याची चटणी रेसिपी जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

सध्या सणावारांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं जेवण बनवलं जात अशात तुमच्या जेवणातल्या ताटात वेगवेगळ्या प्रकारच्या चटणींचाही समावेश असतो. आज आम्ही तुम्हाला कढीपत्त्याच्या चटणी कशी करायची याबद्दल सांगणार आहोत.

भारताच्या दक्षिणेकडच्या बहुसंख्य राज्यांमध्ये कढीपत्त्याचा भरपूर वापर केला जातो. खरं तर कढीपत्त्यामध्ये अनेक व्हिटॅमिन्स आणि इतर पोषक द्रव्यं असतात जे हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. एवढंच काय तर कढीपत्ता हा केसांच्या आरोग्यासाठीही उत्तम आहे. मग अशा कढीपत्त्याचा समावेश करणे आहारात करणे गरजेचे आहे. चला तर कढीपत्त्याची चटणी रेसिपी जाणून घेऊया. (try healthy kadipata chutney recipe)

कढीपत्त्याच्या चटणीचे साहित्य

१. २ वाट्या कढीपत्त्याची पानं

२. १ वाटी बिन पॉलिशचे तीळ

३. २ टीस्पून तिखट

४. मीठ चवीनुसार

५. २ टीस्पून तेल

कृती –
१) एका नॉनस्टिक पॅन किंवा कढईत तेल गरम करा. त्यात कढीपत्त्याची पानं घाला.
२) मध्यम आचेवर अधूनमधून परतत ती कुरकुरीत होऊ द्या. कुरकुरीत झाली की थंड करा.
३) तीळ लाल रंग येईपर्यंत भाजा.
४) कढीपत्त्याची पानं आणि तीळ त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करुन घ्या.
५) त्यात तिखट-मीठ घाला आणि पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवा. खुप बारीक पूड करू नका. ६) भाकरी, पराठे किंवा पोळीसोबत ही चटणी उत्तम वाटते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Middle Class: 5 मिनिटांत बँक बॅलन्स 43,000 रुपयांवरून 7 रुपयांवर आला; भाड्यापासून ते EMIपर्यंत.. मध्यमवर्ग आर्थिक संकटात

Latest Maharashtra News Updates : मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड चौफुलीवर असलेल्या अतिक्रमण काढले

Supreme Court: सरकारी बंगला रिकामा करून ताब्यात घ्या; माजी सरन्यायाधीशांच्या निवासस्थानाबाबत न्यायालयाचे पत्र

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT