food recipe sakal
फूड

नावडतं बीटही आवडू लागेल; जाणून घ्या 'ही' रेसिपी

बीट हे कंदमुळ असल्याने ते शरिराला अधिक पौष्टिक असते.

सकाळ डिजिटल टीम

प्रत्येकाला पौष्टिक अन्न खायला आवडतं मात्र अनेकदा नेमकं काय पौष्टीक खावं, हा प्रश्न पडतो. मात्र आज आम्ही तुम्हाला असा पदार्थ सांगणार आहोत जो अत्यंत पौष्टीक आणि तुमच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. (try super healthy breakfast check recipe of beet thalipeeth)

पावसाळा सुरु झाला की बाजारात मस्त बीट यायला सुरुवात होते. बीट हे कंदमुळ असल्याने ते शरिराला अधिक पौष्टिक असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला बीटाचे थालीपीठ सांगणार आहोत. चला तर मग बघू या की कसे तयार करायचे बीटाचे थालीपीठ..

बीटचे थालीपीठ बनवण्यासाठी लागणारे साहित्य

1) बीट-दोन

2) गव्हाचे पीठ -एक वाटी

3) बाजरी पीठ -एक वाटी

4) ज्वारी पीठ - एक वाटी

5) बेसन पीठ – दोन चमचे

6) दोन छोटे चमचे रवा

7) एक चमचा शेंगदाण्याचा कूट

8) आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट १ चमचा (आवडीनुसार कमी जास्त हिरवी मिरची टाकणे )

9) कोथिंबीर

10) मीठ,तेल

11) एक कांदा

बीटचे थालीपीठ बनवण्याची कृती

  • सर्वप्रथम आपण १ वाटी गहू पीठ,१ वाटी बाजरी पीठ ,१ वाटी ज्वारी पीठ ,२ चमचे बेसन पीठ ,२ चमचे रवा ,१ चमचा शेंगदाण्याचा कूट हे सर्व एकत्र घेऊया.

  • त्यानंतर आपण या मिश्रणात बारीक चिरलेला कांदा टाकू ,त्यानंतर आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट टाकू तसेच कोथिंबीर आणि मीठ चवीनुसार टाकुन हे पिठ चांगल एकत्र करुन घेऊ या.

  • सगळ्यात शेवटी दोन बीट स्वच्छ धुवून नंतर किसनीने किसून आपण हा बीटाचा किस वरील मिश्रणात टाकूया आणि हे सर्व मळून घेऊ हे गरजेनुसार पाणी टाकुन हे पिठ भिजवुन घ्या .

  • नंतर गॅस वर तवा ठेवावा व थोडे तेल पूर्ण तव्यावर पसरावे नंतर पाणी हाताला लावून थालीपीठ मिश्रणाचा गोळा घेऊन तो तव्यावर थापावा दोन्ही बाजूने ते लालसर होईपर्यंत भाजुन घ्यावा.

  • तुम्ही रुमाल ओला करून त्यावर थालीपीठ मिश्रणाचा गोळा घेऊन तो थापून मग तव्यावर थालीपीठ असणारी बाजू तव्यावर टाकावी व अलगद रुमाल दोन्ही हातांनी काढून घेऊ.

  • दोन्हीपैकी जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल ती वापरून तुम्ही थालीपीठ करु शकता.

  • तुम्ही हे बीटचे थालीपीठ दही, लोणचे किंवा तिळाची चरणी यासोबत खाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

भाई, हा तर हार्दिक पांड्याची पोल खोलतोय! R Ashwin नं नाव न घेता Mumbai Indians च्या कर्णधाराला धुतले, Video Viral

Pune Kolwan ashram suicide: कोळवणच्या चिन्मय विभूती आश्रमात २५ वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात खळबळ

Rajgad Drowning Case: गुंजवणी धरणात बुडालेला दुसरा मृतदेह सापडला;दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू,राजगड तालुक्यातील हृदयद्रावक घटना!

Pune Canal Body Found: जारकरवाडीतील डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यातील मृतदेहाची टी-शर्टवरील नावाच्या धाग्याने उकल

SCROLL FOR NEXT