Karanji Vada Recipe esakal
फूड

Diwali Recipe : यंदाच्या दिवाळीला बनवा अनोखा करंजी वडा; जाणून घ्या रेसिपी

सकाळ डिजिटल टीम

Diwali Recipe : दिवाळी जवळ आली की सर्वत्र फराळ तयार करण्याची लगबग सुरु होते. मात्र या जंकफुडच्या काळात घरातील लहान मुले या पारंपारिक फराळाकडे सरळ नाक मुरडतात. याच अनुभवातून एका आईने या दिवाळीनिमीत्त करंजीचे रुपांतर वड्यामध्ये केले आहे. नाशिक येथील अनघा धोडपकर यांनी हा करंजी वडा तयार केला आहे. यानिमीत्ताने घरातील मुले दिवाळीतील फराळाचा आस्वाद करंजी वड्याच्या रुपाने घेतील असे त्या सांगतात. चला तर मग त्यांनी बनविलेल्या या करंजी वडाची स्पेशल रेसिपी जाणून घेऊ.

(Unique Karanji Vada Diwali Festival Recipe 2022)

करंजी वडा बनविण्यासाठी साहित्य -

मैदा- वाटी, रवा - अर्धा वाटी, दूध - १ वाटी, तुप - १ वाटी, खोबऱ्याचा किस - २०० ग्रॅम, गुळ - २५० ग्रॅम, मीठ, तेल - २५० ग्रॅम, काजु, बदाम.

कृती -

सर्वप्रथम 2 वाटी मैदा घेऊन त्यामध्ये अर्धा वाटी रवा घालावा. यात तुप गरम करुन त्याचे मोहन घालावे. यासह चवीपुरते मीठ अन् दुध कोमट करुन त्यात घालावे व दुधाच्या सहाय्याने करंजी वडासाठीचे पीठ मळून घ्यावे. यात पाण्याचा वापर करु नये. पीठ मळल्यानंतर ते ओल्या कपड्यात २ तास झाकून ठेवावे म्हणजे ते चांगले मुरेल. तोवर आपण यासाठी लागणारे सारण तयार करुया.

गॅस वर कढई ठेवावी, त्यात दोन चमचे तुप घालावे. यात गुळ अन् खोबऱ्याचा किस घालून हे सारण मंद आचेवर छान सोनेरी रंग येई पर्यंत परतून घ्यावे. या सारणाला सोनेरी रंग आल्यानंतर गॅस बंद करावा. काजु, बदामचे बारीक तुकडे करुन यात घालावे. करंजी वडा साठीचे आपले सारण तयार आहे.

यानंतर आपण मुरवण्यासाठी ठेवलेले पीठ घ्यावे. त्याच्या पुरीच्या आकाराच्या दोन पोळ्या लाटून एका त्यातील एका भागावर तयार केलेले सारण घालावे. सारण घालताना अजिबात कंजुसी करु नये. कारण या सारणामुळेच याला वड्यासारखा आकार येणार आहे. त्यानंतर दुसरी पोळी त्यावर ठेवावी. त्यांच्या किनारांना दुधाचा हात लावून ते एकमेकांना चिकटवावे व फोर्कच्या साहाय्याने त्याची किनार व्यवस्थित दाबुन घ्यावी.

अशाप्रकारे तयार केलेल्या पिठ आणि सारणाचे अजुन वडे तयार करुन घ्यावे यानंतर गॅसवर कढई ठेवून त्यात २५० ग्रॅम तेल घालावे. तेल गरम झाल्यावर मंद आचेवर तयार केलेले वडे तळून घ्यावे. छान सोनेरी रंग आल्यानंतर ते कढईतू काढून घ्यावे. अशा रितीने छान असे करंजी वडे आपले तयार होतील. यंदाच्या दिवाळीला खमंग अन् चविला गोड असणाऱ्या करंजी वड्यांचा संपुर्ण कुटुंबाने आस्वाद घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP आंदोलनातील धरपकडीची संयुक्त राष्ट्रांकडून दखल; आंदोलकांना ताब्यात घेतल्याबद्दल चिंता व्यक्त, भारताचे प्रत्युत्तर!

Jayasri Burman Paintings : जयश्री बर्मन यांच्या चित्रांत पुराणकथा आणि निसर्गाचे अनोखे विश्व

Crime News: कड्यावरून ढकलून प्रेयसीचा केली हत्या;लग्न ठरल्यामुळे भेटण्यास टाळाटाळ केल्याने कृत्य

RICH ZODIAC SIGNS 2027: २०२७ मध्ये ‘या’ राशींचं नशीब चमकणार! मेहनतीला मिळेल भाग्याची साथ, अचानक होऊ शकतो मोठा धनलाभ

Maharashtra Weather Update : मॉन्सूनची महाराष्ट्रातून माघार, तापमानाचा पारा ३९ अंशांपार, ६ जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT