panipuri shake esakal
फूड

Viral Video : पाणीपुरीचा शेक कसा पिणार! हाईटच झाली राव

हा व्हिडिओ पाहून पाणीपुरी प्रेमी नाराज झाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

दर आठवड्याला कोणत्याना कोणत्या पदार्थावर प्रयोग करून त्याची पार वाट लावली जाते आहे. पाणीपुरी आईस्क्रीम, मसाला डोसा आईस्क्रीमनंतर (Icecream) आता चक्क पाणीपुरीचा शेक व्हायरल झाला आहे. पाणीपुरीवर झालेला असा अत्याचार बघून पाणीपुरीप्रेमी नाराज झाले आहेत. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर फूडी ब्लास्टने शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्याने असंही होऊ शकतं का?अशी कॅप्शन दिली आहे. हा व्हिडिओ (Viral Video) चांगलाच व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर (Social Media)व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दुकानदार पाणीपुरी, आंबट पाणी आणि चटणी एकत्र करून त्याचा पाणीपुरी शेक करताना दिसतो आहे. ते करण्यासाठी त्याने आधी मिक्सरमध्ये पाणीपुरी टाकली. मग त्यात बारीक केलेले बटाटे, आंबट पाणी आणि चटणी टाकून सगळं मिक्सरमधून एकत्र करतो आणि ग्लासात भरून देतो. व्हिडिओमधील माणूस तिथेच थांबत नाही तो नंतर पाणीपुरीच्या पुऱ्या वरून चुरून टाकतो आणि ग्लास प्यायला देतो. हा व्हिडिओ बघून अनेकांना कसतरीच वाटलं आहे. पाणीपुरीची अशी वाट लावल्याने लोकांनी डोक्याला हात मारून घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT