वडापाव नुसतं म्हटलं जरी तरी तोंडाला पाणी सुटते. हल्ली गल्लो गल्ली वडापावचे स्टॉल दिसतात. प्रत्येक ठिकाणची, प्रांताची आपापली ओळख घेऊन हा वडापाव फेमस झाला आहे. दरवर्षी २३ ऑगस्ट हा जागतिक वडापाव दिवस म्हणून साजरा केला जातो. पण याची खरी सुरूवात मुंबईला झाली हे सगळ्यांना माहित आहे. म्हणून मुंबई वडापावला वेगळी ओळख ती आहेच. पण तुम्हाला माहित आहे का, या वडापावचा जन्म झाला कसा?
वडापावची रंजक काहाणी
तोंडाला पाणी आणणाऱ्या या वडापावचा शोध १९६० मध्ये अशोक वैद्य (Ashok Vaidya) यांनी लावला. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी महाराष्ट्रातील (Maharashtra) जनतेला दाक्षिणात्य लोकांप्रमाणे उडपी रेस्टॉरंट सुरु करुन उद्यमी बननण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाने प्रेरित झालेल्या वैद्य यांनी दादार रेल्वेस्थानकाच्या बाहेर (१९६६) वडा आणि पोहा स्टॉल सुरु केला. त्याचबरोबर ऑम्लेट पाव ही विकायचे. एकेदिवशी त्यांनी वडा पावमध्ये टाकून त्यावर काही चटणी टाकली. यातून वडापावचा जन्म झाला.
त्यानंतर वडापाव कमी काळात लोकप्रिय खाद्यपदार्थ बनला. १९७० ते ८० दरम्यान अनेकदा संप झाले. त्यामुळे वस्त्रोद्योगाचे कारखाने बंद पडली. परिणामी अनेक बेकार झालेल्या कामगारांनी वडापाव स्टॉल्स सुरु केले. याला शिवसेनेने प्रोत्साहन दिले. कामाला जाणाऱ्या वर्गाचे स्नॅक म्हणून वडापावची ओळख निर्माण झाली. स्वस्त आणि खाण्यास सोयिस्कर. यामुळे लोकांमध्ये वडापावची लोकप्रियता वाढली. दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे देखील वैद्य यांच्या वडापावचे नियमित ग्राहक होते. यातून दोघांची मैत्री झाली. ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वैद्यांना त्रास न देण्याचे बजावले होते.
१९९० मध्ये अमेरिकन फास्ट फूड चेन मॅक्डॉनल्ड भारतात आली आणि मोठ्या प्रमाणावर त्याचा विस्तार झाला. पण त्याचा महाराष्ट्रातील वडापाववर काही परिणाम झाला नाही. कारण मॅक्डॉनल्डचे बर्गर हे प्रमाणित रेसिपी होती. त्यासाठी वेगवेगळ्या सामुग्री वापरल्या जात. यामुळे सर्व बर्गरची सारखीच चव लागायची. मात्र वडापाव बाबत अस काही नव्हतं. बहुतेक विक्रेत्यांचे म्हणणे की त्यांची वडापाव रेसिप इतरांपेक्षा वेगळी असते. भारतातील विविधतेचा तो परिणाम आहे.
वर्ष २००० मध्ये मुंबई येथील उद्योगपती धीरज गुप्ता आर्थिक संधी पाहत वडापाव चेन जम्बोकिंग सुरु केले. त्याची भारतीय बर्गर म्हणून त्यांनी जहिरात केली. अल्पवधी काळात मुंबईत ७५ दुकाने गुप्ता यांनी सुरु केले. यातून दररोज ५०० वडापाव विकले जात होते. आजच्या घडीला भारतात वेगवेगळ्या वडापाव चेन सुरु झाले आहेत. मात्र मुंबईकरांचे रस्त्यावरील वडापाव वरचे प्रेम कमी झालेले नाही. २०१५ मध्ये, दिग्दर्शक अलमबयान सिद्धार्थ यांनी पाच मिनिटांचा वडापाव इंक नावाचा लघुपट बनवला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.