Ganeshotsav 2022
Ganeshotsav 2022 esakal
ganesh article

Ganeshotsav 2022: टिळक की भाऊ रंगारी कोणी केली गणेशोत्सवाची सुरुवात?

सकाळ डिजिटल टीम

Ganeshotsav 2022: गणेशोत्सव म्हणजे आनंद ,गणेशोत्सव म्हणजे उत्साह. मग तो लालबागचा राजा असो किंवा पुण्यातील दगडूशेठ गणपती किंवा मग एखाद्या गावातल्या चौकातला गणपती. लहानापासून मोठ्यापर्यत अगदी सगळेच गणेशोत्सवाची आतुरतेने वाट बघत असतात. मात्र सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात टिळकांनी केली की भाऊ रंगारी? हा वाद आजही दिसून येतो.

गणेशोत्सव म्हणजे आनंदाची पर्वनी असते.१८९४ ला पुण्यात लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरूवात केली. गणेशोत्सव आणि शिवजयंती साजरी करण्यापाठीमागे जनतेत एकजुटता निर्माण करणे हे खरे कारण होते. कारण ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी भारतीयांनी एकत्र असणे लोकमान्य टिळकांना महत्वाचे वाटत होते. त्यामुळे टिळकांनी गणेशोत्सव सुरू केल्याचे अनेकांना माहिती आहे.

१८९४ साली विंचूकर वाड्यात लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात केली तर भाऊसाहेब रंगारी यांनी १८९२ साली सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती ,असे रंगारी यांचे वंशज संजीव जावळे सांगतात. परंतु इतिहासाचे अभ्यासक मंदार लवटे यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात १८९३ ला झाल्याचे मत मांडले आहे.

भाऊसाहेब रंगारी ,विश्वनाथ खाजगीवाले आणि गणेश घोटावडेकर यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती. १८९३ ला केसरीमध्ये लेख लिहून याची नोंद घेतली होती असेही म्हणले आहे. एक गाव एक गणपती या संकल्पनेने सुरू झालेल्या उत्सवाने आता वेगळे स्वरुप धारण केले आहे. चौकाचौकात गणपती मंडळाची स्थापना अशी नवीन प्रथा सुरु झाली आहे. सध्या एकट्या पुणे शहरात २२६९ इतकी गणेश मंडळाची संख्या आहे.

कोरोना काळात ,काळाची गरज लक्षात घेऊन उत्सवाचे स्वरुप अंत्यत साधे ठेवले होते. पंरतु या दीर्घ काळाच्या प्रतिक्षेनंतर नव्या उमेद आणि आकांक्षेसोबत आनंदाने यावर्षी गणेशोत्सव साजरा केला जात आहे. उत्सवाच्या काळात विविध गणेश मंडळानी सादर केलेले देखावे,ढोल -ताशांनी सज्ज पथके,गणेशाच्या दर्शनासाठी लोकांची उडालेली झुंबड,पोलिसांची पथके,पोलीस मित्र,खरेदी विक्रीसाठी लोकांची सुरु असलेली घाई गडबड,अनेक सुंदर हस्तकला,खवय्यांची खवय्येगिरी या सगळ्याची रेलचेल सुरु असते. परंतु या सगळ्यात लक्ष वेधून घेतात त्या म्हणजे विविध चेहऱ्यावर विविध भाव असलेल्या गणेशाच्या मूर्ती.

आकर्षक सजावट,तितकाच आकर्षक पोशाख आणि त्याच्या चेहऱ्यावरचे शांत ,प्रसन्न भाव .तुम्ही आस्तिक असा किंवा नास्तिक ,तुम्ही गणेशाचे भक्त असा किंवा नसा पण ढोल -ताशाचे आवाज तुमच्यात नवीन उत्साह संचारतात.रस्त्यावरची गर्दी काहीतरी नवीन शिकवते. गुजरातवरुन बहुल्या विकायला आलेली ताई असो किंवा कर्नाटक वरुन बासरी विकायला आलेला दादा असो त्यांच्या लहान मुलांचे इवलेसे चेहरे कितीतरी कहाण्या सांगतातआणि निरागस डोळे काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतात.

गर्दी सांभाळण्यासाठी चालू असलेली पोलिसांची गडबड देखील पाहण्यासारखी असते.याच गर्दीत तुम्हाला कधी बेभान असलेली तर कधी मदतीचा हात पुढे तरुणाई पाहायला मिळते. याच गर्दीत तुम्हाला चोरही भेटतात आणि भक्तांच्या चेहऱ्यावरचा निखळ आनंददेखील.असे उत्सव नव्या अनुभवांनी समद्ध करतात एवढं मात्र खरं.

Blog: निलम पवार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : अर्चना पाटील यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदी यांच्या धाराशिवमधील सभेला सुरुवात

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी बेस्ट आहे चिकनकारी कुर्ती, अशा पद्धतीने करा स्टाईल

Credit Card: ग्राहकांना मोठा फटका! 1 मे पासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे होणार महाग; किती वाढणार खिशावरचा भार?

T20 World Cup 2024 : IPL दरम्यान वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया होणार अमेरिकेला रवाना! तारीख आली समोर

Prajwal Revanna : 'मुलगा खोलीत तर बाप दुकानात बोलवायचा...', माजी पंतप्रधानांच्या नातवाचा सेक्स स्कँडल, कोण आहे प्रज्वल रेवण्णा?

SCROLL FOR NEXT