Ganeshotsav  esakal
ganesh article

Ganeshotsav : चुकूनही गणेशाची मूर्ती लक्ष्मीच्या डावीकडे ठेऊ नका, नाहीतर...

वास्तूशास्त्रात देव्हाऱ्यात देव कसे ठेवावे याविषयीचेही शास्त्र सांगितले आहे. ते लक्षात घेऊन योग्य दिशेला मूर्ती ठेवल्यास सकारात्मक बदल दिसतात. जाणून घेऊ या वास्तू टिप्स.

सकाळ डिजिटल टीम

हायलाइट्स

  • घरात लक्ष्मीची मूर्ती ठेवण्याची खास विधी

  • वास्तूशास्त्रानुसार अशा ठावतात लक्ष्मी-गणेशाची मूर्ती

  • वास्तूनुसार लक्ष्मी-गणेशाच्या मूर्तीसोबत असे करू नये.

वास्तूशास्त्रात गणपती आणि लक्ष्मी यांना शुभ आणि लाभाचे प्रतिक मानले जाते. म्हणूनच वास्तूशास्त्रातले तज्ज्ञ या मूर्त्यांना योग्य दिशेला ठेवण्यावर भर देतात. जर लक्ष्मीची मूर्ती योग्य दिशेला ठेवली तर लाभ होतो. जाणून घेऊया कोणती योग्य दिशा आहे.

लक्ष्मी गणेशाची मूर्ती सोबत ठेवावी

हिंदू धर्मानुसार गणेश बुध्दी आणि ज्ञानाची देवता मानली जाते. तर लक्ष्मी धनाची व ऐश्वर्याची देवी म्हणून पूजली जाते. ऑफीस, घर कूठेही लक्ष्मी-गणेशाची मूर्ती नेहमी सोबत ठेवतात. या मूर्त्या सोबत ठेवण्यामागे कारण आहे. जर माणसाकडे ज्ञान नसेल तर धन असूनही त्याचा योग्य वापर होणार नाही. म्हणूनच या मूर्त्या एकत्र हव्यात.

देव्हाऱ्यात या दिशेला ठेवाव्या लक्ष्मी गणेश मूर्त्या

घरातील देव्हाऱ्यात उत्तर दिशेला या मूर्त्या ठेवायला हव्यात. यामागे एक कथा आहे. कथेनुसार एकदा रागात भगवान शंकराने गणेशाचे शीर धडापासून वेगळे केले होते. हा आपलेच पूत्र आहे हे जेव्हा त्यांना कळले तेव्हा त्यांनी दूतांना पाठवून सांगितले की, उत्तर दिशेला जा आणि जो सगळ्यात पहिले दिसेल त्याचे शीर घेऊन या. दूतांना उत्तर दिशेला सगळ्यात पहिले हत्ती भेटल्याने त्याचे शीर ते घेऊन आले. म्हणून उत्तर दिशा शुभ मानली गेली आहे.

मूर्ती ठेवताना ही चूक अजिबात करू नका

बऱ्याचदा लोक अज्ञानीपणे लक्ष्मीची मूर्ती गणेशाच्या डावीकडे ठावतात. ही स्थिती चांगली मानली जात नाही. यामुळे आर्थिकस्थितीवर वाईट परिणाम पडू शकतो असे मानले जाते. मान्यतेनुसार पतीच्या डावीकडे पत्नीला बसवले जाते. पण लक्ष्मी गणेशाची पत्नी नाही. म्हणून लक्ष्मीची मूर्ती गणेशाच्या डावीकडे ठेवल्याने आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम होऊ शकतो. म्हणून गणेशाच्या डावीकडे न ठेवता उजवीकडे ठेवावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचा पुन्हा दणका! थेट BMC मुख्यालयातील कॅन्टीन सील; राज्यभर कारवायांचा धडाका

Solapur News: मंगळवेढ्यात वंचित बहुजन आघाडीचा बंद; दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील पोलिस कारवाईचा निषेध

Latest Marathi Update : 'युवकांच्या भविष्यासाठी राजकारण नको; चर्चेत अडथळे आणू नका', सर्व पक्षांना किरेन रिजिजू यांचे आवाहन

IND vs ZIM 1st T20I : पहिल्या सामन्यापूर्वीच धक्का, फलंदाजाची दुखापतीमुळे माघार, बोर्डाने जाहीर केली रिप्लेसमेंट... नेमकं काय घडलं?

तेजश्री प्रधानची बहीण पाहिली? अभिनेत्रीनं शेअर केलेले फोटो पाहून म्हणाल, 'अरे ही डिक्टो कॉपी-पेस्ट'

SCROLL FOR NEXT