Ganeshotsav 2022
Ganeshotsav 2022 Esakal
ganesh article

Ganeshotsav: वक्रतुंड महाकाय आणि तुम्ही; वाचा आधुनिक अर्थ

सकाळ डिजिटल टीम

वक्रतुंड महाकाय। सूर्यकोटि सम प्रभ।

निर्विघ्न कुरु मे देव। सर्व कार्येषु सर्वदा॥

गणेशोत्सवात सदैव आपल्या कानावर ऐकायला येतो तो मंत्र वरील प्रमाणे आहे.

गणपती म्हणजे गणांचा अधिपती!

वेदांनी सांगितल्याप्रमाणे तीन गण आहेत. विज्ञानात इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन असे तीन कण आहेत जे एका मूलद्रव्याचे भाग असतात. या तीन कणांना जो नियंत्रणात ठेवतो तो तीन गणांचा अधिपती म्हणून गणपती. आता आपल्या शरीरामध्ये देखील तीन गण/गुण आहेत. ते म्हणजे कफ, पित्त, वात विकार आणि सत्व, रज,तम हे त्रिगुण. उत्पत्ती स्थिती लय या तीन अवस्था संपूर्ण विश्वाचे नियमन करतात. तर हा सगळा त्रिगुणांचा खेळ आहे. उत्तम जीवन जगण्यासाठी या सर्वांचे संतुलन ठेवून त्यावर विजय मिळवणे आवश्यक असते. त्यावर जेव्हा आपण विजय मिळवतो तेव्हा आपण या गणांचे अधिपती म्हणजे आपणच स्वतः गणपती होतो.

या श्लोकातील ही सर्व रुपे म्हणजे आपल्या जीवनातील विविध अंगांची रुपके आहेत. या रुपकांचे आधुनिक अर्थ करे लावता येतील ते पाहू.

वक्रतुंड शब्दाचा अर्थ

आपण कसे आहोत? तर वक्रतुंड, या रूपकांमध्ये आपण जे गणपतीचे गजरूप पाहतो. आहे. यात तुंड म्हणजे हत्तीचे तोंड अर्थात त्याची सोंड आहे. ही सोंड आपल्या विचारधारेचं प्रतिक आहे. ती साम्यवादी असते, कोणाची उजवी तर कोणाची डावी. अशा रीतीने प्रत्येक व्यक्ती यापैकी कधी उजव्या सोंडेची, किंवा डाव्या सोंडेची किंवा सरळ सोंडेची असते.

महाकाय शब्दाचा अर्थ

आपल्या स्वतःच्या शक्तीची ओळख करून घ्या. आपण जे विचार करतो ते प्रचंड ताकदीचे असतात. आपली शारीरिक आणि बौद्धिक क्षमता प्रचंड आहे. तिचा योग्य वापर करून व्यक्ती विश्वाला गवसणी घालू शकते. बुद्धी आणि शक्ती या आधारे मनुष्यप्राणी आज ब्रह्मांडाला भेदत अवाढव्य दुर्बिणींद्वारे विश्वाचा अदमास घेण्याचा प्रयत्न करत. हे मानवी क्षमतांचा महाकाय स्वरूपाचंच उदाहरण आहे.

सूर्यकोटि सम प्रभ शब्दाचा अर्थ

आपली शक्ती आपली ऊर्जा ही सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे. संशोधक आणि अभ्यासू वृत्ती, जिद्द आणि कष्ट या जोरावर आपण सूर्याप्रमाणेच तेजस्वी कर्तृत्व करू शकतो असा अर्थ इथे अभिप्रेत आहे.

निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा अर्थ

कोणताही संकल्प केला, कामे हातात घेतली की त्यामध्ये अडचणी येणारच. पण अनेकदा आपण कामाच्या सुरुवातीलाच विचार करतो की कसं होणार? किती अडचणी येतील? काम पूर्ण होईल ना? मग आपण श्री गणेशाला प्रार्थना करतो की माझी सर्व कामे कोणत्याही अडचणींशिवाय पार पडावीत. पण हे साध्य कसे होणार? तर यासाठी आपल्याला आपल्या शक्तीची ओळख हवी. ज्याला SWOT (strengths, weakness, opportunities, threats) म्हणतात यांचा अभ्यास आपण करायला हवा, त्याची नीट जाणीव आपल्याला हवी. म्हणजे वेळीच येणाऱ्या संकटाचा अंदाज घेऊन त्याला तोंड देण्यासाठी आपण सज्ज राहू शकतो. देव त्यालाच मदत करतो जो स्वत:ला मदत करतो, हे आपल्याला माहिती आहेच. त्यामुळे या प्रार्थनेतला हा गर्भितार्थ देखील ध्यानात घेतला पाहिजे. जेव्हा आपण आपल्यातच असलेल्या गणपतीचे अस्तित्व मान्य करतो, आपलेच या त्रिगुणांवरील आधिपत्य मान्य करतो आणि त्यातील अमर्याद शक्ति आणि शक्यतांची आपल्याला जाणीव होते तेव्हा आपल्यातील गणपती म्हणजे आपणच आपली कार्ये सुरळीत पार पाडतो.

आखूवाहन

आखू म्हणजे उंदीर. एवढ्या महाकाय, तुंदीलतनू अशा गणपतीचे वाहन छोटासा उंदीर असावे हे थोडे वेगळेच वाटते. पण हे रुपक समजून घेतलं तर त्याचा अर्थ अगदी समज समजेल. मुळात उंदीर म्हणजे भूगर्भात, बिळात, म्हणजे गुप्त जागी राहणारा प्राणी आहे. उंदीर माणसाला चावण्याआधी फुंकर घालतो, यामुळे माणसाला थंड वाटते आणि त्या संधीचा गैरफायदा घेऊन उंदीर माणसाला चावतो. अशीच आपल्या आजूबाजूला विविध प्रकारे मोह, माया, प्रलोभने, फसवी आश्वासने, भुलथापा, वाईट प्रवृत्ती ठिकठिकाणी दडलेली असतात.

फुंकर घालून ती आपल्यासमोर आरामदायी आभास निर्माण करतात. कुठल्या रूपात ती समोर येतील हे सांगता येत नाही. अगदी छोटासा SMS किंवा ओटीपी सुद्धा मोठी फसवणूक होण्यास कारणीभूत ठरतो. म्हणजेच विविध संकटांना आमंत्रण देणारी कारण लहान लहान रूपं प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे आपल्या अवतीभवती असतात, आपला पाठलाग करीत असतात. गणपती असा संदेश देतो की या छोट्या छोट्या प्रलोभनांवर, या उंदरावर स्वार व्हा. म्हणजेच त्यावर नियंत्रण मिळवा, त्याला बळी पडू नका तर त्यापासून स्वत:चा बचाव करा.

लेखन - चंद्रकांत शहासने

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Janhvi Kapoor: मराठी कलाकारांच्या मुस्काडात... गांधी-आंबेडकरांवरील जान्हवीच्या 'त्या' विधानानंतर किरण मानेंची पोस्ट व्हायरल

Loksabha Election 2024 : राजधानीत मोदी विरुद्ध केजरीवाल लढत; दिल्लीत आज मतदान

Bankura Loksabha Election : कम्युनिस्टांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा प्रभाव

Sharad Pawar : दुष्काळाबाबत सरकार गंभीर नाही

SSC HSC : दहावी-बारावीची ग्रेड पद्धत होणार बंद

SCROLL FOR NEXT