Ganeshotsav 2022 esakal
ganesh article

Ganeshotsav 2022: बाप्पाच्या दर्शनासाठी जाताना मोदक, पेढ्यांशिवाय ५ हेल्दी पर्याय

नातेवाईक-मित्रमंडळींकडे बाप्पाच्या दर्शनासाठी जाताना प्रसाद म्हणून काय न्यायचे? हा मोठा प्रश्न असतो. त्यासाठी आम्ही देत आहोत ५ हेल्दी पर्याय.

सकाळ डिजिटल टीम

बाप्पा सगळ्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यामुळे एकमेकांच्या घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेणे, साजावट बघणे, आप्तेष्ठांच्या भेटीगाठी या ओघानेच येणाऱ्या गोष्टी असतात. अशावेळी बाप्पासाठी आणि घरातल्या लहानग्यांसाठी आपण आवर्जून काहीतरी खाऊ, प्रसाद घेऊन जातो.

आता गणपती किंवा गौरीला कोणाकडे जाणार म्हटल्यावर आपण गोड काहीतरी न्यायला हवं असा आपला समज असतो. मग पेढे, बर्फी, मोदक असं काही ना काही घेतलं जातं. मात्र कोणाकडे जाताना नेहमी गोड काहीतरी घेण्यापेक्षा वेगळे काही पर्याय असू शकतात का याचा आवर्जून विचार व्हायला हवा. त्यापेक्षा हेल्दी आणि थोडे वेगळे असे कोणते पदार्थ आपल्याला दुसऱ्यांकडे जाताना नेता येऊ शकतात. जाणून घेऊ

फळं

फळं हा केव्हाही अतिशय हेल्दी आणि सगळ्यांना चालणारा पर्याय असतो. आरोग्यासाठी उपयुक्त असलेली फळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खाता येतात. त्यामुळे प्रसाद म्हणून आपण फळं नक्की नेऊ शकतो.

खजूर किंवा खजूराची बर्फी

इतर कोणती बर्फी नेण्यापेक्षा खजूराची बर्फी किंवा अगदी नुसता खजूर नेला तरी चालतो. खजूरामध्ये लोह चांगल्या प्रमाणात असल्याने सगळ्यांसाठीच हा पर्याय उत्तम ठरतो. उपवासाला किंवा जाता येता कधीही खजूराच्या २ बिया तोंडात टाकल्या तर एनर्जी आल्यासारखे होते.

दाण्याचे लाडू किंवा चिक्की

दाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स असतात. बाप्पाला साधारणपणे गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवत असल्याने दाण्याची चिक्की किंवा लाडू हा उत्तम पर्याय ठरु शकतो. एक लाडू खाल्ला की आपल्याला एनर्जी आल्यासारखे होते. हे लाडू घरी करणेही अगदी सोपे असतात किंवा हल्ली बाजारातही चांगल्या प्रतीचे लाडू किंवा चिक्की सहज मिळतात.

राजगिरा लाडू किंवा वडी

राजगिरा आरोग्यासाठी अतिशय चांगला असतो. यामध्ये गूळ असल्याने ज्यांना डायबिटीस आहे त्यांच्यासाठीही हा चांगला पर्याय ठरु शकतो. हे कुरकुरीत असल्याने खायलाही छान लागते. पोटासाठी हलका असल्याने पचायला चांगला असतो. यामध्ये गुडदाणी, गुलकंद असे बरेच प्रकार मिळतात.

चिवडा

गोड काही न्यायचे नसेल आणि तिखट पर्याय हवा असेल तर भडंग किंवा पोह्याचा चिवडा हा चांगला पर्याय आहे. बाप्पाला नैवेद्यासाठीही हा चिवडा आपण ठेवू शकतो तसेच घरातील सगळ्यांना गोड खाऊन कंटाळा आला असेल तर संध्याकाळच्या वेळी खायलाही हा पर्याय चांगला असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : शेताच्या बांधावर अनवाणी धावणाऱ्या गुलवीर सिंगने राष्ट्रकुल स्पर्धेत इतिहास घडवला; ०.०४ सेकंदाच्या फरकाने जिंकले दुसरे पदक

Commonwealth Games 2026: ७ सुवर्ण, ३ रौप्य.. बॉक्सिंगपटूंची ऐतिहासिक कामगिरी; भारताची Medal Table मध्ये उत्तुंग भरारी, बघा कितव्या स्थानावर पोहोचले

Commonwealth Games 2026: सचिन... सचिन... पंचांनी १ गुण वजा केला, भारताचा बॉक्सर पेटला; तिसऱ्या फेरीत मुक्क्यांची बरसात करून जिंकले सुवर्ण...

Education Initiative: चिमुकल्या इरफानच्या आठवणीत अमळनेरमध्ये शिक्षणसेवेचा संकल्प; गरजू विद्यार्थ्यांना मोफत साहित्य वाटप उपक्रम

Commonwealth Games 2026: धक्कादायक... ऑलिम्पिक पदक विजेत्या लव्हलिना बोरगोहैनचे सुवर्ण हुकलं...

SCROLL FOR NEXT