ganesh article

विसर्जनस्‍थळासह मार्गावर CCTVची नजर! पालिकेची तयारी पूर्ण

गिरीश चव्हाण

नागरिकांच्या सोयीसाठी शहरासह हद्दवाढीतील भागात पालिकेने विसर्जनासाठी ३० कुंड ठेवले आहेत.

सातारा: गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत, तसेच निर्विघ्न पार पडावी, यासाठीची तयारी पालिकेने केली असून, विसर्जनस्‍थळासह संपूर्ण मार्गावर सुमारे १०० सीसीटीव्‍ही कॅमेऱ्यांच्या माध्‍यमातून नजर ठेवण्‍यात येणार आहे. नागरिकांच्या सोयीसाठी शहरासह हद्दवाढीतील भागात पालिकेने विसर्जनासाठी ३० कुंड ठेवले आहेत.

दहा दिवस गणेशाची अखंड आराधना केल्‍यानंतर भक्‍तांना वेध लागतात ते अनंत चतुर्दशीचे. यादिवशी लाडक्‍या गणरायाला पुढच्‍या वर्षी लवकर या, असा निरोप देत भक्‍त गणेशमूर्तीचे विसर्जन प्रथापरंपरेप्रमाणे करत असतात. दर वर्षीप्रमाणे सातारा पालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी पाच कृत्रिम तलाव तयार केले आहेत. या तलावाच्‍या ठिकाणी घरगुती, तसेच सार्वजनिक गणेशमूर्तीचे विसर्जन करण्‍यासाठीची तयारी पालिकेने गेल्‍या पाच दिवसांपासून सुरू केली होती. ही तयारी पूर्ण झाली असून, त्‍याचा आढावा आज पालिका अधिकाऱ्यांसह उपाध्‍यक्ष मनोज शेंडे व इतर पदाधिकाऱ्यांनी घेतला. पोहण्‍याच्‍या तलावात अग्‍निशामक पथकाच्‍या वाहिनीतून, तसेच बुधवार नाका येथील तलावात परिसरातील दोन विहिरींतून अखंडित उपसा करत पाणीपातळी कायम राखण्‍यात येत आहे.

सर्वच विसर्जनस्‍थळांवर पालिकेने आपले १०० कर्मचारी आणि अधिकारी नेमले असून, त्‍यांच्‍या जोडीला ३० जीवरक्षकांची फौजदेखील देण्‍यात आली आहे. पोलिस दलाने मिरवणूक आणि विसर्जन प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठीची जय्‍यत तयारी केली असून, रविवारी शहराच्‍या विविध भागांत, तसेच विसर्जन मार्गावर सुमारे २०० हून अधिक कर्मचारी तैनात केले आहेत. या कर्मचाऱ्यांचे संचलन करण्‍यासाठी स्‍वतंत्र अधिकारी नेमण्‍यात आले असून, प्रत्‍येक ठिकाणी रॅपिड ॲक्‍शन फोर्स, दंगा काबू पथक, बाँब शोधक आणि नाशक पथके देखील ठेवण्‍यात आली आहेत.

मुख्‍य विसर्जन स्‍थळे

- पालिकेचा पोहण्‍याचा तलाव

- बुधवार नाका कृत्रिम तलाव

- सदरबझार दगडी शाळा तलाव

- भूविकास चौकातील हुतात्‍मा स्‍मारक

- कल्याणी शाळा परिसरातील तलाव

३० कुंड

तलावाबरोबरच सातारा शहरासह हद्दवाढीतील भागात पालिकेच्‍या वतीने ३० कुंड ठेवण्‍यात आले आहेत. हे कुंड नेमके कोठे ठेवण्‍यात आले आहेत, याची माहिती देणारे फलक सातारा पालिकेने, तसेच स्‍थानिक पदाधिकाऱ्यांनी आपापल्या भागात लावले आहेत. विसर्जनासाठी ठेवण्‍यात आलेल्‍या कुंडातील पाणीपातळी कायम राखण्‍यासाठी टँकर तैनात करण्‍यात आले आहेत.

शंभर सीसीटीव्‍ही

विसर्जन मार्गासह पोहण्‍याचा तलाव, बुधवार नाका तलाव, तसेच इतर सर्वच ठिकाणांवर लक्ष ठेवण्‍यासाठी २५ सीसीटीव्‍ही कॅमेरे बसविले आहेत. या कॅमेऱ्यांबरोबरच पोलिस दलाचे ५० आणि विसर्जन मार्गावरील व्‍यापाऱ्यांचे सुमारे २५ कॅमेरे पोलिसांनी ताब्‍यात घेतले आहे. या कॅमेऱ्याच्‍या मदतीने संपूर्ण परिसरातील घडामोडी टिपण्‍यात येणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : पुण्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर निशाणा

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

SCROLL FOR NEXT