दाजी पेठेतील वीर गणपती ट्रस्टने जपली समाजसेवेची परंपरा Canva
ganesh article

दाजी पेठेतील वीर गणपती ट्रस्टने जपली समाजसेवेची परंपरा

दाजी पेठेतील वीर गणपती ट्रस्टने जपली समाजसेवेची परंपरा

सकाळ वृत्तसेवा

शहरातील दाजी पेठ भागातील वीर गणपती मंडळाने झांज पथक, शिस्तबद्ध मिरवणूक आदींसाठी सातत्याने बक्षिसे मिळवली आहेत.

सोलापूर : शहरातील दाजी पेठ भागातील वीर गणपती (Veer ganpati) मंडळाने झांज पथक, शिस्तबद्ध मिरवणूक आदींसाठी सातत्याने बक्षिसे मिळवली आहेत. (Ganesh Chaturthi) चारादान, धान्य किट वाटपासह अनेक सामाजिक उपक्रमांचे आयोजन देखील केले आहे. 2013 मध्ये या वीर गणपती ट्रस्टची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून मंडळाने सातत्याने अनेक सामजिक कामांची सुरवात केली. सुरवातीपासून मंडळाने शिस्तीला प्राधान्य देत शिस्तबद्ध विसर्जन मिरवणुकीचा पायंडा पाडला. त्याबद्दल पूर्व विभाग मध्यवर्ती मंडळाने शिस्तबद्ध मिरवणुकीचे पारितोषिके या मंडळाला दिली आहेत.

सिद्धरामेश्‍वर मंदिराला या मंडळाने चांदी दान केली आहे. मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे मंडळाने मंदिरात गणेश मूर्ती स्थापन केली. वर्षभर सामाजिक कार्यक्रम राबवले जातात. या मंडळाने विक्रमी म्हणजे एकाच वेळी दहा हजार रोपे लावली. गो-शाळांना चारा दान देण्याचे काम मंडळ सातत्याने करते. कोरोनाच्या काळात अनेक गरजूंना धान्याची गरज होती. तेव्हा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला व मोठ्या प्रमाणात धान्य किटचे वाटप केले. अयोध्येच्या राम मंदिराच्या उभारणीला आर्थिक देणगी या मंडळाने दिली आहे. यावर्षी तंबाखूमुक्तीसाठी फेसबूक लाईव्ह व्याख्यान घेण्यात आले.

मंडळाच्या ट्रस्टमध्ये अध्यक्ष सतीश सपकाळ, उपाध्यक्ष अमोल सुपे, शेखर गणेश, सचिव अवधुत ढगे, सहसचिव रामनाथ सरवदे, खजिनदार श्रीकांत सरवदे, कार्याध्यक्ष ऋषीकेश शिंदे, सहकार्याध्यक्ष संतोष कांबळे, विश्‍वस्त मोहन माळवदकर, तुळशीदास वांझरे, आनंद गायकवाड, विश्‍वस्त मधुकर मळेकर आदी पदाधिकारी कार्यरत आहेत. तसेच गणेश उत्सव समितीमध्ये अध्यक्ष म्हणून उमेश गायकवाड, उपाध्यक्ष सुमीत नरोळे, सचिव सागर सरवदे, खजिनदार मंदार वाघमोडे, सहखजिनदार ऋषीकेश शिंदे, कार्याध्यक्ष नंदकुमार पुराणिक यांच्यासह अनेक सदस्य आहेत. ट्रस्टची स्वतंत्र वेबसाईट देखील कार्यरत आहे. अनेकांच्या घरात, मंदिरात भंगलेल्या मूर्ती व प्रतिमा असतात, त्यांचे संकलन करून त्यांचे विधिवत विसर्जन करण्याचे काम केले जाते. योगासन स्पर्धेच्या माध्यमातून योगाचा प्रचार केला जातो.

वीर गणपती ट्रस्टने सातत्याने योगासने, झांज पथक निर्मिती, धान्याचे वाटप अशा उपक्रमांना सातत्याने पाठबल दिले आहे. यावर्षी तंबाखूमुक्त परिसर या विषयावर ऑनलाइन व्याख्यान घेतले आहे.

- उमेश गायकवाड, अध्यक्ष, उत्सव समिती, वीर गणपती ट्रस्ट, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT