भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजेच आपल्या लाडक्या गणपती बाप्पांच्या आगमनाचा दिवस. बाप्पांच्या आगमनाने सर्वांच्याच आनंदाला उधाण येते. सर्वत्र उत्साह अन् जल्लोष पाहायला मिळतो. घरोघरी बाप्पांच्या आगमनाची जय्यत तयारी सुरु असते. मात्र या धावपळीच्या काळात प्रत्येकाला घरी बाप्पाच्या प्रतिष्ठापनेसाठी गुरुजी मिळतीलच असे नाही. मग अशावेळी शास्त्रोक्त पद्धतीने बाप्पांची स्थापना कशी करावी असा प्रश्न पडतो. मात्र आता चिंता करण्याच कारण नाही. पुजेचा संपुर्ण आणि शास्त्रोक्त विधी तो ही मंत्रांसह जाणून घेण्यासाठी ही बातमी पुर्ण वाचा.
(Ganesh Chaturthi 2022 puja procedure Step by step guide chanting mantras in marathi)
संपूर्ण गणेश पूजन आणि आरत्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा
गणपती स्थापन पुजेसाठी साहित्य
पाणी भरलेल्या तांब्या, ताम्हण, पळी, पंचामृत, शंख, घंटा, २ दिवे (१ तेलाचा , १ तुपाचा), दिप पुजनासाठी समई, हळदी, कुंकू, गुलाल, शेंदूर, अक्षता, सुवासिक अत्तर, चंदनाचा गंध, लाल जास्वंदाची फुले, हार, दुर्वा, विविध प्रकारची पत्री, १ नारळ, विड्याची पाने, सुपारी, बदाम, खारीक, हळकुंड, सुटे नाणे, देवासाठी वस्त्र, जानवे, देवाला लाल रंगाचे आसन किंवा मदरा, फळे - ५ विविध प्रकारची, अगरबत्ती, धुप, कापूर, देवाला नैवेद्यासाठी मोदक, गुळ खोबरं, पेढे, मिठाई.
अशी करा पुजेला सुरुवात...
सर्वप्रथम स्वच्छ अंघोळ करुन सोवळे नेसावे. त्यानंतर देवाच्या पुजेसाठी आसनावर बसावे. सर्वप्रथम आपल्या डोळ्यांना पाण्याचा स्पर्ष करावा. (दिलेल्या माहीतीनुसार दिलेला मंत्रही त्यासोबत म्हणावा)
ॐ नेत्राच्यम्य नेत्र उदक स्पर्शाः |
त्यानंतर उजव्या हातावर पळी भर पाणी घेवून ते प्राशन करुन
आचमन करावे, त्यावेळी ही नावे उच्चारावी.
ॐ केशवाय नमः । ॐ नारायणाय नमः । ॐ माधवाय
ॐ गोविंदाय नमः
या नावाने पाणी सोडावे. पुढील नावे हात जोडून म्हणावीत. नंतर प्राणायाम करावा.
ॐ विष्णवे नमः ।
ॐ मधुसूदनाय नमः |
ॐ त्रिविक्रमाय नमः |
ॐ वामनाय नमः ।
ॐ श्रीधराय नमः |
ॐ हृषीकेशाय नमः ।
ॐ पद्मनाभाय नमः ।
ॐ दामोदराय नमः ।
ॐ दामोदराय नमः ।
ॐ संकर्षणाय नमः ।
ॐ वासुदेवाय नमः ।
ॐ प्रद्युम्नाय नमः
ॐ अनिरुद्धाय नमः
ॐ पुरुषोत्तमाय नमः ।
ॐ अधोक्षजाय नमः ।
ॐ नारसिंहाय नमः ।
ॐ अच्युताय नमः
ॐ जनार्दनाय नमः ।
ॐ उपेन्द्राय नमः ।
ॐ हरये नमः ।
ॐ श्रीकृष्णाय नमः ।
त्यानंतर प्राणायाम करावा.
ॐ भूः ॐ भुवः ॐ स्वः ॐ महः ॐ जनः ॐ तपः ॐ सत्यम् ।
ॐ भूर्भुवः स्वः । ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात ॥
सर्व देवतांना हात जोडून वंदन करावे
ॐ श्रीमन्महागणपतये नमः इष्टदेवताभ्यो नमः । श्रीसरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः । ग्रामदेवताभ्यो नमः । स्थानदेवताभ्यो नमः । वास्तुदेवताभ्यो नमः मातृपितृभ्यां नमः । श्रीलक्ष्मीनारायणाभ्यां नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमः । सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः निर्विघ्नमस्तु
उजव्या हातावर एक पळी पाणी घेवून त्यात रुपयाचे नाणे, सुपारी, गंध-अक्षत फुल ठेवून पुजेचा संकल्प करावा.
(टिप- संकल्पामध्ये ज्या ठिकाणी अशी खूण आहे तेथे त्या दिवशीच्या संवत्सराचे, नक्षत्राचे, वाराचे योग व करण यांची नावे पंचांगात पाहून म्हणावीत.)
श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वियीये परार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराहकल्पे, वैवस्वतमन्वन्तरे, कलियुगे, प्रथमचरणे, भरतवर्षे, भरतखंडे, जंबुद्वीपे दण्डकारण्ये देशे, गोदावर्याः दक्षिणे तीरे --मण्डले, ग्रामे, शालिवाहन शके, नाम संवत्सरे, ---अयने, ऋती, मासे, पक्षे, - तिथी, वासरे, -----दिवस, नक्षत्रे, एवंगुणविशेषणविशिष्टायां शुभपुण्यतिथौ, मम आत्मनः श्रुति स्मृति पुराणोक्त फलप्राप्त्यर्थ अस्माकं सर्वेषां सहकुटुंबानां सहपरिवाराणां क्षेम स्थैर्य विजय अभय आयुरारोग्यैश्वर्याभिवृद्धयर्थ शान्त्यर्थ पुष्टयर्थ तुष्टयर्थ समस्तमंगलावाप्त्यर्थ समस्तदुरितोषशांत्यर्थं समस्ताभ्युदयार्थ च इष्टकामसंसिद्धयर्थ कल्पोक्तफलावाप्त्यर्थ मम इह जन्मनि जन्मजन्मांतरे च सहकुटुंबस्य क्षेमस्थित्यायुरारोग्यैश्वर्यादिवृद्धि सर्वकामर्निर्विघ्नसिद्धि पुत्रपौत्रधनधान्यविद्याजययशसमृद्धिद्वारा अद्य भाद्रपद शुक्लचतुर्थ्यां प्रतिवार्षिकं विहितं श्रीसिद्धिविनायकदेवताप्रीत्यर्थं यथाशाक्ति यथाज्ञानेन यथामीलितोपचारद्रव्यैः ध्यानावाहनादिषोडशोपचारैः पूजां करिष्ये तथा च आसनादि दिग्बंधादि कलशपूजनं शंखार्चनं घंटाराधनं दीपपूजनं च करिष्ये । शरिरशुद्धयर्थं षडंगन्यासं च करिष्ये । आदी निर्विघ्नतासिद्धयर्थ श्रीमहागणपतिस्मरणं च करिष्ये ।
(हातात गंधाक्षतांसहित उदक घेऊन सोडावे )
त्यानंतर महागणपती बाप्पाचे स्मरण करावे...
वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभं | निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा ||
भूमीला स्पर्श करावा.
पृथिवीति मंत्रस्य मेरुपृष्ठ ऋषिः कूर्मेः देवता सुतलं छंदः । आसने विनियोगः ॥ ॐ पृथ्वि त्वया धृता लोका देवि त्वं विष्णुना धृता त्वं च धारय मां देवि पवित्रं करु चासनम् ॥
कलशाला गंधअक्षत फुल वाहावे.
गंगे च यमुने चैव गोदावरि सरस्वति नर्मदे सिन्धु कावेरि जलेऽस्मिन्सन्निधिं कुरु ॥ कलशाय नमः। सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि 1
(नमस्कार करावा)
(भारतीय संस्कृतीत कलश हे मांगल्याचे प्रतीक
शुभकार्यात कलशाची पूजा करण्याची प्रथा आहे. कलशपूजा म्हणजे अखिल ब्रह्मांडाची पूजा. कलशात सारे ब्रह्मांड सामावलेले आहे. कलशाच्या मुखी विष्णू, कंठामध्ये शंकर, तळाशी ब्रह्मा, मध्याभागी देवमाता म्हणजे मातृगण स्थित आहेत. कलशात सर्व सागरांचे पवित्र जल व सप्तखंडात्मक पृथ्वी समाविष्ट आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद या चारही वेदांचे यात वास्तव्य मानले असून, आपल्या सहा अंगासह सर्व वेद या कलशात आहेत. गायत्री, सावित्री नित्य शांती, पुष्टी देणार्या देवतांचे अधिष्ठान या कलशात आहे. गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी या सात नद्यांचे जल असून, 'तूच शिव, तूच विष्णू, तूच ब्रह्मा यांचे प्रतीक असणार्या कलशरूपी ब्रह्मांडदेवते, तुझ्यात सारी पंचमहाभूते व प्राणशक्तीचे वास्तव्य आहे' अशी ही प्रार्थना आहे. कलशपूजा ही सर्व ब्रह्मांडसमावेशक आहे. कलशाशिवाय कोणतीही पूजा होत नाही; म्हणून हे सर्व सांगितले आहे.)
शंखाला स्नान घालून गंध, पुष्प घालावे. शंखमुद्रा दाखवून नमस्कार करावा.
ॐ पाञ्चजन्याय विद्महे पावमानाय धीमहि । तन्नः शंख प्रचोदयात् शंखाय नमः सकलपूजार्थे गंधपुष्पं समर्पयामि ॥
घंटापूजा
घंटानादं कुर्यात्
घंटा आगमनार्थे तु देवानां गमनार्थ तु रक्षसाम् ।
कुर्वे घंटारवं तत्र देवताऽह्वानलक्षणम् ॥ घंटायै नमः । सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ॥
घंटेला गंध, अक्षता, फूल, हळदकुंकू वाहावे.
दीपपूजा
समईला फुलाने गंध, फूले व हळदकुंकू वाहावे.
भो दीप ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्ययः आरोग्यं देहि पुत्रांश्च सर्वार्थाश्च प्रयच्छ मे यावत्पूजासमाप्तिः स्यात्तावत् त्वं सुस्थिरो भव दीपदेवताभ्यो नमः । सकलपूजार्थे गंधपुष्पं समर्पयामि
आता सर्वप्रथम गणेशाची प्राणप्रतिष्ठा करावी.
दोन दूर्वांकुरांनी गणपतीला स्पर्श करून म्हणावे, अस्य श्रीप्राणप्रतिष्ठामंत्रस्य ब्रह्माविष्णुमहेश्वरः ऋषयः I ऋग्यजुः सामाथर्वाणि छंदासि परा प्रानशक्तिर्देवता आं बीजम् । ह्रीं शक्तिः । क्रीं कीलकम् । अस्या मूर्ती देवकलासन्निध्यार्थ प्राणप्रतिष्ठापने विनियोगः ।
ॐ आं हीं, क्रौं,अं यं रं लं वं शं षं सं हं क्षं अः क्रों, हीं, आं देवस्य प्राणा इह प्राणाः ॥
ॐ आं, हीं, क्रौं, अयं रं लं वंशं षं सं हं क्षं अः क्रौं, हीं, आं, देवस्य जीव इह स्थितः ॥
ॐ आं हीं, क्रौं, अ यं रं लं वंशं षं सं हं क्षं अः क्रों, हीं, आं, देवस्यवाड्मनश्चक्षुः श्रोत्राजिव्हाघ्राणपाणिपादपायुपस्यादि सर्वेन्द्रियाणि सुखं चिरं तिष्ठंतु स्वाहा ॥
ताम्हनात एक पळी पाणी उजव्या हातावरून सोडावे. नंतर दुर्वाकुराने गणपतीच्या पायाला स्पर्श करावा.
ॐ ॐ असा पंधरा वेळा उच्चार करावा.
प्राणप्रतिष्ठेनंतर गणेशाचे आवाहन आवाहन करावे.
आगच्छ देवदेवेश तेजोराशे जगत्पते । क्रियामाणां मया पूजां गृहाण गणनायक ॥ आवाहनार्थे दूर्वांकुरान् पुष्पांजलि समर्पयामि ॥ (आवाहनार्थ दूर्वाकुर, फुले वाहावीत. नमस्कार करावा. )
श्री सिद्धिविनायकाय नमः ।
आसन
नानारत्नसमायुक्तं कार्तस्वरविभूषितम् । आसनं देवदेवेश प्रीत्यर्थ प्रतिगृह्यताम् ॥ श्री सिद्धिविनायकाय नमः । आसनार्थे दूर्वांकुरान् अक्षतान् समर्पयामि ॥ (दूर्वांकुर, अक्षता गणपतीच्या चरणावर वाहाव्यात.)
पाद्य
सर्वतीर्थसमानीतं पाद्य गन्धादिसंयुतम् । विघ्नराज गृहाणेदं भगवन् भक्तवत्सल ॥ श्री सिद्धिविनायकाय नमः ।
पाद्यो पाद्यं समर्पयामि ।
(गणपतीच्या चरणावर दूर्वांकुराने पाणी शिंपडावे.)
अर्ध्य
अर्थ्ये च फलसंयुक्तं गंधपुष्पाक्षतैर्युतम् । गणाध्यक्ष नमस्तेऽस्तु गृहण करुणानिधे ॥ श्री सिद्धिविनायकाय नमः । हस्तयोः अर्थ्येः समर्पयामि ॥ तदर्थे गंधाक्षतपुष्पजलं समर्पयामि ॥ (गणपतीवर गंधाक्षतापुष्प वाहावे. पळीत पाणी घेऊन त्यात गंध, अक्षता, फूल, दूर्वांकुर व सुपारी
घालून गणपतीच्या हातावर अर्घ्य द्यावे. अर्ध्य ताम्हनात सोडावे.)
पंचामृतस्नान
पंचामृत एकत्र करून अर्पण करावे. म्हणावे
पयो दधि घृतं चैव मधुशर्करया युतम् ।
पंचामृतेन स्नपनं क्रियतां परमेश्वर ॥
श्री सिद्धिविनायकाय नमः ।
पंचामृतस्नानं समर्पयामि ॥
पंचामृत स्नानांतरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि । सकलपूजार्थे अक्षतान् समर्पयामि
(दूध, दही, तूप, मध व साखर वाहणे. मध्ये शुद्धोदक देणे. )
गंधोदकस्नान
(पळीत पाणी घेऊन गंध घालावे व ते पाणी वाहावे.)
कर्पूरैलासमायुक्त सुगंधिद्रव्यसंयुतम् । गंधोदकं मया दत्तं स्नानार्थ प्रतिगृह्यताम् ॥ श्री सिद्धिविनायकाय नमः । गंधोदकस्नानं समर्पयामि गंधोदकस्नानंतरे शुद्धोदकस्नानं समर्पयामि।
मांगलिक स्नान
अत्तर सुगंधी द्रव्ये देवाच्या अंगाला लावून स्नान घालावे.
अंगोद्वर्तनकं देव कस्तुर्यादिविमिश्रितम् स्नानार्थ ते प्रयच्छामि स्वीकुरुष्व दयानिधे ॥
श्री सिद्धिविनायकाय नमः । मांगलिक स्नानं समर्पयामि शुद्धोदकस्नानं समर्पयामि । सकलपूजार्थे अक्षतान् समर्पयामि ।
गणपतीला नाममंत्रानी पंचोपचार करावे. ही पूर्वपूजा होय.
श्री सिद्धिविनायकाय नमः । विलेपनार्थे चंदन समर्पयामि (गंध लावावे.)
श्री सिद्धिविनायकाय नमः । पूजार्थे पुष्पाणि समर्पयामि । (फुले वाहावी. )
श्री सिद्धिविनायकाय नमः धूपं समर्पयामि । ( धूप दाखवावा. )
श्री सिद्धिविनायकाय नमः दीपं समर्पयामि (नीरांजन ओवाळावे.)
श्री सिद्धिविनायकाय नमः नैवेद्यार्थे पंचामृतशेषनैवेद्यं समर्पयामि । (पंचामृताचा नैवेद्य दाखवावा. व म्हणावे )
ॐ प्राणाय स्वाहा ॐ अपानाम स्वाहा
ॐ व्यानाय स्वाहा ॐ उदानाय स्वाहा
ॐ समानाय स्वाहा ॐ ब्रह्माणे स्वाहा। नंतर
श्री सिद्धिविनायकाय नमः उत्तरापोशनं समर्पयामि ।
हस्तप्रक्षालनं समर्पयामि मुखप्रक्षालनं समर्पयामि ।
पाणी सोडावे आणि दोन विड्याची पाने त्यावर सुपारी व दक्षिणा यांसह गणपतीसमोर ठेवून त्यावर पाणी सोडून म्हणावे श्री सिद्धिविनायकाय नमः । मुखवासार्थे पूगीफलतांबूलं दक्षिणां च समर्पयामि । आणि मग उजव्या हाताने ताम्हनात पळीने पाणी सोडून गणपतीला नमस्कार करावा. अनेन पूर्वाराधनेन श्री सिद्धिविनायकाः प्रीयताम् । उत्तरे निर्माल्यं विसृज्य । अथ अभेषेकं कुयात् । गणपतीवर वाहिलेली फुले काढून उत्तरेकडे ठेवावी आणि गणपती अथर्वशिर्ष किंवा गणपती स्तोत्राने बाप्पाचा अभिषेक करावा.
अभिषेक झाल्यानंतर वस्त्र गणपतीला कापसाची वस्त्रे वाहावीत.
सर्वभूषाधिके सौम्ये लोकलज्जानिवारणे । पयोपपादिते तुभ्यं वाससी प्रतिगृह्यताम् ॥ श्री सिद्धिविनायकाय नमः वस्त्रोपवस्त्रे समर्पयामि ।
गणपतीला जानवे घालावे.
देवदेव नमस्तेऽस्तु त्राहि मां भवसागरात्।
ब्रह्मसूत्रं सोत्तरीयं गृहाण पुरुषोत्तम ॥
श्री सिद्धिविनायकाय नमः । उपवस्त्रार्थे यज्ञोपवीतं समर्पयामि ।
गणपतीला तांबडे किंवा ओल्या कुंकूवाचे गंध लावावे.
श्रीखंड चंदनं दिव्यं गंधाढ्यं सुमनोहरम् । विलेपनं सुरश्रेष्ठ चन्दनं प्रतिगृह्यताम् । श्री सिद्धिविनायकाय नमः । चन्दनं समर्पयामि ।
गणपतीला कुंकुमाक्षता वाहाव्यात.
रक्ताक्षतांश्च देवेश गृहाण द्विरदानन । ललाटपटले चन्द्रस्तस्योपरि विधार्यताम् ॥ श्री सिद्धिविनायकाय नमः । अक्षतान् समर्पयामि ।
गणपतीला शेंदूर लावावा.
उदितारुणसंकाशं जपाकुसुमसंनिभम् । सीमंतभूषणार्थाय सिंदूरं प्रतिगृह्यताम् ॥ श्री सिद्धिविनायकाय नमः सिंदूरं समर्पयामि
गणपतीच्या अंगावर दागिने घालावे.
अनेकरत्नयुक्तानि भूषणानि बहूनि च तत्तदंगे योजयामि कांचनानि तवाज्ञया ॥ श्री सिद्धिविनायकाय नमः । नानाभूषणानि समर्पयामि |
ऋद्धिसिद्धींना हळद, कुंकू, काजळ, सिंदूर, मंगलसूत्र, कंकणे क्रमाने वाहावीत.
हळद
हरिद्रा स्वर्णवर्णाभा सर्वसौभाग्यदायिनी सर्वालंकारमुख्या हि देवि त्वं प्रतिगृह्यताम् ॥ श्री ऋद्धिसिद्धिभ्यां नमः हरिद्रां समर्पयामि
कुंकू
हरिद्राचूर्णसंयुक्तं कुंकुम कामदायकम् वस्त्रालंकरणं सर्व देवि त्वं प्रतिगृह्यताम् ॥ श्री ऋद्धिसिद्धिभ्यां नमः । कुंकुमं समर्पयामि ।
गणपतीला अत्तर इत्यादी परिमलद्रव्ये वाहावीत.
ज्योत्स्नापते नमस्तुभ्यं नमस्ते विश्वरूपिणे नानापरिमलद्रव्यं गृहाण परमेश्वर ॥ श्री सिद्धिविनायकाय नमः । नानापरिमलसुवासिकद्रव्याणि समर्पयामि
गणपतीला फुले वाहावीत.
माल्यादीनि सुंगधीनि मालत्यादीनि वै प्रभो । मया हतानि पूजार्थे पुष्पाणि प्रतिगृह्यताम् ॥
श्री सिद्धिविनायकाय नमः । नानापुष्पाणि समर्पयामि
गणपतीला दूर्वा वाहाव्यात. अग्रे आपल्याकडे करावीत. दूर्वा गंधाक्षतांसहित पुढील मंत्रानी वाहाव्यात.
कांडात्काण्डात्प्ररोहन्ति परुषः परुषः परि । एवानी दूर्वे प्रतनू सहस्रेण शतेन च ॥ श्री सिद्धिविनायकाय नमः । दूर्वांकुरान् समर्पयामि ।
पुढील मंत्रांनी दुर्वा वहाव्या
ॐ गणाधिपाय नमः । दूर्वायुग्मं समर्पयामि ।
ॐ उमापुत्राय नमः दूर्वायुग्मं समर्पयामि ।
ॐ अघनाशनाय नमः । दुर्वायुग्मं समर्पयामि
ॐ विनायकाय नमः । दुर्वायुग्मं समर्पयामि ।
ॐ ईशपुत्राय नमः । दूर्वायुग्मं समर्पयामि ।
ॐ सर्वसिद्धिप्रदायकाय नमः । दूर्वायुग्मं समर्पयामि ।
ॐ एकदन्ताय नमः । दूर्वायुग्मं समर्पयामि
ॐ इभवक्त्राय नमः । दूर्वायुग्मं समर्पयामि ।
ॐ मूषकवाहनाय नमः । दूर्वायुग्मं समर्पयामि ।
ॐ कुमारगुरवे नमः । दूर्वायुग्मं समर्पयामि ।
ॐ गणाधिप नमस्तेऽस्तु उमापुत्राघनाशन
विनायकेशपुत्रेति सर्वसिद्धिप्रदायक ॥
एकदन्ते भवक्त्रेति तथा मूषकवाहन ।
कुमारगुरवे तुभ्यं पूजयामि प्रयत्नः ।
श्री सिद्धिविनायकाय नमः । एकं दुर्वा समर्पयामि ।
(गणपतीला एकवीस दूर्वांची जुडी वाहावी.).
पत्री अर्पण करावी..
(गणपतीला पुढील नाममंत्रांनी एकेक पत्री वाहावी. ) सुमुखाय नमः मालतीपत्रं समर्पयामि। (मधुमालती ) गणाधिपाय नमः भृंगराजपत्रं समर्पयामि । (माका) उमापुत्राय नमः बिल्वपत्रं समर्पयामि। (बेल) गजाननाय नमः । श्वेतदूर्वांकुरे समर्पयामि। (पांढरी दूर्वा )
लंबोदराय नमः बदरीपत्रं समर्पयामि (बोर)
हरसूनवे नमः धत्तूरपत्रं समर्पयामि (धोत्रा)
गजकर्णाय नमः वक्रतुण्डाय नमः शमीपत्रं समर्पयामि । ( शमी )
गुहाग्रजाय नमः । अपामार्गपत्रं समर्पयामि ।
(आघाडा)
एकदन्ताय नमः बृहतीपत्र समर्पयामि। (डोरली )
विकटाय नमः करवीरपत्रं समर्पयामि। (कण्हेर)
कपिलाय नमः अर्कपत्रं समर्पयामि। (रुई)
गजवक्त्राय नमः अर्जुनपत्रं समर्पयामि
(अर्जुनसादडा)
विघ्नराजाय नमः। विष्णु समर्पयामि।
(विष्णुकांत)
बटवे नमः दाडिमीपत्रं समर्पयामि । (डाळिंब)
सुराग्रजाय नमः देवदारपत्रं समर्पयामि । (देवदार)
भालचंद्राय नमः । मरुबकपत्रं समर्पयामि । (मरवा)
हेरम्बाय नमः अश्वत्थपत्रं समर्पयामि। (पिंपळ )
चतुर्भुजाय नमः जातीपत्रं समर्पयामि । (जाई)
विनायकाय नमः । केतकीपत्रं समर्पयामि । (केवडा)
सर्वेश्वराय नमः । अगस्तिपत्रं समर्पयामि । (अगस्त्य )
धूप/ अगरबत्ती ओवाळावी
वनस्पतिरसोद्भूतो गंधाढ्यो गंध उत्तमः आधेयः सर्वदवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम् ॥
श्री सिद्धिविनायकाय नमः । धुप समर्पयामि
गणपतीला गूळ, खोबरे, मोदक इत्यादी जो पदार्थं नैवेद्यासाठी अर्पन करावयाचा असेल तो पात्रात ठेवून त्यावर तुलसीपत्र घालून पात्राखाली पाण्याने चौकोनी मंडल करून वरील मंत्रांनी तो अर्पण करावा. जो परार्थ असेल त्याचे नाम उच्चारावे. जसे गुडखाद्य मोदकनैवेद्यम्.
ॐ प्राणाय स्वाहा । ॐ अपानाय स्वाहा।
ॐ व्यानाय स्वाहा ॐ उदानाय स्वाहा। ॐ समानाय स्वाहा ॐ ब्रह्मणे स्वाहा ।
(एक पळी पाणी ताम्हनात सोडावे. )
ॐ प्राणाय स्वाहा । ॐ अपानाय स्वाहा
ॐ व्यानाय स्वाहा । ॐ उदानाय स्वाहा
ॐ समानाय स्वाहा । ॐ ब्रह्मणे स्वाहा
उत्तरापोशनं समर्पयामि। मुखप्रक्षालनं समर्पयामि हस्तप्रक्षालनं समर्पयामि आचमनं समर्पयामि।
(तीन पाळ्या पाणी ताम्हनात सोडावे. ) करोद्वर्तनार्थे चंदनम् समर्पयामि।
नैवेद्य झाल्या नंतर गणपती बाप्पाची आरती करावी अन् सर्वाना गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करत बाप्पाचा प्रसाद घ्यावा.....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.