Ganpati Chaturthi 2023 Dry Fruit Modak Sakal
Ganesh Chaturthi Festival

Ganesh Chaturthi 2023: गणेश चतुर्थीला तयार करा हेल्दी मोदक, वाढणार नाही वजन

गणेश चतुर्थीनिमित्त आपण घरच्या घरी हेल्दी मोदक तयार करून त्यांचा आस्वाद नक्की घ्या.

Harshada Shirsekar

Ganesh Chaturthi 2023 :  गणेश चतुर्थीनिमित्त भाविक बाप्पाला त्याच्या आवडत्या मोदकांसह अन्य गोडधोड पदार्थांचाही नैवेद्य दाखवतात. गणेश चसतुर्थीपासून पुढील दहा दिवस भाविक बाप्पाची मनोभावे सेवा करतात. यानिमित्ताने प्रत्येकाच्याच घराघरांत पंचपक्वान्न शिजवले जातात. या सणामध्ये सर्वांकडूनच दिवसभरात कित्येकदा मिठाई, तेलकट-तुपकट पदार्थांचे मोठ्या प्रमाणात सेवन होत असते. 

त्यात मोदकासारख्या स्वादिष्ट गोड पदार्थ खाण्यास नकार देतील, अशा व्यक्ती संख्येनं फार कमीच सापडतील. पण फिटनेसप्रेमी गोडधोड पदार्थ खाणे टाळतातच. अशा लोकांसाठी आपण खास हेल्दी मोदक तयार करू शकता. जाणून घेऊया सोपी रेसिपी.

ड्राय फ्रुट मोदक रेसिपी 

सामग्री : सुके अंजीर - सहा, खजूर - आठ, बदाम - १५ ते १७, अक्रोड - एक चमचा, शेंगदाणे- १२ ते १३, पिस्ता - पाच ते सहा, काजू - नऊ ते १०, तीळ - एक चमचा, चारोळी - एक चमचा, खसखस - एक चमचा, किसलेले ओले खोबरे - एक चमचा, तूप - एक चमचा, मनुके - १०, जर्दाळु - पाच, वेलची पावडर - एक चमचा

कसे तयार करावे मोदक ?

  • अंजीर व खजूर वेगवेगळ्या बाऊलमध्ये दोन तासांसाठी भिजत ठेवा. 

  • वरील सर्व ड्राय फ्रुट्स व्यवस्थित भाजून घ्या.

  • यानंतर सर्व सामग्री मिक्सरमध्ये वाटून त्याची पावडर तयार करावी.

  • ही पावडर वेगळ्या प्लेटमध्ये काढून घ्या. 

  • यानंतर भिजत ठेवलेले खजूर व अंजीर देखील मिक्सरमध्ये वाटून घ्या. 

  • किसलेले ओले खोबरे देखील तुपात भाजून घ्यावे. 

  • यानंतर वरील सर्व सामग्री एकजीव करा व वेलची पूड देखील मिक्स करावी. खजूर व अंजीरमुळे या मोदकांमध्ये साखर किंवा गूळ मिक्स करण्याची आवश्यकता नाही. 

  • मिश्रण तयार झाल्यानंतर मोदकाच्या साच्यामध्ये सारण भरावे व हलका दाब देऊन मोदक तयार करून घ्या.  

  • तयार झाले आहेत हेल्दी मोदक. 

Content Credit Instagram @avikkicookingtales/sandhyas.corner

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur News: '१५ दिवसांत केला प्रलंबित १७ हजार दाखल्यांचा निपटारा'; जन्म-मृत्यू विभागात कर्मचारी वाढवून, सुट्या रद्द करून कामात आणली गती

Pune Police : विद्यार्थ्यांमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलिसांचा शिक्षण संस्थांबरोबर विशेष उपक्रम

Latest Marathi News Update LIVE : थार आणि कारचा भीषण अपघात, ५०० फूट खोल दरीत कार कोसळली, ६ पैकी ४ जणांचे मृतदेह सापडले, २ अजूनही बेपत्ता

Heart Blockage: हार्ट ब्लॉकेज कमी करतात ‘या’ 3 भाज्या, डॉक्टरही देतात रोज खाण्याचा सल्ला

kolhapur kagal politics: मुश्रीफ -राजे गट एकत्र आल्यानंतर, मंडलिकांनी वेगळी चाल खेळली; संजय घाटगेंची भेट घेत केली बंद खोलीत चर्चा

SCROLL FOR NEXT