Ganesh Chaturthi 2023 Puja
Ganesh Chaturthi 2023 Puja Sakal
Ganesh Chaturti Festival

Ganesh Chaturthi 2023 : गणपती पर्णसाज - धोतरा व रुईचे देवपूजेतील महत्त्वाचं स्थान, जाणून घ्या औषधी गुणधर्म

सकाळ डिजिटल टीम

- डॉ. कांचनगंगा गंधे, पुणे

- अशोक कुमार सिंग, लखनौ

सजीव सृष्टीतल्या अन्नसाखळ्या, अन्नजाळ्यांमध्ये विषारी, बिनविषारी, औधी, कोणत्याही प्रकारच्या हवेत, वातावरणात, जागेत वाढणाऱ्या वनस्पतींची भूमिका प्रत्यक्षपणे, अप्रत्यक्षपणे खूपच महत्त्वाची आहे. म्हणूनच आपल्या पूर्वसूरींनी देवपूजेत मानाचे स्थान दिले. त्यापैकी 'रुई' हनुमानाला, 'मांदार' गणपतीला, 'धोतरा' शंकराला वाहण्याचा प्रघात आहे.

Datura Benefits

धोतरा 

समुद्रमंथनाच्या वेळेस भगवान शंकराने हलाहल विष प्यायले. तेव्हा त्यांच्या छातीतून 'धोतरा' (दतुरा) उगवल्याचा उल्लेख वामनपुराणात आढळतो. वागण्यातला कडूपणा, नकारात्मकता, द्वेष, राग नष्ट होण्यासाठी शंकराला धोतऱ्याचं फुल व फळ वाहण्याचा प्रघात आहे.

हे झुडूप उकिरड्यावर उगवते. ते विषारी असले तरी औषधी आहे. त्याच्यातल्या रसावर अनेक किडे, अळ्या जगतात. अन्नसाखळी सुरू राहते. आदर राखण्यासाठी गणेशपत्रीत त्याचा समावेश आहे. पांढरा आणि जांभळा रंगाचा धोतरा विषारी आहे.

अवयवांना सूज आली तर पानांचा रस व कळीचा चुना गरम करून लेप लावतात. जखमेवर, सूज आल्यास पानांचे पोटीस बांधतात. बियांमध्ये अॅट्रोपिन हे अल्कॅलॉईड आहे, ते विषारी असले तरी कमी मात्रेत औषधी असल्यामुळे अनेक औषधात वापरतात.

Uses Of The Rui Plant

रुई (मांदार)

रुई हे झुडूप माळरानावर उकिरड्यावरही उगवते. रुईची फुले जांभळी तर मांदाराची पांढऱ्या रंगाची असतात. संस्कृतमध्ये याला 'अर्का' म्हणजे 'प्रखर प्रकाश' - 'सूर्याशी बरोबरी करणारा' म्हणतात. रुईची पाने वायुदेवाचा पुत्र - हनुमानाला प्रिय, जो प्राण आणि जीवनशक्तीचं प्रतिनिधित्व करतो.

रुईची पानं वात-दोष नाहीसा करतात. आयुर्वेदानुसार हा दोष म्हणजे हवा आणि अवकाश यांचं मिश्रण! या दोषामुळे अनेक रोग उद्भवतात. पण रुईच्या पानांमुळे ते कमी होतात आणि शरीर तंदुरुस्त राहते. सांधे, स्नायूंचा ताठरपणा कमी होतो.

रुईचा चीक विषारी असला तरी औषधी आहे. रुईच्या झाडाचे सर्व अवयव औषधी आहेत. तिचे जतन आणि संवर्धन व्हावे, म्हणूनच ओंकाराच्या पूजेत रुईला मानाचे स्थान आहे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT