Ganesh Chaturthi Festival

Ganeshotsav: पाकिस्तानात सुद्धा जोरदार साजरा होतो गणेशोत्सव, 150 कुटुंब येतात एकत्र

परदेशातही राहणाऱ्या मराठी कुटुंबांमध्येही गणेशोत्सवाचा उत्साह दिसून येतो

सकाळ डिजिटल टीम

कोरोनाचं संकट कमी झाल्यानंतर 2 वर्षानी संपूर्ण देशभरात गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्याची तयारी चालू आहे. मागच्या वर्षी देशभरात एकदम साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यात आला होता. भारताशिवाय परदेशातही राहणाऱ्या मराठी कुटुंबांमध्येही गणेशोत्सवाचा उत्साह दिसून येतो. भारताच्या शेजारील देश पाकिस्तानमध्येही गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतो. कराचीमधील हिंदू बंधावही मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा करतात.

मागच्या वर्षी कराचीमध्ये अगदी साधेपणाने पण उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात आला होता. मागील वर्षी कराचीमधील क्लिफ्टन रोडवरील श्री रत्नेश्वर महादेव मंदिरात बाप्पा विराजमान झाले होते. कराचीमध्ये आत्ताही मराठी भाषिक वास्तव्यास आहेत. आताही जवळपास 150 च्या आसपास मराठी कुटुंबे कराचीमध्ये राहतात. महाराष्ट्रातील सणाप्रमाणे कराचीतील मराठी बांधवही सण, उत्सव साजरे करतात.

पाकिस्तानमधील हिंदू नागरिकही या सण उत्सवात सहभागी होतात. स्वातंत्र्यापूर्वी कराचीमध्ये जवळपास 25 हजारांच्या आसपास मराठी भाषिक वास्तव्यास होते. कराचीत स्वातंत्र्यपूर्व काळापासून गणेशोत्सव साजरा केला जात आहे.

पाकिस्तानमधील बहुतांशी हिंदू हे सिंध प्रांतामध्ये राहतात. कराची ही सिंध प्रांताची राजधानी आहे. कराचीत प्रामुख्याने मंदिरामद्धे आणि हिंदू बांधवांच्या घरात गणेशोत्सव साजरा केला जातो. बहुतांश मूर्तीकार हे कराचीमध्येच राहतात. तर पाकिस्तानात होळीनंतर गणेशोत्सव हा सर्वाधिक लोकप्रिय हिंदू उत्सव असून होळीच्या दिवशी पाकिस्तानात सार्वजनिक सुट्टी असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सगळं सोडून द्यायचा विचार होता पण...; सुटकेनंतर संतोष पंडित काय म्हणाले? तुरुंगातल्या व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह

Panvel News: पनवेलमध्ये वाहतुकीत मोठे बदल! गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांसाठी प्रशासनाचे कडक पाऊल

Lalbaugcha Raja: सोनं,चांदी, डॉलर... 'लालबागचा राजा'च्या चरणी भरभरुन दान, ३ दिवसांत कोट्यवधींची देणगी; आकडा पाहून व्हाल थक्क!

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

तेजश्री प्रधानच्या मनात नेमकं काय? 'तो माझ्यासाठी खूप खास…' म्हणत व्यक्त केल्या भावना

SCROLL FOR NEXT