Ganeshotsav 2022 esakal
Ganesh Chaturthi Festival

Ganeshotsav 2022 : श्रद्धेची चेष्टा करणाऱ्या साधूला गणपती बाप्पाने शिकवला धडा

सकाळ डिजिटल टीम

आपण देवावर किती श्रद्धा ठेवावी हे कोणीही ठरवू शकत नाही. मात्र आपण ठेवत असलेल्या श्रद्धेच फळ आपल्याला जरूर प्राप्त होत असत. प्राचीन काळी भारतात अशाप्रकारे एका साधु आणि त्याच्या पत्नीला याचा प्रत्यय आला होता. काय नेमकं घडल होत हे या कथेतून जाणून घ्या.

(Ganeshotsav 2022 Ganpati Bappa teaches a lesson to a sadhu who mocks faith)

प्राचीन काळी भारतातील काशी नगराजवळील एका अरण्यामध्ये एक साधू आणि त्याची पत्नी राहात होते. ती साध्वी गणेशाची निस्सीम भक्त होती. तिच्यामुखी सदैव गणेशाचे नाव असायचे. तिचा पती म्हणजेच तो साधू हा गणेशाचे स्मरण करत असे पण ते तेव्हढ्यापुरते तेव्हढे. मात्र त्याची पत्नी गणेशाचे नियमीत पुजन करीत असे, हे काही त्याला पटत नसे. पत्नीसाठी तीचा पतीच आराध्य असावा आणि तिने केवळ त्याचीच पुजा करावी असे त्याला वाटत असे. म्हणून तो साधू त्याच्या पत्नीवर तिने गणेशाचे नामस्मरण सुरु केले की चिडत ओरडत असे.

एके वर्षी त्या नगरात जोरदार पाऊस झाला. अगदी महापुराची परिस्थीती अरण्यात असलेल्या नदीला पुर आल्याने साधूच्या आश्रमात पाणी शिरले होते. काही काळाने परिस्थीती आणखी बिकट झाली आणि ते दोघेही तेथेच अडकून पडले. तेव्हा ती साध्वी गणेशाची प्रार्थना करु लागली, तेव्हा साधू तिला म्हणाला इथे तुझ्यासोबत मी आहे, गणेश नाही त्यामुळे प्राण वाचविण्यासाठी तू माझी प्रार्थना कर गणेशाची नाही. पतीचे ते शब्द तिने ऐकले त्याप्रमाणे तिने केलेही. पुर आणखी वाढत गेला. गणेशाने मात्र आपल्या निस्सीम भक्ताला वाचविण्यासाठी बचावकार्य करणाऱ्या नाविकांची होडी तेथे पाठवली. ते त्या होडीत बसले. तेव्हा साधु म्हणाला बघितलस इथे तुझा गणेश नाही ही लोक आलीत आपल्याला वाचवायला. तेव्हा साध्वी काहीही बोलली नाही.

नौका नदी पार करत असताना अचानक एक मोठी लाट आल्याने नौका थोडी तिरकी झाली, यात साधूचा तोल गेला अन् पुराच्या पाण्यात पडला. पाण्यात पडताच जीव वाचविण्यासाठी आटापिटा करु लागला. पत्नीला म्हणाला तुझा पतीचे प्राण संकटात आहे आणि असे असताना तू तुझ्या गणेशाला काहीही सांगत नाहीयेस... तेव्हा नाविकाचे रुप धारण केलेल्या गणेशाने प्रकट होत साधूला सांगतिले, हे साधू प्रत्येक वेळी मी मुळ रुपात येवूनच तुमचे प्राण वाचविले पाहीजे असे नाही, गरजेनुसार मी रुप धारण करुन मी भक्तांची कार्ये सत्करणी लावत असतो. तुझी पत्नी माझी निस्सीम भक्त आहे. म्हणून केवळ मी येथे आलो होतो. याचा अर्थ तु माझा भक्त असावा किंवा माझी भक्ती करावीच असे नाही, पण जो भक्ती करतो आहे त्याच्या भक्तीमार्गात अडथळा आणू नकोस. असे केल्याने तुझ्या पापात वाढ होईल. अशी शिकवण देत गणेशाने साधूला पाण्यातून बाहेर काढून दोघांना सुखरुप स्थळी पोहोचवले. तेव्हा गणेशाला लोटांगण घालून साधू त्यांची क्षमा याचना करु लागला व यापुढे मी कधीही असे करणार नाही असे वचनच त्याने बाप्पाला दिले.

आपल्या आयुष्यात अनेक संकटे येतात, त्यातून निराशा वाढत जाते मात्र अशातही आपल्या आरध्याचे आपण स्मरण करत राहीलो आणि मनी आत्मविश्वास कायम ठेवला कि मोठ- मोठ्या संकटांपासून आपला बचाव निर्विघ्न देवता करत असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: मनोज जरांगेचं आंदोलन बेकायदेशीर... अनेक अटींच उल्लंघन... हायकोर्टात काय घडलं? राज्य सरकारने मांडली बाजू

Karad News: 'मलकापूरला कंटेनर अडकल्‍याने वाहतूक कोंडी'; वाहनांच्या सुमारे तीन किलोमीटरपर्यंत रांगा

Live Breaking News Updates In Marathi: सीएसएमटी रेल्वे स्थानक परिसरात डॉग स्कॉड पथकाकडून पाहणी

पन्हाळा तालुक्यात घरगुती वादातून सेवानिवृत्त सैनिकाकडून मेव्हण्यावर गोळीबार; दोन वेगवेगळ्या गोळीबाराच्या घटनांनी जिल्हा हादरला

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग....'वर्षा' निवसस्थानी महत्त्वाची बैठक, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित, तोडगा निघणार?

SCROLL FOR NEXT