Ganeshotsav 2023 Prasad Sakal
Ganesh Chaturthi Festival

Ganeshotsav 2023 Prasad : शास्त्र प्रसादाचे - आरोग्यवर्धक गहुल्याची खीर

Ganeshotsav 2023 Prasad रव्यामध्ये मॅग्नेशिअम आणि झिंक हे पोषक घटकही असतात.

सकाळ डिजिटल टीम

- राधिका शहा, आहारतज्ज्ञ, एलओसी

दूध, रवा आणि साखर हे गहुल्याच्या खिरीतील मुख्य घटक आहेत. काही जण यात केशरही मिक्स करतात. रवा हा गव्हापासून तयार होतो. परंतु तो पूर्णपणे बारीक नसतो. त्यामुळे गव्हातील फायबरचे चांगले प्रमाण रव्यात असते.

मधुमेही रुग्णांसाठीही यातील फायबर उपयुक्त असते. यात मेदाचे प्रमाण अत्यल्प असल्याने शरीराच्या पोषणात याचे महत्त्व ठळकपणे अधोरेखित होते. यात कर्बोदकही असतात. 

रवा 

रव्यामध्ये मॅग्नेशिअम आणि झिंक हे पोषक घटकही असतात. मेंदूच्या संस्थेशी संबंधित आजार बरे करण्यासाठी किंवा प्रतिबंधित करण्यासाठी हे घटक महत्त्वाचे ठरतात. 

दूध

या खिरीतला दूध हा आणखी एक महत्त्वाचा घटक. दूध हा कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअमचा मुख्य स्त्रोत असतो. त्याद्वारे दात आणि हिरड्या बळकट होतात. 

साखर

तिसरा घटक साखर आहे. साखर हा ऊर्जेचा प्रमुख स्त्रोत. यात साखरऐवजी गूळ आणि तूप घातल्यास स्तनदा मातांनाही ते उपयुक्त ठरते. यामुळे दूध वाढण्यास मदत मिळते.

मधुमेह किंवा वजन जास्त असलेल्या रुग्णांनी गायीचे दूध साय काढून वापरावे. त्यामुळे यातील मेदाचे प्रमाण कमी करता येईल. मधुमेहींसाठी साखरेला पर्याय म्हणून शुगर फ्री घटकांचा वापर करावा. 

नैसर्गिक गोडवा हवा असल्यास गूळ किंवा साखरेऐवजी खजूर अथवा त्याच्या पाण्याचा वापर करावा. अशा वेगवेगळ्या पद्धतीने केलेल्या गहुल्याच्या खिरीतून शरीरास सात्त्विक घटक मिळतात तसेच यातून ऊर्जाही मिळते. 

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : वेतनवाढीपूर्वीच कर्मचाऱ्यांना मोठा धक्का ! 'या' मुद्द्यावर सरकारने दिला स्पष्ट नकार

Success Story: श्वेता पवार खेळाडू कोट्यातून राज्यात प्रथम; पोलिस उपनिरीक्षकपदी निवड, संघर्षातून एमपीएससीमधील तिसरे यश!

Latest Marathi News Live Update : कोल्हापूरमध्ये बनावट नोटा जप्त, दोघांना अटक

बंगालमध्ये भाजपचा 'खेला'; ममतांचा पराभव करण्यासाठी काढला हुकुमाचा एक्का, कोण आहेत सुवेंदू अधिकारी?

Whatsapp Guest Chats : आता अकाऊंट नसताना चालणार WhatsApp! नंबर सेव्हपासून अन् ॲप डाउनलोड करण्यापर्यंतच टेन्शन संपणार, जाणून घ्या कसं?

SCROLL FOR NEXT