Satara Ganeshotsav esakal
Ganesh Chaturthi Festival

Satara Ganeshotsav : आनंदमयी पर्वाला दिमाखात सुरुवात; तब्बल दोन लाख 35 हजार 608 गणेशमूर्तींची भक्तिभावाने स्थापना

उत्साहाच्या वातावरणात ढोल, ताशांच्या गजरात आज जिल्ह्यातील विविध भागांत गणरायाचे आगमन झाले.

सकाळ डिजिटल टीम

जिल्ह्यामध्ये एकूण पाच हजार २८५ ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली.

सातारा : लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी (Satara Ganeshotsav) संपूर्ण जिल्हा सज्ज होता. दिवसभरात मोठ्या उत्साहाने विविध कार्यालये, सार्वजनिक मंडळे तसेच घरगुती अशा तब्बल दोन लाख ३५ हजार ६०८ गणेशमूर्तींची मोठ्या भक्तिभावाने स्थापना करत जिल्हावासीयांनी आनंदोत्सवाला सुरुवात केली.

दहा दिवस संपूर्ण जिल्ह्यात चैतन्यमय वातावरण राहणार आहे. काल (मंगळवार) सकाळपासूनच गणेशमूर्ती (Ganesh Idol) आणण्यासाठी घरगुती व मंडळांच्या कार्यकर्त्यांची तयारी सुरू होती. उत्साहाच्या वातावरणात ढोल, ताशांच्या गजरात आज जिल्ह्यातील विविध भागांत गणरायाचे आगमन झाले.

जिल्ह्यामध्ये विविध संस्था व कार्यालयांमध्ये एक हजार २३० गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली, तर दोन लाख २९ हजार ९३ घरांमध्ये घरगुती गणेशमूर्तींची स्थापना झाली. हा सर्व उत्सव शांततेत व आनंदात साजरा व्हावा, यासाठी जिल्हा पोलिसांनी जिल्ह्यातील सर्वच शहरे व गावातील मिरवणूक मार्गांवर तसेच गर्दीच्या ठिकाणांवर बंदोबस्त तैनात केला होता. साध्या वेशातील पोलिसही ठिकठिकाणी वावरत होते.

त्यामुळे रात्रीपर्यंत उत्सवामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडल्याची माहिती नव्हती. जिल्ह्यामध्ये एकूण पाच हजार २८५ ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली. त्यातील अतिसंवेदनशील असलेल्या ३७ ठिकाणच्या गणेश उत्सवांच्या ठिकाणी पोलिसांनी जादाची कुमक पुरवली आहे. मिश्र वस्तीत असलेल्या ७७६ गणेश मंडळांवरही पोलिसांनी बारकाईने लक्ष ठेवले आहे. नागरिकांनी उत्साहाने उत्सवात सहभाग नोंदवावा, कोणताही अनुचित प्रकार टाळावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

५९६ एक गाव, एक गणपती

आनंदाचा हा उत्सव संपूर्ण गावामध्ये एकत्रपणे राबविला जावा, यासाठी पोलिस दलाचे विशेष प्रयत्न सुरू असतात. त्याला जिल्ह्यातील ५९६ गावांतील ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे या गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रम राबविला गेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pak Rapper Indian Flag : पाक रॅपरने शो मध्ये फडकवला 'तिरंगा'! पाकिस्तानात संतापाची लाट, व्हिडिओ व्हायरल, काय घडलं नेमकं?

WPL 2026 Date: मोठी बातमी! महिला प्रीमियर लीग २०२६ कधीपासून सुरू होणार? तारीख आली समोर

नॅशनल क्रश झाल्यानंतर दोन दिवसात गिरीजा ओकचे किती फॉलोवर्स वाढले? आकडा वाचून भुवया उंचावतील

१० वी पास...१० वर्षांचा प्रिटिंगचा अनुभव...YouTube बघून तयार केल्या बनावट नोटा अन्...; पठ्ठ्याची करामत वाचून व्हाल थक्क

Mumbai News: मुंबईला जागतिक दर्जाचे टनेल मत्स्यालय मिळणार! कुठे अन् कधी पूर्ण होणार? बीएमसीने संपूर्ण योजना सांगितली

SCROLL FOR NEXT