Kolhapur Ganeshotsav esakal
Ganesh Chaturti Festival

Kolhapur Ganeshotsav : गणरायांच्या आगमनालाच दणदणाट; रशियन DJ लिंडाने थिरकवली तरुणाई, रात्री 12 ला पोलिसांनी बंद केल्या सिस्टीम

डिजिटल स्क्रिनवर दिसणारी आकर्षक रोषणाई सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.

सकाळ डिजिटल टीम

पोलिसांनी दिलेल्या क्रमानुसार मंडळांनी गणेशमूर्ती असणारे सजवलेले ट्रॅक्टर रांगेत उभे केले होते. सूर्य अस्ताला गेला आणि मिरवणुकीला रंग आला.

कोल्हापूर : पावसाच्या हलक्या सरीमध्ये धुंद तरुणाई, साउंड सिस्टीमच्या दणदणाटावर थिरकणारी पावले आणि आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून गेलेला परिसर अशा वातावरणात राजारामपुरी येथील गणेश आगमन मिरवणूक (Kolhapur Ganeshotsav) पार पडली.

मिरवणुकीसाठी पोलिसांनी एकच मार्ग केल्याने शिस्त लागली; पण उत्साही कार्यकर्त्यांमुळे ती रेंगाळली. ४३ मंडळांनी सहभाग घेतला. महिलांचा सहभागही लक्षणीय होता. रात्री १२ वाजता पोलिसांनी मिरवणुकीतील साउंड सिस्टीम नियमाप्रमाणे बंद केल्या.

गणेश आगमनाची राजारामपुरीतील मिरवणूक काही वर्षांपासून आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. राजारामपुरीसह त्या परिसरातील उपनगरांतील मंडळे त्यात सहभागी होतात. यंदाही ही मिरवणूक उत्साहात पार पडली. सायंकाळी ५ वाजता महापालिकेच्या ९ नंबर शाळेपासून मिरवणुकीला प्रारंभ झाला. तेथून राजारामपुरी पोलिस चौकी, जनता बझार चौक, राजारामपुरी मुख्य रस्ता आणि तेथून मारुती मंदिर असा मिरवणुकीचा मार्ग होता.

पोलिसांनी दिलेल्या क्रमानुसार मंडळांनी गणेशमूर्ती असणारे सजवलेले ट्रॅक्टर रांगेत उभे केले होते. सूर्य अस्ताला गेला आणि मिरवणुकीला रंग आला. पावसाच्या हलक्या सरी बरसू लागल्या. पावसात भिजलेले कार्यकर्ते आपल्या मंडळाचे झेंडे फिरवत नाचू लागले. डिजिटल स्क्रिनवर दिसणारी आकर्षक रोषणाई सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. विविधरंगी प्रकाश किरणांनी परिसर उजळून गेला. काही मंडळांनी आपल्या गल्लीमध्ये बॅरिकेड्‍स लावून कार्यकर्त्यांना नाचण्यासाठी जागा केली होती.

राजकीय पक्षांचे स्वागत कक्ष

भाजप, आम आदमी पार्टी, काँग्रेस, शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (ठाकरे गट) यांचे स्वागत कक्ष होते. मिरवणुकीत सहभागी मंडळांना येथे नारळ देऊन त्यांचे स्वागत केले जात होते. पक्षांच्या नेत्यांनी या कक्षांना भेट दिली व कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार जयश्री जाधव, ऋतुराज क्षीरसागर, आम आदमी पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई, भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव, कृष्णराज महाडिक यांनी मंडळांना भेटी दिल्या.

ऋतुराज पाटील यांचा ‘ट्रॅक्टर डान्स’

आमदार ऋतुराज पाटील आगमन मिरवणुकीत सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांनी आग्रह केल्यावर त्यांनी ट्रॅक्टरच्या बॉनेटवर चढून नृत्य केले. तर एका मंडळात त्यांनी ध्वज गोल फिरवून तरुणांना प्रोत्साहन दिले.

रशियन डीजे लिंडाने थिरकवली तरुणाई

शिवप्रेमी तरुण मंडळाने जनता बझारशेजारील गल्लीमध्ये स्टेज बनवले होते. तेथे रशियाची डीजे लिंडा यांनी विविध गाणी मिक्स करून तरुणांना बेधुंद केले. लिंडा यांना पाहण्यासाठी महिलाही मोठ्या प्रमाणात आल्या होत्या.

हे होते आकर्षण

जय शिवराय मंडळ, न्यू गणेश मंडळ, आर. के. तालीम, नितीन तरुण मंडळ, मास्टर स्पोर्टस् यांनी केलेली विद्युत रोषणाई मिरवणुकीचे आकर्षण ठरली. जय शिवराय तरुण मंडळ राजारामपुरी, यांनी केलेल्या फुलांच्या आरासीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सम्राटनगरमधील जयशिवराय मंडळाने सजवलेल्या रथामध्ये गणपतीची मूर्ती ठेवली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT