Ganesh Chaturthi 2023 Beetroot Modak
Ganesh Chaturthi 2023 Beetroot Modak Sakal
ganesh food recipe

Ganesh Chaturthi 2023 Prasad : बीटरूटचे मोदक, घरच्या घरी झटपट तयार करा रेसिपी

सकाळ डिजिटल टीम

- नीलिमा नितीन

Ganesh Chaturthi 2023 Prasad : ज्या दिवसांची आपण वर्षभर वाट पाहत असतो, ते दिवस आले आहेत. आपल्या घरी बरेच पाहुणे येत असतात. त्यात त्यांचे वेगवेगळे प्रकार असतात. प्रत्येक पाहुण्याशी आपले इक्वेशन वेगवेगळे असते. काही पाहुणे आल्यावर वेळ आणि पाहुणे कधी एकदा जातात असं होतं, तर काहींच्या येण्याची आपण आतुरतेनं वाट पाहत असतो. 

मनात खूप सारे प्लॅन्स करत असतो. ते आल्यावर असं करायचं, तसं करायचं वगैरे. वर्षभर साठवलेल्या गुजगोष्टी आपल्याला त्यांना सांगायच्या असतात. काही तक्रारी मांडायच्या असतात, तर काही गोष्टी आनंदाने सांगायच्या असतात. कुठलाही किंतु परंतु मनात न राखता, मान-अपमानाच्या पलीकडे आपलं त्याचं नातं असतं. हो या नात्याला नात्यात अहो-जाहो म्हणायचीही गरज नसते.

कारण तो आपला असतो, अगदी हक्काचा. आपली चूक कबूल करायला ज्याच्यासमोर मन घाबरत नाही, कारण तो आपल्याला समजून घेईल व योग्य समज देईल ही खात्री असते. असा पाहुणा क्वचितच असतो, नाही का? जो आपलं काही उणंदुणं बघत नसतो. असाच एक पाहुणा म्हणजे आपला बाप्पा. तो आला की त्याला कुठं ठेवू, काय करू  असं होतं. 

त्याच्या येण्याच्या चाहुलीनं सर्व घरच नव्हे तर शहरही गजबजू लागतं. आनंदाला पारावार राहत नाही. वाजतगाजत, नाचत आपणत्याला आपल्या घरी आणतो. कधी त्याच्या विशाल अथांग, गहिऱ्या डोळ्यात बघत आपण लहान होऊन जातो, तर कधी त्याचं गोंडस बाळरूप आपल्याला त्याचं कोडकौतुक करण्यास भाग पाडतं. 

आपण त्याच्या आगमनाची वर्षभर वाट पाहत असतो आणि हे दिवस कासवाच्या गतीने जात असतात; पण एकदा का बाप्पा आपल्या घरी आला, की जणू या कासवाला पंख फुटतात आणि भराभर दिवस निघून जातात. चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा हा अधिपती. त्याचं आपण पामर काय कौतुक पुरणार? पण आपल्या परीने या आस्वादक पाहुण्याचे लाड पुरवायला नकोत? त्याच्या लाडात, सेवेत कमी करून कसे चालेल?

मागे मी माझ्या ‘कुथ विथ नीलिमा’ या युट्यूब चॅनेलवर एक प्रसाद सीरिज केली होती. त्यात बाप्पासाठी दररोज एक नवीन प्रसाद तयार केला होता. विशेष गोष्ट ही होती की काहीही ठरवून केलं नव्हतं. तरीही दहा दिवस दररोज नवीन काहीतरी तो घडवून घेत होता. 

ज्या पाककृतींचा मी विचारही कधी केला नव्हता, असे नवनवीन पदार्थ मी बनवत होते. माझंच मला आश्चर्य वाटत होतं. पण बाप्पाचे लाड पुरवताना मन अगदी प्रसन्न होतं होतं. आज तुमच्यासाठी मी त्या सीरिजमधील एक रेसिपी घेऊन आले आहे.

आपण पारंपरिक मोदक तर तयार करतोच, त्यापेक्षा हे मोदक थोडे वेगळे आहेत. त्यांचा सुंदर चटकदार रंग आकर्षक तर आहेच. पण त्याची चवही खूप सुंदर लागते आणि हे मोदक पटकन तयारही होतात. जेणेकरून तुम्हाला किचनमध्ये अडकून राहण्याची गरज नाही. 

साहित्य

  • वाफवलेल्या बीटरूटची प्युरी - एक कप

  • कंडेन्स्ड मिल्क - पाऊण ते एक कप

  • डेसिकेडेट कोकोनट - एक कप

  • वेलदोड्याची पूड - एक चमचा

  • सजावटीसाठी थोडे ड्रायफ्रुट्स आणि डेसिकेटेड कोकोनट

कृती 

  • प्रथम कढईमध्ये बीटरूट प्युरी परतून घ्या.

  • नंतर त्यात कंडेन्स्ड मिल्क मिक्स करा व मिश्रण थोडे आटू द्या.

  • मिश्रण आटत आल्यावर यात डेसिकेटेड कोकोनट म्हणजेच नारळाचा कीस घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या व याचा गोळा होईपर्यंत मिश्रण परतून घ्यावे.

  • गॅस बंद करून यात वेलचीपूड घाला व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या.

  • मोदकाच्या साच्याला तूप लावून या मिश्रणाचे मोदक तयार करून घ्या. 

  • साचा नसल्यास तुम्ही याचे लाडू तयार करू शकता.

तयार आहेत आपले बीटरूटचे स्वादिष्ट मोदक. सगळ्यांना खुशाल ठेवा एवढी प्रार्थना करून हा नैवेद्य बाप्पा चरणी अर्पण करूया. गणपती बाप्पा मोरया.

Video Credit Instagram @sha_lini0915

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accindet: कोणालाही पाठीशी घालणार नाही; अजित पवारांनी केले स्पष्ट

Latest Marathi News Live Update: बंगालमध्ये वाद पेटला, TMC-ISF समर्थकांमध्ये हाणामारी, भाजपचा आरोप- पराभवाच्या भीतीने हिंसाचार

Amhi Jarange: 'आम्ही जरांगे -गरजवंत मराठ्यांचा लढा' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार अण्णासाहेब पाटलांची भूमिका; टीझर रिलीज

Cristiano Ronaldo: शेवटच्या क्षणी पराभव, नेमारनंही डिवचलं अन् रोनाल्डोला अखेर अश्रु अनावर, पाहा Video

Chennai-Mumbai Flight: 172 प्रवाशांच्या जीवाशी खेळ, चेन्नई-मुंबई फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, विमान अज्ञात स्थळी हलवले

SCROLL FOR NEXT