Ganeshutsav 2022 cm eknath shinde devendra fadnavis  at mukesh ambani house antilia
Ganeshutsav 2022 cm eknath shinde devendra fadnavis at mukesh ambani house antilia  
गणेशोत्सव फोटो स्टोरी

Ganeshotsav : CM शिंदे पोहचले अंबानींच्या घरी, पाहा अँटिलियामधील खास PHOTOS

सकाळ डिजिटल टीम

सध्या सर्वत्र गणेशउत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे, सध्या आपल्याकडे संबंध वातावरण चैतन्यमय झालं आहे. घरोघरी बाप्पा विराजमान झाले आहेत. प्रत्येकजण आपल्या घरातील सजावट, गणेशाची मूर्ती. आरास याचे फोटो शेअर करत आहेत.

यादरम्यान राजकीय क्षेत्रात देखील गणपती उत्सवाची धूम पाहायला मिळत आहे, आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी सायंकाळी अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांची दक्षिण मुंबईतील निवासस्थानी भेट घेत गणरायाचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः या भेटीचे फोटो ट्विट केले आहेत.
रिलायन्स उद्योग समूहाचे संचालक मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानी उपस्थित राहून श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
या भेटीच्या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, मुकेश अंबानी यांच्या आई कोकिळाबेन अंबानी, चिरंजीव अनंत अंबानी उपस्थित होते, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंबानी कुटुंबियांच्या घरातील गणपती बाप्पांच्या मूर्तीचा फोटो देखील शेअर केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंबानी कुटुंबियांच्या घरातील गणपती बाप्पांच्या मूर्तीचा फोटो देखील शेअर केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

Banmeet Narula: डार्क वेबद्वारे ड्रग्ज विकणारांना ईडीने उचलले; 130 कोटी रुपयांचे बिटकॉईन जप्त

तुम्‍ही सत्तेत असताना इथले उद्योग गुजरातला का गेले? नारायण राणेंच्या प्रचारसभेत राज ठाकरेंचा उद्धव यांना थेट सवाल

Latest Marathi News Live Update : "पंतप्रधान मोदी यांच्या हातात देश, सीमा आणि सैनिक सुरक्षित नाहीत," समाजवादी पक्षाचा हल्लाबोल

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT