France indian hostgages  sakal
ग्लोबल

France News: ताब्यात घेतलेल्या त्या ३०३ भारतीयांची झाली सुटका

सकाळ डिजिटल टीम

France News: मानवी तस्करीच्या संशयावरून फ्रान्स सरकारने ताब्यात घेतलेल्या विमानातील ३०३ भारतीयांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे मागील तीन दिवसांपासून अडकून पडलेल्या प्रवाशांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला आहे.


संयुक्त अरब अमिरातीहून उड्डाण केलेले हे विमान निकाराग्वा देशाच्या दिशेने निघाले होते. या विमानात ३०३ प्रवासी होते आणि त्यांची तस्करी होत असल्याच्या संशयावरून फ्रान्स सरकारने गुरुवारी (ता. २१) ते विमान खाली उतरण्यास लावून ताब्यात घेतले. तेव्हापासून हे सर्व प्रवासी विमानतळावरच अडकून पडले होते. या प्रकरणात भारतीय दूतावासानेही लक्ष घातले होते. विमानतळावरच तात्पुरते न्यायालय स्थापन करून या सर्व प्रवाशांची सुनावणी घेतली जाणार होती.

मात्र, विमानतळ प्रशासनानेच विमानाला उड्डाण करण्याची परवानगी दिल्याने न्यायाधीशांनीही प्रक्रियेतील त्रुटीचे कारण देत सुनावणी रद्द केली. आता हे विमान उद्या (ता. २५) सकाळी पॅरिसहून उड्डाण करणार आहे. मात्र, प्रवासी भारतीय असल्याने ते भारतात येणार, की जाण्याचे मूळ ठिकाण निकाराग्वा असल्याने तिकडे जाणार, की ज्या शहरातून उड्डाण केले होते त्या दुबईला जाणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.


विमानातील काही प्रवाशांनी आपल्या कुटुंबीयांशी दूरध्वनीवरून संवाद साधला आहे. प्रवाशांपैकी १० जणांनी फ्रान्स सरकारकडे आश्रय देण्याची मागणी केली आहे. विमानात पालक बरोबर नसलेली ११ बालके होती. हे विमान रोमानियामधील एका कंपनीचे आहे. त्यांनी मानवी तस्करीचा आरोप फेटाळून लावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Budget 2026 : संरक्षण नाही तर 'या' क्षेत्रावर होणार सर्वाधिक खर्च! शेतीसाठी किती खर्च?

Union Budget-2026 : ''तरुणांकडे नोकरी नाही, शेतकरी संकटात, हा अर्थसंकल्प म्हणजे...''; राहुल गांधींची टीका; खरगेंनीही मोदी सरकारला केलं लक्ष्य

Video : सावळ्याची जणू सावलीमध्ये गुरु-शिष्यांमध्ये रंगणार संगीताची जुगलबंदी ! प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणाले..

Budget 2026 Analysis : यंदाचा 'अर्थसंकल्प' मध्यवर्गीय, ज्येष्ठ नागरीक, शेतकरी अन् गुंतवणुकदारांसाठी नेमका कसा?

Union Budget 2026: पुढील दशक खेळाडूंचे! क्रीडा क्षेत्रासाठी निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT