Indo_China_Border 
ग्लोबल

गलवान खोऱ्यातील झटापटीत चीनचे ४५ सैनिक मारले गेले; रशियन वृत्तसंस्थेची माहिती

वृत्तसंस्था

मॉस्को/ नवी दिल्ली : भारत आणि चीन या शेजारी-शेजारींमध्ये पूर्व लडाखच्या सीमेवरून गेल्या काही महिन्यांपासून तणावाचे वातावरण आहे. हा वाद मिटण्यासाठी दोन्ही देशांकडून प्रयत्न केले जात आहेत. आपापले सैन्य माघारी घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी (ता.११) राज्यसभेत दिली.  

याच पार्श्वभूमीवर रशियाचा तास या वृत्तसंस्थेने एक मोठा खुलासा केला आहे. १५ जून २०२० रोजी गलवान खोऱ्यात झालेल्या झटापटीदरम्यान ४५ चीनी सैनिक, तर भारताचे २० जवान शहीद झाले होते, असे म्हटले आहे. (Russian news agency Tass informed about China lost 45 soldiers in galwan valley clashes with India) पण गलवान खोऱ्यातील झटापटीमध्ये आपले किती सैनिक ठार झाले, याबाबत चीनने कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. दुसरीकडे अमेरिकेतील काही माध्यमांनी गलवान खोऱ्यात चीनचे ४० हून अधिक सैनिक ठार झाल्याचे वृत्त दिले होते. भारतीय गुप्तचर संस्थेनेही असाच अंदाज वर्तवला होता. 

दरम्यान, भारत-चीन सैन्यामध्ये हिंसाचार झाल्यानंतर दोन्ही देशांनी सीमेवर अतिरिक्त सैनिक तैनात केले होते. आता या दोन्ही देशांमध्ये सीमेवरून असलेला वाद निवळल्याचे संकेत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिले. चीनने फिंगर फोरपर्यंत आपले सैन्य तैनात केले होते, त्यामुळे वादाला तोंड फुटले होते. आता पँगॉंग बॉर्डर भागातून सैन्य मागे घेण्यास चीनने होकार दिला आहे. तसेच एप्रिल २०२० च्या अगोदर जी परिस्थिती होती ती कायम ठेवली जाणार आहे. तसेच या भागात चीनने केलेले बांधकाम पाडण्यात येणार असून टप्प्याटप्प्याने सैन्य मागे घेण्यात येणार असल्याची माहिती सिंह यांनी दिली. 

- जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT