Burkina Faso Attack esakal
ग्लोबल

बुर्किना फासोमध्ये दहशतवाद्यांनी 55 नागरिकांना मारलं ठार

सकाळ डिजिटल टीम

बुर्किना फासोमध्ये काही बंदूकधाऱ्यांनी 55 जणांची गोळ्या झाडून हत्या केलीय.

बुर्किना फासोमध्ये (Burkina Faso) रविवारी काही बंदूकधाऱ्यांनी 55 जणांची गोळ्या झाडून हत्या केलीय. अधिकाऱ्यांनी सोमवारी ही माहिती दिली. उत्तर बुर्किना फासोमध्ये (Burkina Faso Attack) आठवड्याच्या शेवटी ही घटना घडल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

सरकारी प्रवक्ते वेंडकौनी जोएल लिओनेल बिल्गो (Wendkouni Joel Lionel Bilgo) यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, संशयित बंदूकधाऱ्यांनी पश्चिम आफ्रिकन देशातील सेनो प्रांतातील सेटेंगा (Seytenga, West African Country) इथं नागरिकांना लक्ष्य केलंय.

विशेष म्हणजे, बुर्किना फासोमध्ये वाढत्या हिंसक घटनांसाठी इस्लामिक अतिरेक्यांना जबाबदार धरलं जात आहे. बुर्किना फासोमध्ये गेल्या दोन वर्षांत हिंसक घटनांमध्ये जवळपास 5000 लोक मारले गेले आहेत. याशिवाय, 20 लाख लोकांनी आपली घरं सोडली असून देशातील मानवतावादी संकट अधिक गडद होत चाललंय. अल-कायदा आणि इस्लामिक स्टेट गटाशी (Islamic Extremists) संबंधित हल्ले बुर्किना फासोमध्ये, विशेषतः उत्तरेकडील प्रदेशांमध्ये वेगाने वाढत आहेत. गेल्या वर्षी जूनमध्ये (2021) सोल्हान शहरात जिहादींनी केलेल्या हल्ल्यात किमान 160 लोक मारले गेले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Care : कोण म्हंटल माधुरी हत्तीचा विषय शांत झालाय, वनताराची टीम पुन्हा नांदणीत; आजच्या बैठकीत काय घडलं?

Jalgaon News : जळगाव महापालिकेत लाचखोरीचा पर्दाफाश; लिपिक व समन्वयक एसीबीच्या जाळ्यात

Rain-Maharashtra Latest Live News Update: ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्प- ईसापुर धरण पाणी पातळी वाढ

Rajiv Gandhi : अन् राजीव गांधी मुंबईतून गेले ते कायमचेच! राजभवनातील माजी अधिकाऱ्याने सांगितली शेवटच्या भेटीची आठवण

Beed Crime: सुरेश धस यांचे कार्यकर्ते आहोत, असं म्हणत एकाला बेदम मारहाण; शिरुरमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT