Terrorist Attack Israel esakal
ग्लोबल

Israel : जेरुसलेमच्या प्रार्थनास्थळावर गोळीबार; दहशतवादी हल्ल्यात आठ ठार, 10 जण जखमी

पोलिसांनी या हल्ल्याला दहशतवादी हल्ला असल्याचं म्हटलंय.

सकाळ डिजिटल टीम

वेस्ट बँकमध्ये इस्रायली लष्करी हल्ल्यात नऊ लोक मारले गेल्याच्या एका दिवसानंतर हा हल्ला झाला आहे.

जेरुसलेम : इस्रायलची राजधानी जेरुसलेमच्या (Israel Jerusalem) एका प्रार्थनास्थळावर शुक्रवारी गोळीबाराची घटना उघडकीस आली. या गोळीबारात आठ जणांचा मृत्यू झाला, तर 10 जण जखमी झाले.

पोलिसांनी या हल्ल्याला दहशतवादी हल्ला असल्याचं म्हटलंय. इस्रायल परराष्ट्र मंत्रालयाच्या हवाल्यानं रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं ही माहिती दिलीये. हल्लेखोर जागीच ठार झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.

इस्रायल पोलिसांनी (Israel Police) सांगितलं की, हा हल्ला पूर्व जेरुसलेममधील ज्यूंच्या शेजारच्या नेव्ह याकोव्हमध्ये झाला. हल्ल्यानंतर काही वेळातच पोलीस दल घटनास्थळी पोहोचलं आणि त्यांनी हल्लेखोरावर गोळ्या झाडल्या. मात्र, पोलिसांनी याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. एपी या वृत्तसंस्थेनं ही माहिती दिलीये.

दरम्यान, वेस्ट बँकमध्ये इस्रायली लष्करी हल्ल्यात नऊ लोक मारले गेल्याच्या एका दिवसानंतर हा हल्ला झाला आहे. प्रार्थनास्थळावर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेनं स्वीकारलेली नाही. मात्र, इस्लामी अतिरेकी गट हमासनं जबाबदारी न स्वीकारता हल्ल्याचं कौतुक केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BEST Bus Accident : लोक खरेदी करत होते, तेवढ्यात बस आली अन्...; भांडूप बस अपघाताचा CCTV VIDEO समोर

Nagpur : फडणवीसांच्या विश्वासू कार्यकर्त्याला भाजपनं नाकारलं तिकिट, नाराजी व्यक्त करत दिला राजीनामा

BEST Bus: मुंबईकरांसाठी धावणार अतिरिक्‍त बेस्‍ट बस, नववर्षाच्या स्वागतासाठी प्रशासनाचा निर्णय; कसे असेल नियोजन?

Latest Marathi News Live Update : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस

समृद्धी महामार्गावर ट्रक अपघातात वाचले, रस्त्यावर थांबले असताना रुग्णवाहिकेनं उडवलं; एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT