COVID 19 vaccine  
ग्लोबल

सर्वात प्रथम लस घेणाऱ्यांच्या यादीत भारतीय वंशाच्या शुक्लांचा समावेश

सकाळ ऑनलाईन टीम

 जगाची डोकेदुखी वाढवणाऱ्या कोरोना विषाणूला थोपवण्यासाठी वेगवेगळ्या देशात सुरु असलेल्या लशीच्या प्रयोगाची सकारात्मकतेच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. या शर्यतीत आघाडीवर असलेल्या ब्रिटनमध्ये कोरोना लसीकरण कार्यक्रमाला आजपासून (मंगळवार) सुरुवात होत आहे. ब्रिटनमध्ये  ज्या लोकांना लस देण्यात येणार आहे त्यांची एक विशेष यादी तयार करण्यात आली असून उत्तर पूर्वी इंग्लंडमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीय वंशाच्या 87 वर्षीय हरि शुक्ला यांचेही या यादीत नाव आहे. जगभरातील मोजक्या लोकांना लस देण्यात येणार आहे. 

शुक्ला यांना न्यूकॅसमधील एका रुग्णालयात फायझर/बायोनटेकने विकसित केलेल्या लशीचा डोस देण्यात येणार आहे.  लशीचा डोस घेणे आपले कर्तव्य मानतो, अशी प्रतिक्रिया भारतीय वंशाच्या ब्रिटनमधील रहिवाशी असलेल्या शुक्ला यांनी दिली आहे.

 ते म्हणाले की, जागतिक महा साथीच्या रोगाचा खात्मा करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल पडत आहे. लसीचा डोस घेऊन मी माझ कर्तव्य पूर्ण करणार आहे. लस निर्माण करण्यात योगदान देणाऱ्या शास्त्रज्ञांनचेही त्यांनी आभार मानले आहेत. त्यांच्या मेहनतीचा सन्मान करायला हवा, असेही शुक्ला यांनी म्हटले आहे.   

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनीही देशातील लसीकरणासंदर्भात भाष्य केले आहे. कोरोनाविरोधातील लढा जिंकण्यासाठीचे हे एक मोठे पाऊल आहे. लशीची निर्मिती करण्यासाठी रात्रीचा दिवस करुन मेहन घेणाऱ्या सर्वांचा आम्हाला अभिमान वाटतो, असे त्यांनी म्हटले आहे. लसीकरण मोहिमेचा विस्तार करण्यासाठी आणखी काही दिवसांचा कालावधी जाणार आहे. त्यामुळे लोकांनी आपल्यापर्यंत लस पोहचत नाही तोपर्यंत खबरदारी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: पावसाने उघड केलं विकासाचं वास्तव! मुंबईत झाडं कोसळली, रस्ते वाहून गेले, मिसिंग लिंकवर खड्ड्यांचं साम्राज्य

Pune Flyover Work Stalled: कोरेगाव मूळ रेल्वे गेट क्र. ८ वरील बहुप्रतिक्षित उड्डाणपूलाचे काम भूसंपादन मोबदला न मिळाल्याने पुन्हा ठप्प

Latest Marathi Live Update : मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत

Education Crisis: अर्धापूरात ८४ शिक्षक बीएलओ कामात अडकले; दोन-दोन वर्गांवर एकच शिक्षक, विद्यार्थ्यांच्या शिक्षणहक्कावर गदा

रविवार ठरणार खास! आयुष्मान योगामुळे 2 राशींची लागणार लॉटरी; जाणून घ्या तुमचं भविष्य

SCROLL FOR NEXT