Rupert Murdoch Divorce sakal
ग्लोबल

मीडियाचा बादशाहा वयाच्या 91व्या वर्षी घेतोय चौथ्या बायकोपासून घटस्फोट

वयाच्या 91 व्या वर्षी रुपर्ट मरडॉक पुन्हा एकदा त्यांच्या चौथ्या बायकोपासून घटस्फोट घेत आहे.

सकाळ डिजिटल टीम

अमेरिकेच्या मीडिया क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्त्व असलेले रुपर्ट मरडॉक कायम कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरुन चर्चेत असतात. 91 वर्षांचे असलेले रुपर्ट मरडॉक पुन्हा एकादा त्यांच्या वैवाहीक जीवनावरुन चर्चेत आले. त्यांनी आतापर्यंत चार लग्न केले. मात्र आता वयाच्या 91 व्या वर्षी ते पुन्हा एकदा त्यांच्या चौथ्या बायकोपासून घटस्फोट घेत आहे. (91 year old rupert murdoch got divorce with his fourth wife jerry hall)

मरडॉक अमेरीकेच्या मीडीया क्षेत्रातील खुप मोठे नाव आहे. अमेरिकेतील श्रीमंत व्यक्तींमध्ये त्यांची गणना केली जाते. त्यांनी 65 वर्षांची अभिनेत्री जेरी हॉल (Jerry Hall) हिच्याशी 2016 मध्ये चौथं लग्न केलं होतं. जेरी हॉल 26 वर्षांनी मरडॉक पेक्षा लहान आहे आता मात्र त्यांचा घटस्फोट (Divorce) होतो आहे. त्यामुळे वयाच्या ९१ व्या वर्षी घटस्फोट घेणारे हे कदाचित पहिलेच व्यक्ती असेल. त्यामुळे हे प्रकरण विशेष चर्चेत आहे.

मरडॉकने पॅट्रिशिया बुकर हिच्याशी 1956 रोजी पहिल्यांदा लग्न केलं होतं. 11 वर्षं त्यांचं पहिलं लग्न टिकलं. पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतल्यानंतर त्यांनी अ‍ॅना मारिया टोव हिच्याशी दुसरं लग्न केलं. 1999 पर्यंत दुसऱ्या पत्नीसोबत होते मात्र नंतर तिलाही घटस्फोट दिला. 1999 मध्ये त्यांनी वेंडी डेंग हिच्याशी तिसरं लग्न केलं. 14 वर्षांनी या दोघांनीही घटस्फोट घेतला तर यानंतर 2016 मध्ये मरडॉक यांनी जेरी हॉल हिच्याशी लग्न केलं. मात्र आता हे घटस्फोट घेतंय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT