viral sakal
ग्लोबल

‘देने वाला जब भी देता..’ महिला वेटरला मिळाली चक्क अडीच लाखाची टीप

ही टीप जेवणाच्या किंमतीपेक्षा कितीतरी पटीने जास्त असल्याने चर्चेचा विषय ठरली.

सकाळ डिजिटल टीम

अमेरिकेत एका व्यक्तीने एका कॅफेमध्ये एक हजार रुपयांचे फुड खाल्ले पण जेव्हा टीप देण्याची वेळ आली तेव्हा तर या व्यक्तीने एका महिला वेटरला चक्क 2.5 लाख रुपयांची टीप दिली, तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे पण हे खरंय. ही टीप जेवणाच्या किंमतीपेक्षा कितीतरी पटीने जास्त असल्याने चर्चेचा विषय ठरली. सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतंय.

महिला वेटरने कदाचित स्वप्नातही विचार केला नसेल की तिली एवढी मोठी टीप मिळेल. एवढी मोठी टीप मिळाल्याने महिलेला आनंदाचा धक्का बसलाय.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

मैरिआना लैंबर्ट (Marianna Lambert) नावाची हि महिला अमेरिकेतील अल्फ्रेडो पिझ्झा कॅफेमध्ये काम करते. लोकांना जेवण सर्व्ह करणे आणि त्यानंतर त्यांना बिले देणे हे तिचे काम आहे. पण नुकतेच तिच्यासोबत असे काही घडले ज्यावर तिचा विश्वास बसला नाही. या कॅफेमध्ये एका व्यक्तीने येऊन एक हजार रुपयांचे फूड खाल्ले पण मारियानाने जेव्हा या व्यक्तीला बिल दिले तेव्हा तिचे नशीबच चमकले.

2 लाख 39 हजार रुपयांची टीप

या व्यक्तीनेमैरिआना लैंबर्टला 2 लाख 39 हजार रुपयांची टीप दिली. मैरिआनाला अजूनही विश्वास बसत नाही की तिच्यासोबत असे काही घडले आहे. या कॅफेमध्ये काम करणारे सर्व कर्मचाऱ्यांनाही आश्चर्य वाटले.खरं तर या महिलेचे नशीब एका रात्रीत बदलले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT