Corona-USA
Corona-USA 
ग्लोबल

Coronavirus : नोकरी जाण्याच्या दडपणाखाली जगताहेत ६६ लाख अमेरिकी नागरिक!

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : कोरोनाचा सर्वात जास्त फटका सहन करत असलेला देश म्हणून सध्या जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेकडे पाहिले जात आहे. दिवसेंदिवस येथील रुग्णांच्या संख्येत भर पडत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर आता अमेरिकेतील ६६ लाखहून अधिक लोकांना नोकरी जाण्याच्या भीती सतावते आहे. त्यामुळेच त्यांनी नोकरी जाण्याअगोदर मिळणाऱ्या सुविधांसाठी रजिस्ट्रेशन केले आहे, जे सध्या एक रेकॉर्ड बनले आहे.   

२० जानेवारीला कोरोनाने अमेरिकेच्या जमिनीवर पाय ठेवला. चीनमधील वुहानवरून आलेल्या एका ३५ वर्षीय तरुणासोबत कोरोना चीनमधून अमेरिकेत आला. आणि त्यानंतरच्या २ दिवसांतच ट्रम्प प्रशासनाने पब्लिक हेल्थ इमर्जन्सीची घोषणा केली. आणि चीनवरून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घालण्यात आली. अमेरिकन प्रशासनाने वेळीच लक्ष्य दिले असले तरीदेखील तेथील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत गेली. 

बरोबर एक महिन्यानंतर २६ फेब्रुवारीला कॅलिफोर्नियातील अशा एका व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली, ज्याने ना कोणता परदेश दौरा केला होता आणि ना कोणत्या कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आला होता. कोरोनाचा फैलाव सामुदायिक स्तरावरून होऊ लागल्यानंतर अशा प्रकारच्या केसेस समोर येतात. तेव्हा लोकांच्या आरोग्य तपासण्यांकडे दुर्लक्ष करणे, ही अमेरिकेची सर्वात पहिली आणि मोठी चूक ठरली. 

२९ फेब्रुवारीला अमेरिकी संस्था एफडीए संस्थेने सरकारी दवाखाने आणि इतर खासगी संस्थांना नागरिकांची तपासणी करण्याचे आदेश दिले. ५ मार्चला अमेरिकेतील प्रत्येक डॉक्टरला कोरोनाची तपासणी करण्याचे अधिकार बहाल करण्यात आले. सरकारने हे पाऊल उशिरा उचलल्याने कोरोना व्हायरसचा फैलाव होण्यास बराच कालावधी मिळाला. मार्चच्या मध्यापर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या वेगाने वाढण्यास सुरवात झाली. आणि मार्चच्या शेवटच्या आठवड्यात तर परिस्थिती हाताबाहेर गेली. २९ फेब्रुवारी ते ३१ मार्च या एक महिन्याच्या कालावधीत कोरोनाने पूर्ण अमेरिकेला आपल्या विळख्यात ओढले. 

तपासणी करण्यात उशीर झाल्याने अमेरिकेत कोरोना व्हायरस पसरला हे म्हणणं तसं चुकीचं ठरेल. कारण लॉकडाऊन करण्यात आल्यानंतरही मार्चच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत याठिकाणी कोणताच फरक दिसून आला नाही. ही अमेरिकेची दुसरी चूक ठरली. 

लोकांनी घरून काम करण्यास सुरवात केली होती, विद्यार्थ्यांनी आपली वह्या-पुस्तके बंद करून ठेवली होती, मात्र, लॉकडाऊन असतानाही त्यांनी सोशल डिस्टन्सिंगकडे दुर्लक्ष केले. कॉलेज बंद झाल्याने विद्यार्थ्यांनी बीचवर जात मजामस्ती करण्याकडे आपला मोर्चा वळविला. सरकारने लॉकडाऊन वाढण्याची शक्यता वर्तविल्यानंतर लोकांनी बाजारात खरेदीसाठी गर्दी केली. अनेकांनी तर स्व-संरक्षणासाठी बंदुकाही खरेदी केल्या. या सर्व प्रकारामुळे कोरोनाचा फैलाव होण्यास पोषक वातावरण मिळाले. 

अमेरिकेची तिसरी चूक होती ती म्हणजे औषधे आणि आरोग्य विषयक गोष्टींचा पुरवठा न करणे. कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय कर्मचारी आणि डॉक्टरांनाच अनेक गोष्टी मिळत नव्हत्या. दवाखाने आणि पुरवठादार यांच्यामध्ये वाद निर्माण झाल्याने कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी जसे की, मास्क, सॅनिटायझर यांच्या किंमती वाढू लागल्या. प्रति एक लाख लोकांमागे व्हेंटिलेटरची संख्या जगात सर्वात जास्त असणाऱ्या अमेरिकेत जर अशी परिस्थिती निर्माण होत असेल तर बाकी न बोललेल बरं. कोरोनाला आळा घालण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना या कागदोपत्री जास्त होत्या आणि प्रत्यक्षात कमी. 

परिस्थिती बिघडत असतानादेखील राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे ईस्टरच्या अगोदर कोरोना अमेरिकेतून हद्दपार करणारच, अशी आश्वासने देत होते. तर दुसरीकडे एकाच दिवशी एकाच देशातील १५०० हून अधिक नागरिक कोरोनामुळे मृत्युमुखी पडल्याचा विक्रम अमेरिकेच्या नावावर नोंदविला गेला. न्यूयॉर्क ते सॅन फ्रान्सिस्को आणि मायामी ते वॉशिंग्टन अशा अमेरिकेच्या सर्व ५० राज्यांत कोरोनाने आपले पाय रोवले आहेत. 

युरोपीय देश असलेल्या इटली, स्पेन आणि कोरोनाच्या उद्रेकाचे ठिकाण असलेल्या चीन या तिन्ही देशात कोरोनाची लागण झालेले जेवढे रुग्ण आहेत, तेवढे एकट्या अमेरिकेत आहेत. ज्या देशांनी कोरोनाबाबत कठोर पावले उचलली आहेत, त्यांचे कौतुक करावे तितके थोडे आहे. सोशल डिस्टन्सिंग आणि तत्काळ आरोग्य तपासणी हे कोरोनाचे शत्रू आहेत. त्यामुळे या दोन गोष्टींकडे जे देश दुर्लक्ष करतील त्यांचे हाल अमेरिकेहून भयानक होणार हे तितकेच खरे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

Mumbai Crime News: मानखुर्दमध्ये २७ वर्षीय तरुणीची हत्या; 'लव्ह जिहाद' म्हणत धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

SCROLL FOR NEXT