तुर्कस्तानचे चलन
तुर्कस्तानचे चलन esakal
ग्लोबल

'मी मुस्लिम आहे म्हणून..' या वक्तव्याने तुर्कस्तानचे चलनच कोसळले

सकाळ वृत्तसेवा

तुर्कीची आर्थिक स्थिती सतत खालावत चालली आहे. तुर्की चलन लिरानेही सोमवारी घसरण नोंदवली.

तुर्कीची (Turkey) आर्थिक स्थिती सतत खालावत चालली आहे. तुर्की चलन लिरानेही (Turkey Currency Lira) सोमवारी घसरण नोंदवली. खरं तर, तुर्कीचे अध्यक्ष रेचेप तैय्यप एर्दोआन (Recep Tayyip Erdogan)यांनी सोमवारी एका भाषणात सांगितले की, इस्लाममध्ये (Islam) कमी व्याज आकारण्यास सांगितले आहे किंवा व्याज घेऊच नका असेही सांगण्यात आले, त्यामुळे व्याजदर वाढवणार नाहीत. एर्दोआन यांच्या या विधानानंतर तुर्कस्तानचे राष्ट्रीय चलन लिरा डॉलरच्या तुलनेत सुमारे 5 टक्‍क्‍यांनी घसरले. (According to the statement of the President of Turkey, the currency fell by five percent)

आपल्या भाषणादरम्यान तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष एर्दोआन म्हणाले, लोकांची तक्रार आहे की आम्ही व्याजदरात कपात करत राहतो. याशिवाय माझ्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नका. मी मुस्लिम आहे, त्यामुळे मी इस्लामच्या शिकवणीनुसार काम करत राहीन.

तीन महिन्यांत लिरामध्ये मोठी घसरण

सलग पाच दिवसांपासून लिरामध्ये घसरण होत आहे. सोमवारी आशियाई व्यापारात (Asian Trade) लिरा 5 टक्‍क्‍यांनी घसरला आणि त्याचे मूल्य प्रतिडॉलर (Dollar) 17.624 वर पोहोचले. गेल्या तीन महिन्यांत लिराचे निम्मे मूल्य कमी झाले आहे. आश्‍चर्याची बाब म्हणजे, या तीन महिन्यांत जगातील कोणत्याही देशाच्या चलनात एवढी मोठी घसरण नोंदवण्यात आलेली नाही.

एर्दोआन यांनी यापूर्वीही इस्लामचा सहारा घेतला

तुर्कस्तानच्या ढासळत्या आर्थिक परिस्थितीमुळे एर्दोआन पहिल्यांदाच इस्लामकडे वळले असे नाही; इस्लाम मुस्लिमांना कर्जाच्या पैशावर व्याज घेण्यास मनाई करतो, असे एर्दोआन यांनी यापूर्वीही म्हटले आहे. यासोबतच ते म्हणाले की, तुर्कस्तानवर काही देशांनी लादलेल्या आर्थिक निर्बंधांमुळे लिराचे मूल्य घसरत आहे. तुर्की आपली आर्थिक धोरणे बदलणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे, एर्दोआन यांच्या धोरणांमुळे या वर्षात डॉलरच्या तुलनेत लिराचे मूल्य 57 टक्‍क्‍यांनी घसरले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्तव्यनिष्ठ CJI चंद्रचूड! ब्राझीलरुन परतताना विमानात तयार केला निर्णयाचा मसुदा, असा केला इंटरनेटचा जुगाड

Uddhav Thackeray : महाराष्ट्र तुम्हाला मातीत गाडेल;उद्धव ठाकरे यांचा मोदी-शहा यांना ‘इंडिया’च्या सभेत इशारा

One Chip Challenge: अति मसालेदार चिप्स खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका; तरुणाने गमावला जीव

Hardik Pandya Banned : T20 वर्ल्ड कपपूर्वी BCCIने हार्दिक पांड्यावर घातली बंदी! 'या' चुकीची मोजावी लागली किंमत

Loksabha News: मोदींनी घेतली नाही ठाकरेंच्या मागण्यांची दखल, नागरिकांमध्ये रंगल्या चर्चा

SCROLL FOR NEXT