donald_20trump_20main_ 
ग्लोबल

ट्रम्प समर्थकांनाही ट्विटरचा दणका; 70 हजार अकाऊंट्स पाडले बंद

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- सोशल मीडिया कंपनी ट्विटरने Twitter सोमवारी मोठी घोषणा केली आहे. ट्रम्प समर्थक QAnon conspiracy शी जोडलेले 70  हजारपेक्षा अधिक ट्विटर हॅँडल्स निलंबित केले आहेत. मागील आठवड्यात ट्रम्प समर्थकांनी कॅपिटॉल इमारतीवर हल्ला करत हिंसा घडवून आणली होती. या पार्श्वभूमीवर ट्विटरने हे पाऊल उचललं आहे. 

ट्विटरने कॅपिटॉल बिल्डिंगमध्ये हिंसा झाल्यानंतर अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट अनिश्चितकाळासाठी बॅन केले आहे. ट्रम्प यांच्या अकाऊंटला चिथावणीखोर ट्विट आणि हिंसा पसरवण्याच्या भीतीने सस्पेंट करण्यात आलं आहे, असं मायक्रोब्लॉगिंग प्लेटफॉर्मने म्हटलं आहे. 

सरकारला कोविशिल्ड 200 रुपयात तर प्रायव्हेटमध्ये कितीला? अदर पूनावालांनी दिली...

ट्विटरने एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटलं आहे की, शुक्रवारी आम्ही 70 हजारांपेक्षा अधिक अकाऊंटस सस्पेंड केले आहेत. यामध्ये असेही प्रकरणे होते की, एकच व्यक्ती अनेक अकाऊंट वापरत होता. हे अकाऊंट हिंसेसंबंधात ट्विट करत होते. त्यामुळे त्यांचे ट्विटवर अकाऊंट्स सस्पेंड करण्यात आले आहेत. 

20 जानेवारीला अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ज्यो बायडेन यांचा शपथविधी होणार आहे. या पार्श्वभूमीवर ट्विटरसह अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्म खबरदारी घेताना दिसत आहेत. फेसबुक आणि इन्स्ट्राग्रामने डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाऊंट निलंबित केले आहे. ट्रम्प यांना समर्थन देणाऱ्या उजव्या संघटनांविरोधातही सोशल मीडिया कंपन्या कठोर पाऊल उचलताना दिसत आहे. 

स्वामी विवेकानंदाच्या प्रश्नांनी गोरक्षकाची बोलती झाली होती बंद!

अमेरिकेत गेल्या बुधवारी इलेक्टोरल मतांच्या मोजणीवेळी हिंसाचार झाला होता. यामुळे ट्रम्प यांच्या अडचणी वाढल्यात. मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट ट्विटरने त्यांचे खाते सस्पेंड केले. ट्रम्प यांनी त्यांची बाजू मांडण्यासाठी सातत्यानं ट्विटरचा वापर केला. त्यांच्या चिथावणीखोर आणि खोट्या वक्तव्यांमुळे ट्विटरने त्यांचं खातं सस्पेंड केलं. हा निर्णय घेण्यात भारतीय वंशाची विजया गड्डे यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. 

विजया यांनीच ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट कायमस्वरुपी सस्पेंड करण्यात आल्याचं सांगितलं होतं. ट्विटरने शुक्रवारी पहिल्यांदा ट्रम्प यांचे ट्विटर हँडल सस्पेंड केलं होतं. कंपनीचं म्हणणं आहे की, ट्रम्प यांनी त्यांच्या ट्विटच्या माध्यमातून अमेरिकेच्या संसदेत आंदोलकांना भडकावलं होतं.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT