after ockdown lifted in china coronavirus cases rising again in 3 days 
ग्लोबल

चीनने लॉकडाऊन हटवला; पण रुग्ण लागले वाढू...

वृत्तसंस्था

वुहान (चीन): चीनमधून कोरोना व्हायरसची सुरवात झाल्यानंतर जगभरात हाहाकार उडाला. चीनने कोरोनाचे रुग्ण संपुष्टात आल्यामुळे लॉकडाऊन हटवला. पण, त्यांच्यासमोरील समस्या दिवसेंदिवस पुन्हा वाढू लागल्या असून, कोरोना पुन्हा पाय पसरू लागला आहे.

द गार्डियनने दिलेल्या वृत्तानुसार, चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे नवीन रुग्ण आढळू लागले आहेत. चीनमध्ये शुक्रवारी (ता. 10) 46, शनिवारी 99 आणि रविवारी 108 नवीन रुग्ण आढळून आल्याचे राष्ट्रीय आयोगाने सांगितले. चीनमध्ये तीन दिवसांत 253 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यातील 10 रुग्ण हे परदेशातून पुन्हा मायदेशी परतलेले आहे.  7 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे हेलोंगजियांगमधून आलेले आहेत. याआधी चीन-रशिया सीमा बंद करण्यात आली होती. मात्र, लॉकडाऊन हटवल्यानंतर तेथे अडकलेल्या लोकांना पुन्हा मायदेशी आणण्यात आले. चीनच्या शांघाय येथे रशियातून आलेल्या विमानातील 51 चिनी नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळले. 21 कोरोना रुग्ण हे हेलोंगजियांग प्रांतातील आहेत.

चीनने लॉकडाऊन हटवल्यानंतर लोकांचे जीवन पुन्हा रुळावर येत आहे. तर दुसरीकडे कोरोना पुन्हा पाय पसरू लागला आहे. दरम्यान, वुहानमधील अधिकाऱ्यांनी यापूर्वीच निर्बंध रद्द केले आहेत, परंतु हार्बिन तसेच सीमा शहर सुफिनामध्ये वुहानप्रमाणे लॉकडाऊन केले गेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, Video: वैभव सूर्यवंशीची दोन सिक्ससह दणक्यात सुरुवात, पण मग कशी पडली विकेट? माघारी जाताना झाला भावूक

तुम्हीच सांगा उपवास कसा करायचा? सणासुदीच्या काळात भगरीच्या किंमतीत दुप्पटीने वाढ, साबुदाणाही महागला, पण किती?

Nagpur RTO Crackdown: नागपूरमध्ये HSRP नसलेल्या वाहनांवर RTOची धडक कारवाई; तीन दिवसांत १७२ वाहनांवर ई-चलान, १.७२ लाखांचा दंड

Melghat Teachers Scam: मेळघाटातील कंत्राटी शिक्षक भरतीत मोठा घोळ? आरटीई व संचमान्यतेला हरताळ, प्रहार संघटनेचा पारदर्शक प्रक्रियेचा आग्रह

Nagpur Education : मनपाच्या नव्या इंग्रजी शाळा अजूनही कागदावरच; आठवडा उलटला तरी प्रवेशप्रक्रिया ठप्प, पालक संभ्रमात

SCROLL FOR NEXT