Iran-Israel war Esakal
ग्लोबल

Iran-Israel war: आक्रमक इस्राइलने संयम बाळगावा; जागतिक नेत्यांचा सल्ला; प्रतिहल्ला करण्यास विरोध

Iran-Israel war: . इस्राइलने अशा प्रकारचा हल्ला केल्यास त्याचे समर्थन करणार नाही, असे ब्रिटन आणि फ्रान्स यांनी जाहीर केले आहे. भारतानेही इस्राइलला संघर्ष न वाढविण्याचा सल्ला दिला आहे.

सकाळ वृत्तसेवा

जेरुसलेम: ‘‘इराणने जरी शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या साह्याने हल्ला केला असला तरी इस्राइलने प्रतिहल्ला करू नये, अन्यथा युद्ध भडकेल,’’ असे आवाहन जागतिक नेत्यांनी आज इस्राइलला केले आहे. ‘जी-७’ देशांनीही इराणने केलेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करताना इस्राईलला सबुरीचा सल्ला दिला आहे.

इस्राइलने दोन आठवड्यांपूर्वी सीरियातील दूतावासावर केलेल्या हल्ल्यात इराणच्या लष्कराच्या दोन अत्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सात जणांचा मृत्यू झाला होता. त्याचा सूड म्हणून इराणने शनिवारी रात्री इस्राइलवर सुमारे तीनशे ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मारा केला होता. इराणने इस्राइलवर केलेला हा पहिलाच थेट हल्ला होता. इस्राइलच्या हवाई सुरक्षा यंत्रणेमुळे ९९ टक्के क्षेपणास्त्र आणि ड्रोन हवेतच नष्ट झाले होते. मात्र, या हल्ल्यानंतर पश्‍चिम आशियामध्ये नव्या युद्धाचे ढग जमा झाले आहेत. योग्य वेळ येताच प्रत्युत्तर देऊ, असा इशारा इस्राइलने दिला आहे.

या पार्श्वभूमीवर विविध देशांच्या प्रमुखांनी इस्राइलला प्रतिहल्ला न करण्याचा सल्ला दिला आहे. इस्राइलने अशा प्रकारचा हल्ला केल्यास त्याचे समर्थन करणार नाही, असे ब्रिटन आणि फ्रान्स यांनी जाहीर केले आहे. भारतानेही इस्राइलला संघर्ष न वाढविण्याचा सल्ला दिला आहे.

संयुक्त राष्ट्रांची बैठक निर्णयाविना

इराणच्या हल्ल्यानंतर परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची रविवारी तातडीची बैठक बोलाविण्यात आली होती. संघर्ष टाळणे आणि तणाव कमी करणे, ही प्राथमिकता असल्याचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी यावेळी सांगितले. इराणने केलेल्या हल्ल्यानंतर सुरक्षा परिषदेकडूनच कारवाई होणे आवश्‍यक आहे, अशी भूमिका अमेरिकेने मांडली.

अमेरिकेकडून राजनैतिक हालचालींना वेग

अध्यक्ष ज्यो बायडेन यांची जी-७ गटाबरोबर, तसेच जॉर्डनचे राजे अब्दुल्ला व इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याबरोबर दूरध्वनीवरून चर्चा.

मध्यस्थीसाठी प्रयत्न.

परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांची जॉर्डन, सौदी अरेबिया, तुर्किये आणि इजिप्तबरोबर दूरध्वनीवरून चर्चा संरक्षण मंत्री ऑस्टिन लॉईड यांची सौदी अरेबिया आणि इस्राईलबरोबर दूरध्वनीवरून चर्चा

गाझामधील हानी

इराणच्या हल्ल्यानंतरही इस्राईलने गाझामधील कारवाई थांबविली नसून मागील २४ तासांमध्ये हल्ल्यात ६४ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंतच्या हानीचा आढावा

पॅलेस्टिनींचा मृत्यू : ३३,७९७

इस्रायलींचा मृत्यू : १२००

जखमी : ७६,४५६

कोण काय म्हणाले?

जिलाड एर्डन, राजदूत, इस्राइल: मार बसल्यावर रडत बसायला इस्राइल म्हणजे लहान बाळ नाही.

सईद इरावनी, राजदूत, इराण : स्वसंरक्षणासाठीच आम्ही ही कृती केली. ती करणे अत्यंत आवश्‍यक आणि योग्य होते.

डेव्हिड कॅमेरॉन, परराष्ट्र मंत्री, ब्रिटन : ही वेळ हल्ला करण्याची नाही, तर कणखर आणि स्मार्ट बनण्याची तसेच डोक्याचा आणि हृदयाचाही वापर करण्याची आहे.

इमॅन्यूएल मॅक्रॉन, अध्यक्ष, फ्रान्स : संघर्ष वाढू नये यासाठी आम्ही हरप्रकारे प्रयत्न करू. इस्राईलनेही प्रतिहल्ल्याचा विचार सोडून द्यावा.

ॲनालिना बारबॉक, परराष्ट्र मंत्री, जर्मनी : हल्ल्यानंतर इराण एकटा पडला आहे. त्यामुळे या देशाने आता संघर्ष वाढवू नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

Video : दगडाच्या काळजाची आई! पोटच्या नकोशा मुलीला रस्त्यावर टाकून गेली पळून; कुत्र्याने बाळाच्या...धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Bharatmala Scheme : भारतमाला योजनेला धक्का: सुरत-चेन्नई महामार्ग रद्द होण्याची शक्यता; नाशिकचे हजारो कोटींचे प्रकल्प अधांतरी

Latest Maharashtra News Updates : रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये गणेश मूर्ती घडवण्याचं काम जोमात

SCROLL FOR NEXT