मिनीयापोलिस - जॉर्ज फ्लॉईड मृत्यूप्रकरणी निदर्शकांनी पेटवलेल्या मोटारीपाशी फलक झळकावणारी तरुणी.
मिनीयापोलिस - जॉर्ज फ्लॉईड मृत्यूप्रकरणी निदर्शकांनी पेटवलेल्या मोटारीपाशी फलक झळकावणारी तरुणी. 
ग्लोबल

अमेरिकेत अनेक प्रातांत गोळीबार, जाळपोळ; काय घडले वाचा

वृत्तसंस्था

मिनियापोलिस - कोरोनाच्या संसर्गाशी झुंज देणाऱ्या अमेरिकेत आता आंदोलनाचा भडका उडाला असून जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलिसांच्या कोठडीत मृत्यू झाल्याने देशभर जनक्षोभाची मोठी लाट निर्माण झाली आहे. अमेरिकेतील विविध राज्यांत आज लोकांनी उत्स्फुर्तपणे रस्त्यांवर उतरून आंदोलन केले. मिनियापोलिस शहरामध्येही आंदोलकांनी आज संचारबंदी धुडकावून लावत सरकार आणि यंत्रणेविरोधात निदर्शने केली. या आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लष्करी पोलीस तुकड्यांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

अन्य शहरांमध्ये देखील हे आंदोलनाचे लोण पसरल्याने यंत्रणा सावध झाली आहे. दरम्यान, फ्लॉइड यांची मान दोन्ही गुडघ्यांच्या खाली दाबून धरणाऱ्या श्वेतवर्णीय डेरेक शोविन या पोलिस अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा ठपका ठेवण्यात आला आहे. 

आज आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. सुदैवाने यामध्ये कुणीही जखमी झाले नाही. शहराच्या दक्षिण भागात आज आंदोलकांनी जाळपोळ केली,  येथील एका जपानी रेस्टॉरंटलाची काही आंदोलकांनी आग लावली. मागील तीन ते चार दिवसांपासून या भागांत जाळपोळ सुरू आहे.

निदर्शने तीव्र  
अमेरिकेत आज आफ्रिकी अमेरिकी समुदायाने रस्त्यांवर उतरून विविध भागांत मोठे आंदोलन केले. काही आंदोलकांनी  अटलांटामधील एक वृत्तवाहिनीच्या कार्यालयाची तोडफोड केली. पोलिसांच्या वाहनांचीही  जाळपोळ करण्यात आली. न्यूयॉर्क, ह्युस्टन आणि वॉशिंग्टनसह डझनभर शहरांत या आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटले.

अन्य अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
जॉर्ज यांना गुडघ्याखाली दाबून धरणारे पोलिस अधिकारी  डेरेक शोविन यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्यानंतर जॉर्ज  यांच्या कुटुंबीयांनी या कारवाईचे स्वागत केले आहे.  डेरेक यांच्याबरोबर या मारहाणीत सहभागी असणाऱ्या अन्य चार पोलीस अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात यावी अशी  मागणी त्यांनी केली आहे. ओकलंडमध्ये दोन फेडरल प्रोटेक्टिव्ह सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले. शक्रवारी रात्री आंदोलनादरम्यान ही घटना घडली.

आंदोलनाचा भडका 

  • लिंकन, नेब्रास्कात आंदोलकांची धरपकड
  • फिनिक्समध्ये सार्वजनिक मालमत्तेची नासधूस
  • ह्यूस्टनमध्ये २०० आंदोलकांना पकडले 
  • मिनियापोलिसमध्ये मोठा बंदोबस्त तैनात 
  • पोर्टलॅंडमध्ये आंदोलकांच्या विरोधात बळाचा वापर 
  • डेट्रॉईटमध्ये गोळीबारात एका आंदोलकाचा मृत्यू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT