Ayman al-Zawahiri esakal
ग्लोबल

Al Qaeda : अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मारलेला 'अल कायदा'चा म्होरक्या अजूनही जिवंत! नव्या व्हिडिओनं जगात खळबळ

2011 मध्ये ओसामा बिन लादेन मारला गेल्यानंतर दहशतवादी गटासाठी हा सर्वात मोठा धक्का होता.

सकाळ डिजिटल टीम

2011 मध्ये ओसामा बिन लादेन मारला गेल्यानंतर दहशतवादी गटासाठी हा सर्वात मोठा धक्का होता.

जिहादी संघटनांच्या (Jihadi Organization) हालचालींवर नजर ठेवणाऱ्या अमेरिकास्थित गैर-सरकारी संस्थेनं एक मोठा खुलासा केलाय. SITE इंटेलिजन्स ग्रुपनं दावा केलाय की, 'अल कायदानं 35 मिनिटांचं व्हिडिओ रेकॉर्डिंग जारी केलंय. यामध्ये त्यांचा नेता अयमान अल-जवाहिरीचा (Ayman al-Zawahiri) आवाज ऐकू येत आहे.'

जवाहिरी हा यावर्षी ऑगस्टमध्ये अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये (Afghanistan Kabul) अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मारला गेला होता. आता हा व्हिडिओ समोर आल्यानंतर जवाहिरीच्या मृत्यूवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

SITE इंटेलिजन्स ग्रुपनं (SITE Intelligence Group) म्हटलंय की, रेकॉर्डिंग कधी केलं गेलं याची माहिती मिळाली नाही. तसंच, अल जवाहिरीनं हा व्हिडिओ कधी रेकॉर्ड केला, हे त्यातील सामग्रीवरून स्पष्ट झालेलं नाही. अफगाणिस्तानमध्ये अमेरिकन हल्ल्यात जवाहिरी मारला गेला. 2011 मध्ये त्याचा संस्थापक ओसामा बिन लादेन (Osama Bin Laden) मारला गेल्यानंतर दहशतवादी गटासाठी हा सर्वात मोठा धक्का होता.

Ayman al-Zawahiri

अमेरिकी प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, जवाहिरी अनेक वर्षांपासून लपून बसला होता. अल-जवाहिरीच्या मृत्यूनंतर अल-कायदानं उत्तराधिकारी नाव दिलेलं नाही, परंतु माजी इजिप्शियन स्पेशल फोर्स ऑफिसर सैफ अल-अदेल अल-कायदाचा उत्तराधिकारी मानला जात आहे. काबुलमध्ये मारला गेलेला अल कायदाचा म्होरक्या अयमान अल-जवाहिरी याला हक्कानी तालिबान नेटवर्कनं काबूलमध्ये आश्रय दिला होता, असं अमेरिकेनं म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT