amazon plastic bucket sakal
ग्लोबल

Amazon विकतंय २६ हजारांची प्लॅस्टिकची बादली, युजर्स म्हणतायेत...

ई-कॉमर्स कंपनी अमेझॉनवर एका प्लॅस्टिक बादलीची किंमत साधीसुधी नाही तर...

सकाळ ऑनलाईन टीम

ऑनलाईन शॉपिंगचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढत चाललाय. कारण एखाद्या गोष्टीसाठी चार दूकान फिरण्यापेक्षा कुठल्याही जागी बसून कुठल्याही वेळी जास्त व्हरायटी बघणं जास्त सोयीस्कर पडतं. हो, पण इथे बारगनिंगचा विषय नसतो. त्यामूळे वेळ जरी वाचत असला तरी पैसे मात्र तितकेच द्यावे लागतात. याचाच फायदा या ई -कॉमर्स कंपन्या घेतात. म्हणजे एखाद्या साध्या वस्तूला लग्झरीअस कसं बनवायचं हे ई-कॉमर्स कंपन्यांकडून शिकावं. पण कंपनींच्या या एका गोष्टीमुळे त्यांना बऱ्याचदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.

आत्तासुद्धा असाचं काहीसा प्रकार पाहायला मिळाला. जेव्हा ई-कॉमर्स कंपनी अमेझॉनवर एका प्लॅस्टिक बादलीची किंमत साधीसुधी नाही तर तब्बल २५ हजार ९९९ रुपये दाखवण्यात आली. विवेक राजू नावाच्या एका ट्विटर युजर्सने या प्लॅस्टिक बादलीचा किमतीसह स्क्रिनशॉट ट्विटरवर अपलोड केलाय. महत्वाची गोष्ट म्हणजे २६ हजार रुपये ही डिस्काउंट प्राईज आहे, या प्लॅस्टिक बदलीची खरी किंमत सुमारे ३५ हजार असल्याचं दिसतंय.

इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे या प्लॅस्टिक बादलीवर ईएमआयचा ऑप्शनसुद्धा देण्यात आलाय. १,२२४ रुपयांच्या ईएमआयवर ही प्लॅस्टिकची बादली खरेदी केली जाऊ शकते.

सध्या सोशल मीडियावर विवेक राजुने शेअर केलेला हा स्क्रिनशॉट मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. ट्विटर युजर्स या स्क्रिनशॉटवर कमेंट आणि मिम्स तयार करून या प्लॅस्टिक बादलीच्या किमतीमुळे ई-कॉमर्स कंपनी अमेझॉनला ट्रोल करत आहेत. एवढ्या महागड्या बदलीसोबत मग तरी फ्री द्यायचा असं युजर्स म्हणत आहेत. त्यात या प्लॅस्टिक बादलीवर खरेदीचे रिव्ह्यूव सुद्धा पाहायला मिळत आहेत. ज्यामुळे अर्थातच नेटिझन्सला ट्रोलिंगसाठी आयत घबाड सापडलंय.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच लक्झरी ब्रँड गुच्ची आणि स्पोर्ट्सवेअर फर्म अडिदासला सुद्धा अश्याच ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. कंपन्यांनी एक छत्री चीनच्या मार्केटमध्ये आणली होती, ज्याची किंमत तब्बल ११,००० युआन म्हणजे १ लाख २७ रुपये एवढी होती. महत्वाचं म्हणजे ही छत्री पावसापासून वाचवणारी नव्हती. त्यामुळे चीनच्या सोशल मीडियावर या लाखोंच्या छत्रीमुळे गुच्ची आणि आदिदासला ट्रोलिंगचा फटका बसला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajendra Singh: ध्येयवेड्यांनीच क्रांती केल्याचा इतिहास: जलपुरुष राजेंद्र सिंह; बंदुकीच्या जागी हातात कुदळ, फावडी

Latest Marathi News Live Update : पुण्यातील गुंड घायवळ चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्याने विदेशात पळून गेला,अनिल देशमुखांचा गंभीर आरोप

कतरिना कैफच्या प्रेग्नेंसीमध्ये घरात चिंतेचं वातावरण, दिराने सांगितलं कुटुबात नक्की चाललंय काय?

Mumbai News: एशियाटिक टाऊन हॉलची दुरवस्था! इतिहास जपायचा की निवडणुका जिंकायच्या? दुहेरी आव्हान उभं

Beed News: गरोदर महिलेच्या जिवाशी खेळ कशासाठी? लेबर रूमसमोरच महिलेची प्रसूती, बीड जिल्हा रुग्णालयातील प्रकार

SCROLL FOR NEXT