samuel little 
ग्लोबल

सिरियल किलरचा तुरुंगात तडफडून मृत्यू; 93 महिलांचा केला होता खून

सकाळ डिजिटल टीम

वॉशिंगटन - अमेरिकेतील सिरियल किलर सॅम्युअल लिटिल याचा तुरुंगात तडफडून मृत्यू झाला. सॅम्युअलने तब्बल 93 महिलांचा खून केल्याचं न्यायालयात मान्य केलं होतं. अत्यंत निर्दयीपणे हे कृत्य केल्याचंही त्याने तेव्हा म्हटलं होतं. सॅम्युअलने इतक्या लोकांची हत्या केली होती की स्केचच्या मदतीने पीडितांची ओळख पटवण्याचं काम बराच काळ सुरु होते.  अधिकाऱ्यांनी सांगितलं की, त्याला मधुमेहासह हृदयविकाराचा आणि इतर काही त्रास होते. 

सॅम्युअल खून प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर 2014 पासून तुरुंगात होता. आजारी पडल्यानंतर त्याला कॅलिफोर्नियातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. इतक्या वर्षात अनेकदा त्याला तुरुंगात डांबलं होतं मात्र तो बाहेरही आला होता. प्रत्येकवेळी चौकशीत तो खून केल्याचं नाकारत होता. मात्र शेवटी पोलिसांसमोर शरणागती पत्करत त्याने गुन्हा कबूल केला. अधिकाऱ्यांच्या मते जवळपास 700 तास त्याची चौकशी केल्यानंतर अनेक खूनांबद्दल माहिती दिली होती. खूनांबद्दल केवळ आणि केवळं सॅम्युअललाच माहिती होती. 

सॅम्युअल जितका क्रूर होता त्याशिवाय त्याची दुसरीही एक बाजू होती. ती म्हणजे तो एक कलाकार होता आणि ज्यांचा त्याने खून केला त्यांचे स्केच तयार केले आणि नावेही पोलिसांना सांगितली. त्यामुळे पीडितांची ओळख पटवणं शक्य झालं. त्यानं हेसुद्धा सांगितलं की कोणत्या वर्षी आणि कुठं खून केले. मृतदेहांना कुठे फेकलं याचीही माहिती त्याने दिली. मृत्यूआधी त्याने 1970 ते 2005 दरम्यान 93 लोकांचा खून केल्याचं मान्य केलं होतं. यातील सर्वाधिक खून फ्लोरिडा आणि दक्षिण कॅलिफोर्नियातील होते. 

या प्रकरणाचा तपास करत असलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, त्यांना 60 खून सॅम्युअलनेच केल्याचं सिद्ध झालं आहे. इतर खूनांबाबतही शंका नाही. सॅम्युअलने सांगितलेली माहिती चुकीची निघालेली नाही. त्याच्या क्रूर कृत्यासमोर अमेरिकेतील इतर खूनी खूपच लहान ठरतात. सॅम्युअलने ज्या लोकांचा खून केला त्यामध्ये सर्व महिलाच होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Businessman Cheating Wife : गर्लफ्रेंडसोबत मलेशियाला जाण्याचा प्लॅन; पत्नीला सांगितले बिझनेस ट्रिप, विमानतळावरच बिंग फुटले, पुण्यातील उद्योगपतीचा कारनामा

Asian Games: भारताच्या लेकींचा धुमाकूळ! एलावेनिलचे दुहेरी यश, तर सचिकाचे MMA मध्ये पदक पक्के अन् क्रिकेटमध्येही वाजवला डंका

सोन्याच्या हव्यासापोटी सात मित्र पोहोचले शापित हवेलीत; ‘भूतम् भयम्’चा थरार कुठे आणि कधी पहायला मिळणार?

Budh Guru Yog Horoscope 2026 : बुध-गुरुची ही 'शुभ युती' बदलणार भाग्य! 'या' 4 राशींसाठी ठरू शकतो लाभदायी; आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता

Marathi News Live Updates : कुलाब्यातील गणेशोत्सव मंडळाच्या तक्रारीवरून संजय राऊत आक्रमक; थेट मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिलं पत्र

SCROLL FOR NEXT