Joe Biden Twitter
ग्लोबल

कोरोनाने जागतिक महासत्ता अमेरिकेला थकवले, लोकांचे ही मनोबल खचले

कोरोना महामारीने जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेला थकवले आहे.

सकाळ डिजिटल टीम

वाॅशिंग्टन : कोरोना महामारीने जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेला थकवले आहे. हे सांगितले आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी. ते म्हणतात, अमेरिकन लोक आता याने (कोरोना) थकले आहेत आणि त्यांचे मनोबलही खूप कमी झाले आहे. मात्र त्यांनी दावा केला आहे, की त्यांचे सरकार या महामारीशी दोन हात करण्यासाठी चांगल्या प्रकारे तयारी केली आहे. बायडेन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपदाचे सूत्र स्वीकारुन एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त बुधवारी (ता.१९) एका पत्रकार परिषदेला संबोधित करित होते. या प्रसंगी ते म्हणाले, की अमेरिकन काँग्रेसमध्ये (American Congress) (संसद) विरोध शमवणे, महागाई दर तथा महामारीला तोंड देण्यासाठी त्यांना आपल्या आर्थिक पॅकेजच्या मोठ्या हिश्श्याबरोबर तडजोड करावी लागू शकतो. (american people tired due to corona, said us president joe biden)

बायडेन यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या अजेंड्यातील महत्त्वाच्या योजना २०२२ च्या मध्यावधी निवडणुकीपूर्वी पूर्ण होतील. जर मतदारांना सर्व माहिती दिली गेल्यास ते डेमोक्रेटचे समर्थन करतील. राष्ट्राध्यक्षांनी कोरोना विषाणूशी (Corona Virus) लढ्यात सुरुवातीला प्रगती, महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधांसाठी जलदगतीने काम केले गेले असा उल्लेख त्यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला सांगितले.

बायडेन यांच्या योजनांना सिनेटचा झटका

बायडेनच्या आर्थिक, मतदानाचा अधिकार, पोलिस सेवेत सुधारणा यासह इतर सुधारणांना सिनेटने झटका दिला आहे. येथे डेमोक्रेटिक पक्षाला बहुमत नाही. दुसरीकडे महागाई देशासाठी एक आर्थिक धोका आणि बायडेन यांच्या समोर राजकीय संकट म्हणून उभे राहिले आहे. या सर्व अडथळ्यांव्यतिरिक्त बायडेन यांनी दावा केले की अशा स्थितीत ही कोरोनाविरोधात लढाई सुरु आहे. येथे उत्कृष्ट कामगिरीचे दर्शन घडविले आहे. याचा कोणी विचार ही केला नव्हता. बायडेन म्हणाले, जागतिक महामारीमुळे जवळपास दोन वर्षांचे शारीरिक, भावनात्मक आणि मानसिक परिणामानंतर आमच्या अनेक लोकांना खूप सार सहन केले आहे.

राष्ट्राध्यक्ष म्हणाले, काही लोक सद्यःस्थितीला नवीन सामान्य जीवन सांगू शकतात. मी म्हणेल की काम आताही पूर्ण झालेले नाही. परिस्थिती आणखीन सुधारेल. बायडेन यांनी पत्रकार परिषदेत महागाई, युक्रेनवरुन रशियाचे डावपेच, इराणबरोबर अणुवस्त्र संवाद, मतदान अधिकार, राजकीय विभाजन, २०२४ निवडणुकीत उपराष्ट्रपती कमला हॅरिसचे स्थान, चीनबरोबर व्यापार आणि सरकारची क्षमता यासह अनेक प्रश्नांचे उत्तर दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT