americs columbus statue
americs columbus statue 
ग्लोबल

कोलंबसचा पुतळा जमीनदोस्त, बॉस्टनला डोके उडवले तर रिचमंडला जलसमाधी 

सकाळ वृत्तसेवा

बॉस्टन, ता. 10 ः कृष्णवर्णीय प्रौढ जॉर्ज फ्लॉईडचा पोलिसांच्या अमानुष बळामुळे मृत्यू झाल्यानंतर उसळलेल्या आंदोलनात आणखी एका दिग्गजाचा पुतळा जमीनदोस्त झाला. "अमेरिकेचा शोध लावणारा खलाशी' अशा शिर्षकाखाली जगभरातील इतिहासाच्या बहुतांश पुस्तकांत ज्याच्यावर धडा आहे अशा ख्रिस्तोफर कोलंबसच्या दोन शहरांतील पुतळ्यांवर आंदोलकांनी रोष प्रदर्शित केला. फ्लॉईडचा दफनविधी होण्याच्या वेळीच हे घडले. 

बॉस्टनमधील नॉर्थ एन्ड उपनगरातील ख्रिस्तोफर कोलंबस पार्कमधील पुतळ्याचा डोक्‍याचा भाग उडविण्यात आला, तर व्हर्जिनियामधील रिचमंड येथील कोलंबसला पुतळा उखडून टाकत सरोवरात फेकून देण्यात आला.  बॉस्टनमध्ये आंदोलकांनी डोक्‍याचा भाग उडवून पुतळ्याच्या चौथऱ्यापाशी ठेवला. पोलिस तसेच उद्यानांचे आयुक्त अधिक चौकशी करीत आहेत. 

कोलंबसच्या पुतळ्याबाबतीत असा प्रकार घडण्याची ही अलीकडच्या काळातील तिसरी वेळ आहे. 2015 मध्ये पुतळ्याला लाल रंग फासून खालील भागात "ब्लॅक लाईव्हज मॅटर' असे "स्प्रे'ने रंगविण्यात आले. 2006 मध्ये पुतळ्याचा डोक्‍याचा भाग कुणीतरी काढून नेले होता, जो सहा दिवसांनी मिळाला. त्या वेळी त्या भागाची मोडतोड झाली होती. 

आंदोलकांनी मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास तीन दोरखंड लावून पुतळा खाली ओढला. मन्रो पार्कमध्ये शनिवारी जनरल विल्यम्स कार्टर विकहॅम यांचा पुतळा याच पद्धतीने पाडण्यात आला होता. काही जणांनी दिलेल्या माहितीनुसार कोलंबसचा पुतळा फाउंटन लेकमध्ये टाकण्यापूर्वी त्यावर अमेरिकेचा ध्वज ठेवून तो जाळण्यात आला. एका स्थानिक प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधीनुसार हे कृत्य पूर्वनियोजित नव्हे, तर उत्स्फूर्त होते. सायंकाळी आंदोलक पुतळा पाडण्यासाठी जोरदार घोषणा देत होते. नंतर याचे कृतीत रूपांतर झाले. 

"रिचमंड टाईम्स-डिस्पॅच'च्या वृत्तानुसार या पार्कमध्ये आधी काही सामाजिक विचारवंतांनी भाषणे केली. यात चेल्सी हिग्ज-वाइज या म्हणाल्या की, अमेरिकेतील आदिम जमाती तसेच आफ्रिकन-अमेरिकन जनतेला अनन्वित अत्याचार सहन करावे लागले आहेत. हे ज्यामुळे घडले तिथपासून आपल्याला मोहीम सुरू करावी लागेल. या भूमीवर ज्यांनी पहिले पाऊल टाकले त्यांच्यापासून आपण सुरू करूयात. 

आदिम लोकांच्या समर्थकांनी दीर्घकाळापासून कोलंबसला विरोध दर्शविला आहे. "कोलंबस दिन' हे नाव बदलून त्याऐवजी "आदिम जन दिन' साजरा करावा अशी त्यांची मागणी होती. "रिचमंड इंडिजीनस सोसायटी'च्या सदस्या वॅनेसा बॉलीन म्हणाल्या की, "निदर्शनांचा फायदा उठवित स्वतःचे महत्त्व वाढविण्याच्या उद्देशाने मी येथे आलेले नाही, तर तुम्हाला पाठिंबा देण्याचा माझा उद्देश आहे.' जोसेफ रॉजर्स या वक्‍त्याने सांगितले की, "गोऱ्यांच्या श्रेष्ठत्ववादामुळे तसेच संघटित वर्णभेदामुळे आदिम तसेच कृष्णवर्णीय अशा दोन्ही समुदायांवर अन्याय झाला आहे. 
अमेरिका अमेरिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT