Angola Queen Nzingha who killed mens after physical Relation
Angola Queen Nzingha who killed mens after physical Relation Esakal
ग्लोबल

पुरुषांशी संबंध ठेवल्यानंतर ठार मारायची राणी! वाचून अंगावर येईल काटा

सकाळ डिजिटल टीम

जगाच्या इतिहासात अशी अनेक व्यक्तिमत्त्व होऊन गेली, जी चांगल्या वाईट कामांसाठी ओळखली जातात. सतराव्या शतकात आफ्रिकेमध्ये (Seventeen Century in Africa) एक अशी राणी (Queen) होऊन गेली की तिचं नाव ऐकलं तरी पुरुषांच्या अंगावर काटा उभा राहतो. कारण ही राणी अनेक पुरुषांशी संबंध ठेवायची आणि त्यानंतर त्यांना ठार मारायची. या राणीची कहाणी आपण जाणून घेणार आहोत.

सतराव्या शतकातील ही गोष्ट! एनजिंगा एमबांदी ही 'अंगोला' या आफ्रिकन देशाची राणी होती. या राणीबद्दल बऱ्याच रंजक कथा प्रचलित आहेत. काही इतिहासकार तिला अतिशय शूर तर काहीजण अतिशय क्रूर असं वर्णन करतात. अंगोलावर आक्रमण करणाऱ्या युरोपीय वसाहतवाल्यांशी तिने तीव्र लढा दिला होता. सुरुवातीला युरोपीय लोकांशी चांगले संबंध प्रस्थापित करून त्यांच्या व्यवस्थेचा नीट अभ्यास करून नंतर त्यांच्याच नाकीनऊ आणणारी अशी एनजिंगाची (Nzingha) ख्याती आहे. एनजिंगाच्या बाबतीत सर्वात चर्चित बाब म्हणजे ही राणी पुरुषांशी संबंध ठेवायची आणि नंतर त्यांना जिवंत जाळून ठार मारायची. (Angola Queen Nzigha killed men after made physical Relation)

त्या काळात युरोपीय वसाहती जगभर विस्तारत होत्या. व्यापाराच्या नावाखाली त्यांचं प्रदेश बळकावणं चालू होतं. जगभरातील इतर ठिकाणांप्रमाणे या ठिकाणावरसुद्धा युरोपीयन वसाहतींची नजर होती. यात आघाडीवर होते पोर्तुगीज. परंतु एनजिंगाने त्यांचे स्वप्न कधीच पूर्ण होई दिलं नाही. एनजिंगाचे (Nzingha) वडील एमबांदी किलुंगी राजा होते. त्यांनी पोर्तुगीजांशी आयुष्यभर संघर्ष केला.

याच सुमारास एनजिंगाचा जन्म झाला होता. तीही आपल्या वडीलांबरोबर पोर्तुगीजांशी लढत राहिली. दरम्यान 1617 मध्ये एमबांदी किलुंगी यांच्या मृत्यूपश्चात त्यांचा मुलगा म्हणजेच एनजिंगाचा भाऊ एनगोला याच्या हातात एमबांदीची सत्ता आली. परंतु तो आपल्या वडिलांप्रमाणे शूर आणि बुद्धिमान नव्हता. शिवाय त्याची बहिण त्याला मारण्याचा कट रचतीये अशीही त्याला शंका होती. या शंकेतून त्याने एनजिंगाच्या मुलाला ठार मारलं. परंतू नंतरच्या काळात त्याचा मृत्यू झाला आणि अंगोलाच्या गादीवर बसली एनजिंगा आली.

खरंतर तिच्या भावाने आधीपासूनच तिला अर्धे राज्य देऊ केलं होते. तरीही आपल्या मुलाला मारल्याचा सूड म्हणून तिने भावाची हत्या केल्याचं काही बोललं जातं. असंही म्हटलं जाते की, राणी एनजिंगा तिच्यासोबत संबंध ठेवणाऱ्या पुरुषाला जिवंत जाळत असे. तिच्याशी संबंध ठेवण्यासाठी पुरूषांची निवड एका खास पद्धतीने केली जाई. त्यासाठी निवडलेल्या दोन पुरुषांमध्ये लढाई होई. जोपर्यंत एकाचा मृत्यू होत नाही, तोपर्यंत ही लढाई चाले. या लढाईत जिंकलेला पुरुष एनजिंगाशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास पात्र असे. परंतु त्यांचा अंत फारच दुर्दैवी होत असे. संबंधानंतर राणी त्यांना जाळून ठार मारत असे. परंतु याबाबत सर्वच इतिहासकार सहमत नाहीत.

एनजिंगानं राज्य अतिशय मुत्सद्दीपणे चालवलं होते. आक्रमण करणाऱ्या पोर्तुगीजांशी तिने चांगले संबंध प्रस्थापित केले. मिशनरीमध्ये राहून पोर्तुगीज भाषा शिकली. त्यांची कामाची पद्धत तिने आत्मसात केली. त्यांच्याबरोबर संबंध चांगले राहावे यासाठी ख्रिश्चन धर्मही स्वीकारला. परंतू तिचे हे संबंध फार काळ टिकले नाहीत आणि त्यांच्यात संघर्ष सुरु झाला. परंतु तिने पोर्तुगीजांना कधीच वरचढ होऊन दिलं नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT