Arab League esakal
ग्लोबल

Arab League : तब्बल बारा वर्षे वाळीत टाकलेल्या सीरियाचा अरब लीगमध्ये पुन्हा प्रवेश

कैरोमध्ये 13 सदस्य देशांनी सीरियाच्या बाजूने मतदान केले

सकाळ डिजिटल टीम

Arab League : सिरिया 12 वर्षांनंतर अरब लीगमध्ये परतला आहे. यासाठी कैरोमध्ये 13 सदस्य देशांनी सीरियाच्या बाजूने मतदान केले आणि 8 देश मतदानापासून दूर राहिले. अरब लीग ही आफ्रिकन आणि अरब देशांची संघटना आहे.

या संघटनेची स्थापना 22 मार्च 1945 रोजी झाली. सीरिया सामील होण्याआधी यात 22 सदस्य देशांचा समावेश होता. यामध्ये सहभागी झालेल्या बहुतांश देशांचे भारताशी चांगले संबंध आहेत. सीरियाने 12 वर्षांपूर्वी आपले सदस्यत्व गमावले होते, याचे कारण अध्यक्ष बाशाद असद यांनी केलेली कारवाई. त्यांनी सौदी बंडखोर गटांना निधी पुरवल्याचा आरोप होता. यानंतर सौदीने सीरियाची अरब लीगमधून हकालपट्टी केली होती. सीरियाचे अरब लीगमध्ये परतणे किती महत्त्वाचे आहे ? याविषयी जाणून घेऊ

सीरियाचे परतणे किती महत्त्वाचे

मध्य आशियाचे विश्लेषक एरॉन सांगतात की अरब लीगचे सदस्यत्व परत मिळणे हा सीरिया सरकारचा मोठा विजय आहे. असद दीर्घकाळ आपल्या खुर्चीवर टिकून राहतील असा विश्वास अरब नेत्यांना आहे. त्यामुळे हा सीरियासह असद यांचाही राजकीय विजय आहे. आता हा बदल सीरियासाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो कारण सीरियाला आर्थिक मदत आणि गुंतवणुकीची नितांत गरज आहे. यात अरब लीग मदत करू शकते.

सीरिया सध्या अनेक अडचणींचा सामना करत आहे. देशाची अवस्था वाईट आहे. आर्थिक टंचाई आहे. निर्वासित संकटाशी देश तोंड देतोय. देशाच्या सीमा असुरक्षित आहेत. सदस्यत्व परत मिळवणे ही सीरियासाठी मोठी गोष्ट आहे, परंतु संकट सोडवणे इतके सोपे नाही.

असे अनेक देश आहेत जे सीरियाच्या परतीच्या मतदानापासून दूर राहिलेत. यामध्ये कतार, कुवेत आणि मोरोक्कोसह 8 देशांचा समावेश आहे. त्यांना सीरियाला मदत करायची नाही शिवाय असद सरकार बेकायदेशीर असल्याचं त्याचं म्हणणं आहे.

गेल्या काही महिन्यांत मध्यपूर्वेतील राजकारणात बदल झाला आहे, जो धक्कादायक आहे. इस्लामी देश वैर विसरून एकत्र आले आहेत. अरब लीगमध्ये सीरियाचा समावेश हे त्यांचंच एक उदाहरण आहे. अरब लीगच्या शिखर परिषदेत सीरियाचा सहभाग हेच दाखवून देतो.

सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात सुरू असलेल्या शिखर परिषदेला सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल-असदही पोहोचले आहेत. या घटनेमागे मोठे कारण आहे. अरब लीगमधून सीरियाला हटवल्यानंतर सौदीसह अनेक अरब देशांनी असद सरकारला सत्तेवरून हटवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही. अशा रीतीने त्यांना ना यश मिळाले ना ते आपला प्रभाव वाढवू शकले. सीरियाला अरब लीगमधून काढून टाकण्याचे अनेक मार्गांनी प्रयत्न झाले, पण असद यांनी हार मानली नाही.

शेवटी सौदी आणि इतर अरब देशांनी सीरियाशी संबंध सुधारण्यावर भर देण्याचा विचार केला. फेब्रुवारीमध्ये सीरियात भूकंप झाला तेव्हा सौदी अरेबियाने इथल्या लोकांसाठी मदत पाठवली होती. गेल्या आठवड्यातच दोन्ही देशांनी आपापले दूतावास उघडण्यास सहमती दर्शवली. सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांचे मत आहे की, मध्यपूर्वेत स्थिरता हवी असल्यास अरब देशांमध्ये शांतता आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Supply : मुंबईकरहो पाणी जपून वापरा, तब्बल तीन दिवस होणार पाणी कपात; नेमकं कारण काय?

Madras High Court to Vijay Thalapathy : करूर चेंगराचेंगरी प्रकरणात मद्रास उच्च न्यायालयाने विजय थलपतींना फटाकरलं!

Cough Syrup Ban : कफ सिरप प्यायल्याने मध्यप्रदेश अन् राजस्थानमध्ये ११ बालकांचा मृत्यू; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Dr. Baba Adhav : शब्दांचे खेळ न करता सरकारने संकटग्रस्तांबरोबर उभे राहावे

Latest Marathi News Live Update: सिसारखेडा येथे गावकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन

SCROLL FOR NEXT