Lawyer-Harish-Salve 
ग्लोबल

Article 370 : ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी कलम 370 बद्दल केले भाष्य; म्हणाले...

वृत्तसंस्था

लंडन : जम्मू-काश्मीर या राज्याला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटविण्याला शनिवारी (ता.5) दोन महिने पूर्ण होत आहेत. 5 ऑगस्ट 2019 या दिवशी भारत सरकारने हे कलम रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. या घटनेला दोन महिने होत आले तरी याविषयीची चर्चा अजूनही थांबण्याचं नाव घेत नाही.

जम्मू-काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे 370वे कलम रद्द करण्याच्या भारत सरकारच्या निर्णयाचे ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी समर्थन केले आहे. सरकारने हे कलम रद्द करून एक जटिल समस्या सोडविली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या विषयाच्या अनुषंगाने पाकिस्तानने व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया लक्षात घेता त्यावरून त्यांची दिवाळखोरीच दिसून येते. ज्या काश्‍मीरवर ते दावा सांगत होते, तो भारताचाच भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

भारताने 370वे कलम रद्द केल्याने पाकिस्तानसोबतचे द्विपक्षीय संबंध ताणल्या गेले आहेत, पाकिस्तानने हाच मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील उपस्थित केला; पण त्याला फारसे यश मिळताना दिसत नाही. साळवे म्हणाले की, व्याप्त काश्‍मीर हा भारताचाच भाग असून पाकच तेथे ठाण मांडून बसला आहे. केवळ भारताच्याच नाही, तर काश्‍मीरच्या राज्यघटनेमध्येही हा प्रदेश भारताचाच असल्याचे नमूद करण्यात आले आहे, केवळ काही पाकिस्तानी मेंदूंचाच याला आक्षेप होता. 

सरकारची कृती योग्य 

राज्यघटनेतील 370वे कलम रद्द केले जावे, अशीच आपली भूमिका होती. मुळात हे कलमच एक मोठी चूक होती. ती तशीच राहू दिली असती, तर आणखी मोठी चूक झाली असती. अशा वेळी ही जटिल समस्या सोडवावीच लागली असती. केवळ शस्त्रक्रियेच्या माध्यमातूनच ही गाठ सोडविणे शक्‍य होते आणि सरकारनेही तेच केले. सरकारचे हे कलम रद्द करण्याची कृती योग्यच होती, असेही त्यांनी सांगितले. 

सर्वोच्च न्यायालय 370 व्या कलमाबाबत योग्य निवाडा करेल; पण या संदर्भातील पाकच्या प्रतिक्रियेवरून त्यांची वैचारिक दिवाळखोरी दिसते. निजामाच्या संपत्तीवरील पाकचा दावाही चुकीचा होता. 
- हरीश साळवे, ज्येष्ठ विधिज्ञ
 

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought : लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रमांवरील खर्च कमी करा, दुष्काळग्रस्तांना मदत करा; मुख्यमंत्री फडणवीस यांचे जनतेला आवाहन

IND vs WI 1st ODI Live: कुलदीप यादवची 'दादागिरी'! वारंवार संघाबाहेर बसवणाऱ्यांना सडेतोड उत्तर, जस्टीन ग्रीव्ह्सच्या शतकाच्या जोरावर विंडीजची मोठी धावसंख्या

गडचिरोलीतील सूफी संत 'जिलानी सरकार' यांचे निधन; भाविकांमध्ये शोककळा

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत वाघाचे अवयव आणि २ खवले मांजर जप्त

छंदच बनला व्यवसाय! २१व्या वर्षी महिन्याभरात २.६४ कोटींची उलाढाल, तरुणाने असं काय केलं?

SCROLL FOR NEXT