qantas 
ग्लोबल

'कुठेच न जाणाऱ्या' विमानाचं तिकिट 2 लाख रुपयांपर्यंत; तरीही 10 मिनिटांत बुकिंग फुल्ल

सकाळ वृत्तसेवा

सिडनी - सध्या कोरोनामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जवळपास ठप्पच आहे. हळू हळू ही वाहतूक टप्प्या टप्प्याने सुरु करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणेही सध्या सुरु करण्यात आलेली नाही. आता काही देशांनी देशांतर्गंत विमानसेवा सुरु केली आहे. ऑस्ट्रेलियातही विमानसेवा सुरु कऱण्यात आली आहे. मात्र यात विमान कुठेही जाणार नाही. ऑस्ट्रेलियाच्या क्वांटास एअरलाइन्सने अनोख्या फ्लाइट टू नोव्हेअरची सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे कुठंच न जाणाऱ्या या विमानाच्या तिकिटांची फक्त 10 मिनिटांतच विक्री झाली. 

फ्लाइट टू नो व्हेअर ही ऑस्ट्रेलियन एअरलाइन्स क्वांटासने सुरु केलेली विशेष विमानाची एक फेरी आहे. ऑस्ट्रेलियात आता विमान प्रवासावरील निर्बंध कमी केले आहेत. त्यामुळे देशांतर्गत विमान प्रवास करता येतो. यातच क्वांटासने फ्लाइट टू नो व्हेअर अशी एक विमानाची फेरी सुरु केली. यामध्ये विमान उड्डाण करून पुन्हा त्याच ठिकाणी परत उतरणार आहे. द इनडिपेंडंटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

कुठेही न जाणारं विमान सात तासांचे उड्डाण करून पुन्हा आहे त्या ठिकाणी उतरणर आहे. या प्रवासात विमान देशातील सुंदर अशी ठिकाणे अवकाशातून दाखवणार आहे. राजधानी सिडनीतील विमानतळावरून ही विमानसेवा सुरु करण्यात येईल. यातील पहिले विमान 10 ऑक्टोंबरला उड्डाण करणार आहे. यात एकूण 134 सीट असतील. तिकिटाचे दर 575 ते 2765 डॉलर म्हणजेच 40 हजार ते जवळपास दोन लाख रुपयांपर्यंत आहेत. इतके दर असूनही कुठेच न जाणाऱ्या या विमानाचे बूकिंग फुल्ल झाले आहे. कंपनीने असंही सांगितलं की, कंपनीच्या इतिहासात आतापर्यंत सर्वात कमी वेळात विक्रमी तिकिट विक्री झाली. 

क्वांटासने म्हटलं की, कोरोनामुळे बंद असलेली विमानसेवा सुरु झाल्यानंतर या उड्डाणासाठी लोकांचा प्रतिसाद थक्क करणारा आहे. असाच प्रतिसाद मिळाला तर अशा प्रकारच्या उड्डाणांबाबत विचार केला जाईल. सध्या आंतरराष्ट्रीय निर्बंध असून ते कधी शिथिल होतील याकडे लक्ष असल्याचं कंपनीने सांगितलं. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water News:मुंबईत पाणीकपात अलर्ट! १० आणि ११ मार्चला पाण्याचा मोठा तुटवडा; २४ तास राहणार खंडित, जाणून घ्या भागांची यादी...

Latest Marathi News Live Update : द्राक्ष निर्यात अडकली समुद्रात; शेतकरी आणि निर्यातदारांना मोठा आर्थिक फटका

Success Story: जिद्दीच्या जोरावर आदित्य पोलिस उपनिरीक्षक; नीरा येथे मिरवणुकीदरम्यान ठिकठिकाणी महिलांकडून औक्षण

IND vs NZ Final: संजू सॅमसनसोबतच्या Viral Video मागचं सत्य रोहित शर्माने सांगितलं; म्हणाला, मला माहित्येत, त्यावेळी कसे वाटते...

Success Story: दिव्यांगत्वावर मात करत अमीरची सीए पदावर मोहर; निकाल ऐकताच गलांडवाडीच्या इनामदार परिवाराला आनंदाश्रू

SCROLL FOR NEXT